चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...! 1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी 2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती 3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान 4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती
*अस्तित्व अकॅडमीचा विदयार्थी शरद जाधव याची पालघर पोलीस पदी निवड.* हार्दिक अभिनंदन💐...अभिनंदन💐....अभिनंदन..💐💐
Читать полностью…*'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून अस्तित्व अकॅडमी आयोजित स्पर्धा*
📌 स्वरूप :- टेस्ट पेपर.
📌 एकूण प्रश्न - 100.
📌गुण- 100.
🗂️दिनांक व वेळ- 15 एप्रिल 2023.
🕰️ सकाळी 11 ते 12.
📌 पेपर प्रश्न पुढील मुद्द्यावर असतील👇
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन चरित्र व कार्य.
2) समकालीन समाजसुधारक.
📌प्रथम बक्षीस.
📌द्वितीय बक्षीस.
📌तृतीय बक्षीस काढण्यात येतील.
📌*स्पर्धेचे ठिकाण:-*
अस्तित्व अकॅडमी.. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
आठवले चेंबर, दुसरा मजला.
दैनिक गावकरी समोर. अर्पण ब्लड बँक शेजारी. रेडक्रॉस सिग्नल, नाशिक.
📌सर्वांसाठी प्रवेश मोफत...
📌भारताने भारतीय संविधानाच्या डोगरी आवृत्तीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
📌10 एप्रिल 2023 रोजी, भारताने भारतीय संविधानाच्या डोगरी आवृत्तीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
📌या आवृत्तीचे प्रकाशन हे भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
*निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला* :- 1) तृणमूल काँग्रेस, 2) राष्ट्रवादी काँग्रेस, 3) भारतीय कम्युनिस्ट पार्टी
◆ प्रादेशिक पक्षांमध्ये, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशातील भारत राष्ट्र समिती (BRS) आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (RLD) यांचा प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढला आहे.
📌सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत.
📌राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष :-
📌राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष
1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :- 28 डिसेंबर 1885
2) भारतीय जनता पक्ष :- एप्रिल 1980
3) बहुजन समाज पक्ष. :- 14 एप्रिल 1984
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :- 1964
5) नॅशनल पीपल्स पार्टी. :- 2013
6) आम आदमी पार्टी. :- 2012
*पाचवी व्याघ्रगणना 2022 :-*
◆ 9 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना 2022 ची आकडेवारी जाहीर केली.
◆ Project Tiger सुरुवात :- 1 एप्रिल 1973.
◆ "Project Tiger" ला 1 एप्रिल 2023 रोजी 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "50₹" चे एक विशेष नाणे जारी केले.
◆ पहिली व्याघ्र गणना 2006 साली करण्यात आली. जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघ भारतात आहेत.
◆ 2022 च्या आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या 3167" इतकी आहे.
◆ मागील चार वर्षात एकूण वाघांच्या संख्येत 6.7%(चार वर्षात 200 वाघांची वाढ) वाढ झाली आहे.
➤ 2018 च्या चौथ्या व्याघ्रगणनेनुसार पाहिले पाच राज्ये :-
1) मध्यप्रदेश (526), 2) कर्नाटक (524),
3) उत्तराखंड (442), 4) महाराष्ट्र (312),
5) तामिळनाडू (264)
अस्तित्व अकॅडमी ची विद्यार्थिनी मनिषा सुभाष खुर्दऴ ( नाशिक ग्रामीण पोलिस पदी निवड) हार्दिक अभिनंदन💐...अभिनंदन💐....अभिनंदन..💐💐
Читать полностью…सोलापूर सिटी पोलीस (चालक)
Kalyani Vishnu mahale
*पुन्हा एकदा अस्तित्व अकॅडमी...*
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचा निकाल आज जाहीर झाला या निकालांमध्ये अस्तित्व अकॅडमी चे विद्यार्थी श्री संदीप निमसे ( मुंबई लोहमार्ग ), तुषार औटे ( नाशिक ग्रामीण ) यांना यश मिळाले अस्तित्व अकॅडमी तसेच अस्तित्व अकॅडमी टीम तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐...अभिनंदन💐....अभिनंदन..💐💐
*'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून अस्तित्व अकॅडमी आयोजित स्पर्धा*
📌 स्वरूप :- टेस्ट पेपर.
📌 एकूण प्रश्न - 100.
📌गुण- 100.
🗂️दिनांक व वेळ- 15 एप्रिल 2023.
🕰️ सकाळी 11 ते 12.
📌 पेपर प्रश्न पुढील मुद्द्यावर असतील👇
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन चरित्र व कार्य.
2) समकालीन समाजसुधारक.
📌प्रथम बक्षीस.
📌द्वितीय बक्षीस.
📌तृतीय बक्षीस काढण्यात येतील.
📌*स्पर्धेचे ठिकाण:-*
अस्तित्व अकॅडमी.. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
आठवले चेंबर, दुसरा मजला.
दैनिक गावकरी समोर. अर्पण ब्लड बँक शेजारी. रेडक्रॉस सिग्नल, नाशिक.
📌सर्वांसाठी प्रवेश मोफत...
*अस्तित्व अकॅडमी चे विदयार्थी,आमचे शुभचिंतक Pravin Bhaurao Borve TAIT परीक्षेमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक स्कोर मिळवून यश संपादन केले...एकूण मार्क 119* *अभिनंदन ...अभिनंदन.... अभिनंदन💐💐💐*
Читать полностью…https://www.facebook.com/reel/973102767433487?mibextid=6AJuK9&s=chYV2B&fs=e
Читать полностью…जागतिक चिमणी दिवस- 20 मार्च-
चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली.
जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.
भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. याशिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.
२०२० मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे.
*गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती :*
- पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)
- रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)
- भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)
- सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)
- बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)
चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे.
चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी
होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर दिसून येत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकांचा उतारा देखील कमी होत आहे. यावर उपास म्हणून पिकांवर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे.
*सुरुवात*
महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे 'नेचर फॉरएव्हर सोसायटी' (Nature Forever Society) नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अॅक्शन फाऊंडेशन’ (Eco-Sys Action Foundation ) आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून 'जागतिक चिमणी दिन' साजरा करण्यास सुरुवात केली. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो.[४] या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे.
आंतराराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्यासाठीचा पहिलावहिला महा-कार्यक्रम असणाऱ्या जागतिक भरडधान्य (श्रीअन्न) परिषदेचे भारताने नवी दिल्ली येथे आयोजन केले आहे.
भारताच्या पुढाकाराने 2023 हे वर्ष आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा यामागील उद्देश हा अन्न सुरक्षा तसेच पोषण या दृष्टीने भरड धान्याचे महत्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे, तसेच त्याच्या उत्पादनाच्या संदर्भात संशोधन आणि विकास यात गुंतवणूक तसेच भरड धान्याचे उत्पादन, उत्पादकता आणि दर्जा याबद्द्ल संबधितांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. जागतिक स्तरावर अन्न आणि पोषण सुरक्षा याची हमी देण्याच्या दृष्टीने भरड धान्याच्या प्रसारात भरड धान्य उत्पादक देशांची भूमिका महत्वाची आहे.
Imp.
📌 शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये (61.8%) सर्वात कमी साक्षरता आहे आणि केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे.
📌 शिक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहार (61.8%) मध्ये सर्वात कमी साक्षरता आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश (65.3%) आणि राजस्थान (66.1%) आहे.
📌 केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे, त्यानंतर लक्षद्वीप 91.85% आणि मिझोराम 91.33% आहे.
*जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏✨*
Читать полностью…*केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.*
📌 फ्रान्समधील भारतीय डायस्पोरा समुदायाला नुकत्याच संबोधित करताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली की भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
📌 गोयल यांनी देशाची निर्यात कामगिरीची प्रशंसा केली. त्यांनी जागतिक फार्मसी, फूड बाऊल आणि विश्वासू भागीदार म्हणून भारताची भूमिका अधोरेखित केली.
◆ स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी होणार.
◆ निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
◆ अरुणाचल प्रदेशातील किबिथू सीमावर्ती गावात अमित शाह यांनी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
◆ भारताने भारतीय संविधानाच्या डोगरी आवृत्तीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
◆ महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांची 196 वी जयंती 11 एप्रिल 2023 रोजी साजरा करण्यात आली.
◆ केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
◆ 2022-23 या आर्थिक वर्षात, मॉरिशसमधून उगम पावलेल्या भारतीय भांडवली बाजारात परदेशातील भांडवलाच्या प्रवाहात सर्वात जास्त घसरण झाली.
◆ टचलेस बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यासाठी IIT-बॉम्बे आणि UIDAI यांनी करार केला.
◆ भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ आर्मगेडन आशिया आणि ओशनिया स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
◆ डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात जलद 6000 धावा करणारा ठरला आहे.
◆ ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2021-22 अहवाल सादर केला.
◆ जगातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक असलेल्या 19 शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे.
◆ प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि दिल्लीच्या अक्षरा थिएटरच्या सह-संस्थापक जलबाला वैद्य यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
◆ राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस 2023 11 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
◆ लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सणसरच्या रामबन हिल रिसॉर्टमध्ये जम्मू प्रदेशात ट्यूलिप गार्डनचे उत्घाटन केले.
*ए. बी. के प्रसाद यांना 2023 चा राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार :-*
📌2023 सालचा मानाचा 'राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार' (Raja Ram Mohan Roy National Award for Excellence in Journalism) ज्येष्ठ पत्रकार ए. बी. के प्रसाद यांना प्रदान करण्यात
📌प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या हस्ते फेब्रुवारी 2023 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
📌एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
📌 आंध्र प्रदेशातील सर्व मुख्य प्रवाहातील नियतकालिकांचे संपादक होण्याचा मान ए. बी. के प्रसाद यांना मिळाला होता.
📌 2004 ते 2009 या काळात त्यांनी संयुक्त आंध्र प्रदेशात राजभाषा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
*पुन्हा एकदा अस्तित्व अकॅडमी...*
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचा निकाल आज जाहीर झाला या निकालांमध्ये अस्तित्व अकॅडमी चे विद्यार्थीनी तसेच अभ्याशिका विद्यार्थिनी कु. हेमा किसन वाचले ( मिरा भोइंडर पोलीस चालक ), कु. कल्यानी विष्णू महाले ( सोलापूर सिटी पोलीस चालक ) यांना यश मिळाले अस्तित्व अकॅडमी तसेच अस्तित्व अकॅडमी टीम तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐...अभिनंदन💐....अभिनंदन..💐💐
*अस्तित्व अकॅडमी व अस्तित्व अभ्यासिकेचा विद्यार्थी तुषार औटे यांची नाशिक ग्रामिण पोलिस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !*💐💐
Читать полностью…*Combine पुर्व 2022 निकाल.*
*Transgender चा Issue Clear झाल्याशिवाय आयोग Combine चा निकाल लावणार नाही.*
हे सर्वांना माहितीच आहे. फक्त 30 एप्रिल जवळ आली आहे म्हनुन आठवणं करून दिली
प्रकरण शासकीय स्तरावरती न्यायप्रविष्ठ असताना निकाल लावून आयोग संपूर्ण जाहिरात अडचणीत आणणार नाही. प्रश्न एक व्यक्ती आहे की अनेक हा नसून शासकीय धोरणाचा आहे.
त्यामूळे 2022 च्या निकालाची वाट न बघता 30 एप्रिल वरती व्यवस्थित लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2021 पदानुसार तात्पुरती यादी या आठवड्यात पण लागण्याची शक्यता वाटत नाही. वाट पाहू नका..
*आपल्या क्लासचे वैभव चंद्रकांत आंबेकर यांची RFO म्हणून पुन्हा एकदा सिलेक्शन झाले आहे ते सध्या नायब तसीलदार म्हणून रुजू आहे ......अस्तित्व परिवारा तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन*
Читать полностью…https://www.facebook.com/reel/973102767433487?mibextid=6AJuK9&s=chYV2B&fs=e
Читать полностью…*मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*💐💐🎊
Читать полностью…📰भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या बांगलादेशच्या समकक्ष शेख हसीना, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन करतील. ही अशी पहिली पाइपलाइन आहे ज्याद्वारे भारतातून बांगलादेशला रिफाइंड डिझेलचा पुरवठा केला जाईल.
या प्रकल्पामध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी आणि बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्वतीपूर यांना जोडणारी 130 किलोमीटर लांबीची पाइपलाइन बांधण्यात आली आहे.
एकूण पट्ट्यांपैकी सहा किलोमीटर भारताच्या बाजूने आणि उर्वरित 124 किलोमीटर बांगलादेशात असेल. पाइपलाइन प्रकल्पाचा भारतीय भाग आसामस्थित नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड आणि बांगलादेशी लेग बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारे राबविण्यात येणार आहे
*20 मार्च :- आंतरराष्ट्रीय आनंद दिवस*
( International Day of Happiness )*
दरवर्षी जगभरात 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला जातो
📌 घोषणा :- 12 जुलै 2012
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 12 जुलै 2012 रोजी 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिवस म्हणून घोषित केला
📌 विशेष :- 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस ( World Sparrow Day ) म्हणून देखील साजरा केला जातो
महिला दिन विशेष पेपर स्पष्टीकरण - 01.pdf
Читать полностью…