मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच विद्यार्थ्यांना ना वीज, ना पाणी, ना प्राथमिक सुविधा..!!!
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात सध्या ना वीज, ना पाणी, ना विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सुविधा अशी दुरवस्था आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात आल्यानंतरही या उपकेंद्रात सुधारणा झालेली नाही आणि अजूनही ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही बाब लक्षात आलेली आहे.
वीज, पाणी आणि अन्य सुविधांचा अभाव असल्यामुळे व्यवस्थापन आणि विधी शाखेच्या ४०० विद्यार्थ्यांची सध्या ऑनलाईन लेक्चर होत आहेत. आणि या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रतिवर्षी ५० हजारांचा शुल्क आकारण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तरी सरकारकडून अपेक्षा आहे की, लवकरच या उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व सुख-सोयी उपलब्ध होऊन लेक्चर ऑफलाईन मध्ये सुरु होतील.
https://www.youtube.com/watch?v=bRK-iisr0dQ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी इंजिनिअर सेल’ यांमार्फत इंजिनिअर दिनाचे औचित्य साधून पुणे येथे शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर सायं. ४ वाजता विश्वभुवन ऑडिटोरिअम, सिम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, मा. सौ. सुप्रियाताई सुळे (संसदरत्न खासदार, बारामती लोकसभा), मा. श्री. जयंतरावजी पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र ), मा. श्री. राजेशजी टोपे (आमदार, घनसावंगी विधानसभा), मा. श्री. प्राजक्त तनपुरे (आमदार, राहुरी विधानसभा) व मा. श्री. रोहीत पवार (आमदार, कर्जत, जामखेड) उपस्थित राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न व कंत्राटी नोकर भरती या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Читать полностью…'राष्ट्रवादी' मासिकाचा सप्टेंबर महिन्याचा अंक आता वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर व अॅपवर देखील हे मासिक वाचकांसाठी डिजीटल स्वरूपात उपलब्ध झाले आहे.
एनसीपी अॅप- https://ncpshare.page.link/jkccrzFFTzskXD4o7
वेबसाईट - https://ncp.org.in/wp-content/uploads/sept-ank.pdf
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व माजी मंत्री, माननीय आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत श्री. दिलीप पनकुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिनानाथ पडोळे हे उपस्थित होते.
Читать полностью…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह पूजा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माननीय खासदार अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आ. अनिल देशमुख, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री व आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, माजी खासदार व पक्षाचे मराठवाडा समन्वयक जयसिंगराव पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, विधान परिषदेच्या माजी आ. विद्याताई चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या फ्रंटल सेलच्या राज्यप्रमुखांची आढावा बैठक आज प्रदेश कार्यालय येथे पार पडली.
Читать полностью…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने माजी आमदार, श्री. जगन्नाथ शेवाळे यांची पक्षाच्या 'पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माननीय खासदार अमोल कोल्हे, माननीय आ. अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Читать полностью…आपल्या असीम शौर्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व सशस्त्र क्रांतिद्वारे अन्यायग्रस्त जनतेच्या मनात उठावाची ठिणगी पेटवणारे थोर क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Читать полностью…राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक राजकीय हेतूसाठी; मग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी?
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून तीन दिवसीय राष्ट्रीय समन्वय बैठक होणार आहे. या पारश्वभूमीवर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा व मूकबधीर शाळा यांना तिन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील अन्य ठिकाणी सोयीस्कर जागा उपलब्ध असताना शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रांगणावर या बैठकीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जवाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी संघाचे देशभरातील स्वयंसेवक पुण्यात आले आहेत. ही बैठक स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या बैठकीसाठी मैदानावर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या बैठकीमुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचे नुकसान होणार आहे.
शेती आणि मातीला बैल प्राण्याची साथ मिळाली की, बळीराजा सुखावल्याशिवाय राहत नाही. या सर्जा-राजाचा गौरव करण्याचा सण म्हणजे बैलपोळा. आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या सवंगड्याला तो रुबाबाने सजवतो व त्याचा कौतुक सोहळा साजरा करतो. बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Читать полностью…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने माजी आमदार श्री. दिलीप सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'शिक्षक सेल राज्यप्रमुख (K. G. to P. G.)' या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Читать полностью…महाराष्ट्रातील मराठवाड्यात ०१ जानेवारी २०२३ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी सर्वाधिक १८६ आत्महत्या हे राज्याच्या कृषि मंत्र्यांच्या जिल्ह्यात झाले असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सत्तेवर येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य' करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा फोल ठरत असतानाच त्यांच्याच मंत्री मंडळातील कृषि मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होणे हे वेदनादायक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांना मानसिक आणि आर्थिक धीर देण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात.
https://www.esakal.com/maharashtra/agriculture-minister-dhananjay-mundes-district-has-the-highest-number-of-farmer-suicides-rad88
भूदान चळवळीचे प्रणेते, समाज सुधारणेसाठी आपले आयुष्य वेचणारे महान स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Читать полностью…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आजी- माजी खासदार, आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटल सेलच्या सर्व राज्यप्रमुखांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माननीय खासदार अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आ. अनिल देशमुख, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री व आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, माजी खासदार व पक्षाचे मराठवाडा समन्वयक जयसिंगराव पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, विधान परिषदेच्या माजी आ. विद्याताई चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर व महाराष्ट्रातील इतर अनेक युवती कार्यकारणी उपस्थित होत्या.
नवनियुक्त युवती पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे:-
श्वेता खरात : प्रदेश सरचिटणीस
सुखमीत कौर : प्रदेश सरचिटणीस
सायली बालिद : प्रदेश सचिव
प्रियंका सोनार : कोकण समन्वयक
डॉ. ऐश्वर्या पवार : नाशिक निरीक्षक
संख्या पोवार : रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष
धनश्री कुदळे तडवळकर : औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष
स्नेहा मोठे : लातूर जिल्हा अध्यक्ष
शितल बोराटे : जालना जिल्हा अध्यक्ष
श्वेता दुरूगकर : उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष
दिपाली अरिंगळे : नाशिक जिल्हा अध्यक्ष
तिथल पावरा : नंदुरबार जिल्हाध्यक्ष
रश्मी अरघोडे : नागपूर जिल्हा अध्यक्ष
सर्व नवनियुक्त युवती पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!!
शैक्षणिक गुणवत्ता केवळ वैयक्तिक विकासच नव्हे तर एक सुशिक्षित व सुसंस्कृत समाजही घडवण्यास कारणीभूत ठरत असते. सर्वांगीण सामाजिक प्रगतीसाठी साक्षरतेचे मूल्य प्रत्येकामध्ये रुजवण्याचा निर्धार करूया!
Читать полностью…सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्रद्रोहपणा करणा-यांचा १००% पराभव होणारच... आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत जळगावक-यांच्या साथीने 'स्वाभिमान सभा' संपन्न!
Читать полностью…