लाडकी बहिण योजना काय आहे? सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म | 👇👇
https://nanafoundation.in/लाडकी-बहिण-योजना-काय-आहे-स/
SEBC उमेदवारांनी उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करायला सुरुवात करा.
उत्पन्न आणि जात दोन्ही दाखल्यांच्या सहाय्याने 3 वर्षाचे NCL मिळेल.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 साठी लागणार आहे.
♦️हे लक्ष्यात ठेवा ♦️
✅️ मानवी शरीरात यकृताचे कार्य कोणते ?👉 ग्लुकोजचा साठा करणे
🔹.........च्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केला जातो?👉 अमोनिया व कार्बन - डायोऑक्सिड
🔹 नेत्रगोलाच्या उघड्या पृष्ठभागावरील गोलाकार पारदर्शक आवरणास काय म्हणतात ?👉 पारपटल
🔹 सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरींना काय म्हणतात ? 👉 सौरघट
🔹 कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो ? 👉 कॅरोटीन
🔹 स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?👉 कार्बन डायऑक्साइड
🔹 प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो ?👉 उंदिर, पिसवा
🔹 गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ? 👉 बिजागरीचा सांधा
🔹 टायफाईड या आजारात कोणते औषध दिले जाते ?👉 क्लोरोमाससिटिन
🔹 कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते ?👉 पाणी
🔹 गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? 👉 मिथेन
🔹 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्या गटाचे रक्त चालते?👉 AB
🔹 कोणता पदार्थ सर्वोत्कृष्ट जळण आहे ? 👉 हायड्रोजन
🔹 कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते?👉 थायरॉक्सिन
*मुख्यमंत्री माझी लाडकी लेक योजना*
*नविन अपडेट*
1) हि योजना आत्ता 15 दिवस नाही तर दोन महिने वाढली आहे 31 ऑगस्ट पर्यंत सर्व महिला अर्ज करू शकतील
2) ज्या महिलांकडे डोमासाईल / नाही अश्या सर्व महिलांना रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला या पैकी एक कोणते पण चालेल
3) जे शेतकरी 5 एकर च्या पुढील आहेत त्यांना पण यात सहभाग घेता येईल हि अट रद्द झाली
4) 21 ते 60 वर्ष वय वरून 21 ते 65 करण्यात आले आहे.
5) पर राज्यात जन्मलेल्या महिलांनी त्यांच्या पती चे डोमासाईल जोडले तरी चालते
6) ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अश्या सर्व महिलांना उत्पन्न दाखला नसेल तरी चालते / असेल तरी चालते
7) आपल्या कुटुंबात जर 21 वर्ष पूर्ण मुलगी असेल जिचे लग्न अजून झाले नसेल तर तिला पण या योजनेचा लाभ घेता येईल.
सर्व महिला माय माउलींना कळविण्यात येते कि जास्त जीवाची धडपड करू नका योजना सर्वाना मिळेल जरी तुम्ही दोन महिन्यांनी अर्ज केला तरी तुम्हाला 1 जुलै पासूनच पैसे मिळणार कोणी कधी पण अर्ज करा सर्वाना 1 जुलै पासून पैसे मिळणार *आम्ही* वेळोवेळी नवनवीन येणारी माहिती तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहचवीत आहे कोणी कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका
अजून योजनेची साईट आलीच नाही त्यामुळे कोणी म्हणणेल मी अर्ज भरून देतो तर तसे होणार नाही. ज्या दिवशी साईट चालू होईल तेंव्हा सर्वाना या योजनेचा लाभ मिळेल
कुणाच्या भुलाव्यात येऊ नका व आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नका 🙏🏻 हि विनंती.
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय*
मुंबई, दि.२: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.
योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००
👆👆महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत GR
Читать полностью…