आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
Follow करा eMPSCKatta WhatsApp चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एखादी कृती घडण्यामागे विशिष्ट अट सूचित असते. गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम झालेला दिसतो.
· उदा. जर-तर, जारी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी
1. जर दळण आणल तर स्वयंपाक होईल.
2. नोकरी मिळविली म्हणजे गाडी घेऊन देईल.
3. तू घरी आला की, आपण सिनेमाला जाऊ.
🌷🌷संकेत बोधक उभयान्वी बोधक🌷🌷
2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.
· उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.
1. चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला गेला.
2. चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.
🌷🌷उद्देश बोधक अव्यव🌷🌷
1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसर्या वाक्यात कळते.
· उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.
1. एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर
2. तो म्हणाला, की मी हरलो.
3. मी मान्य करतो की, माझ्याकडून चुकी झाली.
🌷🌷स्वरूपबोधक अव्यव🌷🌷
4. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय -
· पहिल्या वाक्यातील एखाधा गोष्टीचा परिणाम हा समोरील वाक्यात दर्शवण्यासाठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.
· उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.
1. तू गृहपाठ करीत नाहीस म्हणून तुला शिक्षक रागवतात.
2. ती नेहमी अभ्यास करते याकरिता ती नेहमी प्रथम येते.
3. गोडी येतांना बंद पडली, सबब मला उशीर झाला.
2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय -
· ही उभयान्वयी अव्यये वाक्यातील दिलेल्या गोष्टीपैकी एकालाच पसंती दर्शवतात.
· उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.
1. तुला चहा हवा की कॉफी ?
2. करा किंवा मरा.
3. सिनेमाला येतोस की, घरी जातोस ?
🌷समानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय/ प्रधानत्वसूचक :🌷
· जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्य हे समान दर्जाचे असतात म्हणजे ती वाक्य स्वतंत्र असतात ते एकमेकांवर असलंबून नसतात. अशी वाक्य म्हणून येतात.
· यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
🌷🌷समानत्वदर्शक उभयान्वी अव्यव🌷🌷
MPSC मुख्य परीक्षा : मराठी व इंग्रजी
जॉईन करा @eMPSCkatta
🌷🌷दंत तालव्य :-🌷🌷
जेव्हा च, ज, झ वर्णांस 'अ' हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंततालव्य गटात होतो.
उदाहरणार्थ:-
चटकन, चोर, जहाज, जमाव, झरा, झाड.
क्ष व ज्ञ मुलध्वनी आहेत असे वाटते प्रत्यक्षात ती संयुक्त व्यंजने आहेत म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करत नाहीत.
च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्णं आहेत मात्र त्यांचा उच्चार य ने युक्त होतो.
उदाहरणार्थ:-
च्य, ज्य
च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य व दंततालव्य असा दुहेरी होतो.
उष्मे, घर्षक व्यंजन-
श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक व्यंजन असे म्हणतात.
🌷🌷महाप्राण व्यंजन-🌷🌷
ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
ख् (क् + ह), घ् (ग् + ह), छ् (च् + ह), झ् (ज् + ह)
ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लागते त्या सर्व वर्णाना महाप्राण व्यंजने म्हणातात.
बाकीचे अल्पप्राण आहेत. क्, ग्, ङ, च्, ज्, त्र, ट, ड, ण्, त्, द, न्, प्, ब्, म्, य, र, ल्, व्, ळ या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात 'ह' ची छटा नसते.
🌷🌷३. अनुनासिक वर्ण –🌷🌷
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-
ड, त्र, ण, न, म
🌷🌷१. कठोर वर्ण :–🌷🌷
ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात किंवा जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात.
उदाहरणार्थ:-
क, ख च, छ ट, ठ त, थ प, फ
🌷🌷स्पर्श व्यंजन :🌷🌷
एकूण व्यंजन २५ आहेत. ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
उदाहरणार्थ:-
क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
🌷🌷सजातीय स्वर व विजातीय स्वर –🌷🌷
एकाच उच्चारस्थानातून निघणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
अ-आ , इ-ई, उ-ऊ
भिन्न उच्चारस्थानातून निघणा-या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-
अ-इ, अ-उ, इ-ए, ऊ-ए, अ-ऋ
🌷🌷स्वरांचे प्रकार🌷🌷
स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर –
अ, इ, उ, ऋ, लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो, त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात.
आ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
🌷🌷बहुव्रीही समास :🌷🌷
§ ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
§ उदा.
1. नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
2. वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
3. दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
§ बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.
3. करणबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे कारण हे दुसर्या वाक्यामध्ये कळते.
· उदा. कारण, का, की इत्यादी.
1. त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत घेतली.
2. मला गृहशास्त्राची माहिती नाही, कारण की, माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता.
🌷🌷कारणबोधक अव्यव🌷🌷
2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.
· उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.
1. चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला गेला.
2. चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.
🌿🌿उद्देशबोधक अव्यव🌿🌿
🌷🌷असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :🌷🌷
· उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य गौण असते तेव्हा अशा अव्ययांना 'असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.
· यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
3. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय -
· पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात.
· उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.
1. मरावे, परी किर्तीरूपी उरावे.
2. लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.
3. त्याने अभ्यास केला, परंतु नापास झाला.
1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय -
·🌿 ही उभयान्वयी दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात तसेच पहिल्या विधानात/ वाक्यात आणखी भर टाकण्याचे काम करतात.
· उदा. व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय, आणिक इत्यादी.
1. घरी पाहुणे आले आणि लाईट गेली.
2. राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला.
3. आज डब्यात भाजी, पोळी आणली अन् लोनचेण आहे.
4. चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
🌷उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार🌷
· 🌿 दोन शब्द किंवा दोन वाक्यात जोडणार्या शब्दांना 'उभयान्वयी अव्यय' म्हणतात.
·🌿 उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
1. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय
2. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय
🌿🌿उभयान्वी अव्यव🌿🌿
🌷🌷जोडाक्षरांचे लेखन🌷🌷
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-
क + क = क्क,
त + त = त्त
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षरे असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-
विद्यालय मध्ये या (द + य + आ )
मध्ये उभा दंड असणारी व्यंजने - क, फ
शेवटी उभा दंड असणारी व्यंजने - ग , ण, श
अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने - छ , ल, ळ
अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने - ट, ठ, ड, ढ, द, ह
दंड नसलेले व्यंजन - र
मराठीत प्रत्येक वर्णाचा पूर्णोच्चार होतो. त्याशिवाय त्याचे लांबट व तोकडा (निभृत) असेही उच्चार होतात.
🌷🌷स्वतंत्र व्यंजन -🌷🌷
ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.
तालव्य :-
जेव्हा च, छ, ज आणि झ वर्गातील वर्णांस 'य' हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.
उदाहरणार्थ:-
चित्र, छत्री, जेवण, झेल
🌷🌷अर्धस्वर व्यंजन -🌷🌷
य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.
अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.
🌷🌷२. मृदु वर्ण :–🌷🌷
ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात.
उदाहरणार्थ:-
ग, घ ज, झ ड, ढ द, ध ब ,भ
🌷स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.🌷
१. कठोर वर्ण
२. मृदु वर्ण
३. अनुनासिक वर्ण
🌷🌷व्यंजनांचे प्रकार🌷🌷
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
१. स्पर्श व्यंजन (२५)
२. अर्धस्वर व्यंजन (४)
३. उष्मा, घर्षक व्यंजन (३)
४. महाप्राण व्यंजन (१)
५. स्वतंत्र व्यंजन (१)
🌷🌷स्वरांचे इतर प्रकार-🌷🌷
संयुक्त स्वर –
दोन स्वर एकत्र येवून बनलेल्या स्वरांना संयुक्त असे म्हणतात.
ए, ए, ओ, औ, हे संयुक्त स्वर आहेत.
ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात.
दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात.
🌷🌷अक्षरे :-🌷🌷
अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ इ ई वगेरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.
प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ हे दहा स्वर व अं, अ: यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो त्याला आपण बाराखडी किंवा बाराक्षरी असे म्हणतात.
आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात 'अ' हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.
उदा :-
क् + अ = क