आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
🌷🌷लक्षणा (लक्षार्थ) 🌷🌷
शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.
ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.
उदा.
आम्ही ज्वारी खातो.
याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.
उदाहरणार्थ
1) बाबा ताटावर बसले.
2) घरावरून हत्ती गेला.
3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.
4) मी शेक्सपिअर वाचला.
5) सूर्य बुडाला.
6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.
🌷🌷शब्दांच्या शक्ती🌷🌷
🌿अभिधा ( वाच्यार्थ )
अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१) साप मारायला हवा.
२) मी एक लांडगा पाहिला.
३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.
४) बाबा जेवायला बसले.
५) घरात फार जळवा झाल्या आहेत.
६) आम्ही गहू खरेदी केला.
🌷🌷शुद्ध शब्दयोगी अव्यय –🌷🌷
च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा, हि - अशी शब्दयोगी अव्यय आहेत कि ती शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्यरूपे, होत नाहीत, अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. या शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे, मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.
🌷🌷१४. दिक्वाचक – 🌷🌷
प्रत, प्रती, कडे, लागी इ.
उदा.
१. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.
२. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.
🌷🌷१५. विरोधवाचक –🌷🌷
विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.
उदा.
१) भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.
२) त्याने उलट माझीच माफी मागितली.
🌷🌷१०. संबंधवाचक – 🌷🌷
विशी, विषयी, संबंधी इ.
उदा.
१) देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.
२) त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.
🌷🌷८. कैवल्यवाचक – 🌷🌷
च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ इ.
उदा.
१) विराटच आपला सामना जिंकवेल.
२) किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.
🌷🌷६. तुलनावाचक – 🌷🌷
पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.
उदा.
१) माणसांपेक्षा मेंढर बरी.
२) गावामध्ये संजय सर्वात हुशार आहे.
🌷🌷४. व्यतिरेकवाचक –🌷🌷
विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त इ.
उदा.
१. तुझ्याशिवाय मला करमत नाही.
२. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.
🌷🌷३. करणवाचक – 🌷🌷
करवी, योगे, हाती, द्वारा, कडून, मुळे इ.
उदा.
१. सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाही.
२. सिंहाकडून हरिण मारले गेले.
🌷🌷ब) गतिवाचक :- 🌷🌷
पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इ.
उदा :
अ) कालपासून माझी परीक्षा सुरू झाली.
आ) उद्या पर्यंत ते दुकान बंद राहील.
🌷🌷शब्दयोगी अव्ययाचे प्रकार 🌷🌷
१. कालवाचक
अ. काल कामाला सुट्टी होती.
आ. मी दररोज अभ्यास करतो.
वरील वाक्यातील काल, दररोज हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळा घडली हे दाखवतात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात; म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.
कालवाचक अव्ययवाचे दोन प्रकार पडतात.
♦️पदभरतीबाबत फडणवीस साहेब..
👉 राज्यात लवकरच मेगाभरती.🔥🔥
मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बाकीची सर्व गौण असतात. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधानवाक्ये असतात.
गौणवाक्यांचे प्रकार
नाम वाक्य :-
दिलेल्या मिश्र वाक्यातील एका वाक्याला 'काय' ने प्रश्न विचारल्यास उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न विचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते व कर्म नेहमी नाम असते म्हणून अशा गौण वाक्यास नाम वाक्य म्हणतात.
नामाचे कार्य करणा-या गौणवाक्याला नामवाक्य म्हणतात.
उदाहणार्थ
१) तो उत्तीर्ण झाला, फार चांगले झाले.
२) गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे.
३) प्रश्न असा आहे की त्याच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.
४) आम्ही स्पर्धत हरलो ही वार्ता खरी आहे.
५) बाबा म्हणाले की, आज गेलेच पाहिजे.
६) त्याचा विश्वास आहे, की मला बक्षीस भेटेल.
🌷🌷२.मिश्रवाक्य 🌷🌷
एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक समिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१) जे चकाकते, ते सोने नसते.
२) गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
३) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.
४) गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ
५) दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती.
🌷🌷४.संकेतार्थी वाक्य 🌷🌷
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
🌷🌷व्यंजना (व्यंगार्थ) 🌷🌷
मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.
२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.
३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.
४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.
५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.
भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (Integral Coach Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०१० जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
🌿नामसाधित शब्दयोगी अव्यय –
कडे, मध्ये प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी इ.
🌿विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय –
सम; सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध इ.
🌿धातुसाधित शब्दयोगी-
अव्यय करीता, देखील, पावेतो, लागी, लागून इ.
🌿क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय –
खालून, मागून, वरून, आतून, जवळून इ.
🌿संस्कृत शब्दसाधित –
पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष इ.
🌷🌷११. साहचर्यवाचक – 🌷🌷
बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत इ.
🌷🌷१२. भागवाचक 🌷🌷–
पैकी, पोटी, आतून
🌷🌷१३. विनिमयवाचक – 🌷🌷
बद्दल, ऐवजी, जागी, बदली इ.
उदा.
१) त्याच्या जागी मी खेळतो.
२) सूरजची बदली पुण्याला झाली.
🌷🌷९. संग्रहवाचक – 🌷🌷
सुद्धा, देखील, हि, पण, बरिक, केवळ, फक्त इ.
उदा.
१) मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.
२) रामही भक्तासाठी धावून येईल.
🌷🌷७. योग्यतावाचक –🌷🌷
योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम इ.
उदा.
१) तो ड्रेस माझा सारखा आहे.
२) आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.
🌷🌷५. हेतुवाचक – 🌷🌷
कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्थव इ.
उदा.
१. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.
२. जगण्यासाठी अन्न हवेच.
🌷🌷४. व्यतिरेकवाचक – 🌷🌷
विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त इ.
उदा.
१. तुझ्याशिवाय मला करमत नाही.
२. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.
🌷🌷२. स्थलवाचक – 🌷🌷
अ. परमेश्वर सर्वत्र असतो.
आ. येथून घर जवळ आहे.
वरील वाक्यातील सर्वत्र, येथून हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ लिंवा ठिकाण दाखवितात; म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.
🌷🌷अ) कालदर्शक :- 🌷🌷
पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इ.
उदा.
१) आज पावेतो मी आंबा खाल्ला नाही.
२) यापुढे मी जाणार नाही.
३) सकाळनंतर मी तिकडे जाणार आहे.
🌷🌷शब्दयोगी अव्यय🌷🌷
नामांना जोडून येणा-या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्या शब्दाला जोडूनच येतात.
शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात असे असले तरी शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि क्रियाविशेषण यांनाही कधी कधी जोडून येतात.
जसे येईपर्यंत, बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलण्यामुळे परवापासून, यंदापेक्षा, केंव्हाच, थोडासुद्धा इत्यादी.
उदा:
टेबलाखाली
वरील वाक्यात खाली हा शब्द अव्यय आहे.
🌷🌷क्रियाविशेषणवाक्ये 🌷🌷
गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थळ, काळ, रीत, संकेत, कारण, उद्देश याविषयी माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण गौण वाक्य होय.
१) जेंव्हा घाम गाळावा तेंव्हाच खायला भाकरी मिळते - कालदर्शक
२) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती - स्थलदर्शक
३) तुला जसे वाटेल तसे वाग - रीतीदर्शक
४) जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असशील तर उत्तीर्ण होशील - संकेतदर्शक
५) पावसाळा असला तरी मुले अलीकडे छत्र्या बापरत नाहीत - विरोधदर्शक
६) तो इतका मोठ्याने बोलला कि त्याचा आवाज बसला - कारणदर्शक
७) शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो - उद्देशदर्शक
उदा.
१) जेथे जावे तेथे गर्दीच असते.
२) तो वाचला, कारण त्याने उडी मारली.
🌷🌷३. संयुक्तवाक्य 🌷🌷
दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१) मी रोज सकाळी पहाटे लवकर उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
२) सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांसोबत फिरावयास जातो.
एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्यांचे आणखी तीन प्रकार पडतात.
🌷🌷१. केवलवाक्य 🌷🌷
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ
१) आम्ही जातो आमुच्या गावा.
२) तानाजी लढता लढता मेला.
३) अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.
४) एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला.
५) पांढरे स्वछ दात मुखास शोभा देतात.
६) शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
७) एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली.
🌷🌷३. आज्ञार्थी वाक्य 🌷🌷
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. मुलांनी चांगला अभ्यास करा.
२. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे.