धोत्रेवाडीत 'जल जीवन'च्या गळ्यात ‘धोंडा’!
या सरकारला केवळ योजनांच्या घोषणा करून वाहवाई लुटण्याची हौस आहे. पण प्रत्यक्षात त्या योजना स्थायी स्वरूपात काम करतात का, याच्याशी या सरकारला काही घेणे-देणे नाहीये. लोकांना खोटी आश्वासने देणे, अर्धवट योजनांचे लोकार्पण करून त्यांची दिशाभूल करणे, निकृष्ट दर्जाच्या कामांच्या दुरुस्तीसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार टाकणे यातच सरकार व्यस्त आहे.
केवळ मतांसाठी मोठेपणा दाखवणारं आणि लोकांच्या व्यथांची जाण नसणारं हे असंवेदनशील सरकार आहे.
#JalJeevanMission #Dhotrewadi #NCP #Maharashtra
मुंबई कोस्टल रोडच्या वाढत्या प्रकल्प खर्चामागे दडलंय काय?
मुंबईचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी १ हजार २६२ कोटी इतक्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, ही वाढ करताना दिलेली कारणे ही न पचणारी आहेत. केंद्र सरकारने जुलै २०२२ पासून शासकीय कंत्राटातून १२ ऐवजी १८ टक्के GST वसूल करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. कोस्टल रोडचे ८४.०८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर व GST वाढीच्या तब्बल दिड वर्षांनी GST चे कारण दाखवून वाढीव निधीची तरतूद होणे याला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणायचे की आगामी निवडणुकांसाठी सुरु असलेला खाटाटोप म्हणायचा?
#MumbaiCoastalRoad #BMC #CentralGovernment #MaharashtraGovernment #NCP
https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum24h59671-txt-mumbai-today-20240128110731
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने श्री. बशीर मूर्तुझा यांची पक्षाच्या 'महाराष्ट्र प्रदेश सचिव' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री व माननीय आमदार श्री. अनिल देशमुख व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस मा. अदितीताई नलावडे यादेखील उपस्थित होत्या.
Читать полностью…पालघर तालुक्यात अनेक आदिवासी बांधव राहतात. परंतु, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जागाही नाही आणि आधारकार्ड, जातीचे दाखले, रेशनकार्ड यासारखी महत्त्वाची कागदपत्रेही नाहीत. आदिवासींसाठी अशा घरकुल योजना जाहीर करून सरकार त्यांची थट्टाच करत आहे.
केंद्र सरकार योजना जाहीर करताना मूलभूत गोष्टींचा खरंच विचार करतं का, हा प्रश्नच आहे!
मुख्य स्रोत: https://epaper.loksatta.com/article/Mumbai-marathi-epaper?OrgId=29102452a5e&eid=7&imageview=1&device=desktop
#PMJANMAN #Adivasi #NCP #Mahartashtra
सरकारने जर एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याला जाब विचारण्यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे यासाठी आमचा लढा आहे.
महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना आज लोकशाही आणि स्थानिक प्रश्नांबद्दल चर्चा केली.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #Democracy
महाराष्ट्र सरकारचं दुष्काळाच्या बाबतीत लक्षच नाही, हे दुर्दैव आहे!
गेले अडीच महिने विविध मागण्यांची विनंती करूनही महाराष्ट्र सरकार संवेदनशीलता दाखवत नसल्याचे मत महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #MaharashtraGovernment
"तुम्ही जर चांगलं काम केलं, सेवा केली तर पांडुरंग स्वतः तुम्हाला भेटायला येईल!"
सेवेतून परमार्थ प्राप्ती आणि विठ्ठल भक्तीचा वारसा याबद्दल महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी संवाद साधला.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #Marathiliterature
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोमाने काम करूया, महाराष्ट्राचे चित्र बदलूया..!
#SharadPawar #NCP #Maharashtra #Elections2024
मराठा-धनगर-लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची कुठलीच ठोस भूमिका नाही. सरकारचा डोळा फक्त निवडणूकांवर आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच सरकारची आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल सुरू आहे.
परंतु, जनतेला १००% टिकणारं आरक्षण मिळणारच नसेल, तर सरकारचं खोट्या आश्वासनांचं मायाजाल किती दिवस टिकणार?
#SupriyaSule #MarathaProtest #MarathaReservation #NCP #Maharashtra
सर्वधर्मसमभावाचा मूळ हेतूच आता धोक्यात आहे. लोकांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण होणं ही निंदनीय बाब आहे. सध्याची देशातली परिस्थिती ही संविधानाच्या तत्त्वांच्या अगदी विरूद्ध असल्याचे चित्र आहे.
#JayantPatil #NCP #RepublicDay #Maharashtra
देशातील नागरिकांच्या अधिकारावर येणारी मर्यादा ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. संविधानाने लोकांना काय अधिकार दिलेत याची उजळणी करणे आवश्यक आहे.
#JayantPatil #NCP #RepublicDay #Maharashtra
२५ कोटी लोकसंख्या आपण दारिद्र्याच्या वर आणली आहे, असे सांगणारे लोकच आता ८० कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देत आहोत असे सांगायला लागले आहेत..!
#JayantPatil #NCP #RepublicDay #Poverty
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांची पक्षाच्या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सेलच्या 'राज्यप्रमुख' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माननीय आमदार सुनील भुसारा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Читать полностью…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी वाढत्या महागाईच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Читать полностью…महाविकास आघाडी काळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलली गेली. महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषा भवनासाठी जागा उपलब्ध करून देत त्याचे भूमिपूजनही केले होते.
आजचे महायुती सरकार हे गेले दीड वर्ष केवळ मराठी भाषेचा मुद्दा राजकारणासाठी वापरत असून वास्तवात मात्र मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडून एकही पाऊल उचलले गेलेले नाही.
राज्यात मराठी भाषेला उचित आदरासाठी ताटकळत राहावे लागत आहे हीच खरी शोकांतिका आहे.
#Marathi #marathibhasha #NCP #Mahartashtra
आत्मनिर्भर भारत'चा राम मंदिरातच फज्जा !
मंदिर बनवले... फारच उत्तम! पण त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक अद्ययावत सुरक्षा प्रणाली परदेशातून आयात करावी लागणे यात केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे अपयश दिसून येते. सांस्कृतिक वारसा जपताना आधुनिक तंत्रज्ञान व औद्योगिक विकासाला चालना देण्यात सरकार कमी पडत आहे.
#RamMandir #MakeInIndia #Ayodhya #NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बिहारमधली राजकीय अस्थिरता, नितीश कुमार यांचे बदलते धोरण, आणि जनतेची होणारी दिशाभूल यावर पत्रकारांशी बोलताना परखड प्रतिक्रिया दिली.
#SharadPawar #BiharPoliticalCrisis #NitishKumar #NCP
आज पत्रकारांशी बोलताना महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली.
बिहारच्या राजकीय भुकंपावर देखील लोकशाही आणि संविधानाचा आधार घेत उत्तर दिले.
#SupriyaSule #Maharashtra #BiharPolitics #NCP
'सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून जी दडपशाही चालू आहे त्याविरोधात आमचा लढा जारी राहील.'
महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या दडपशाही भूमिकेविरोधात टीका केली.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #ED #CentralGovernment #MaharashtraGovernment
मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंबंधी मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आम्ही सत्तेत आल्यावर या समाजाच्या लोकांना १००% न्याय देऊ.
महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी आरक्षणासंबंधी आशावादी विधान केले.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #MaharashtraGovernment
महाराष्ट्राचे संत साहित्य हे तत्कालीन समाजापुरते मर्यादित नाही, आजच्या समाजालाही आपल्या संतांच्या भक्तिमय साहित्याची ओळख असायला हवी. संत साहित्यातून संतांनी विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे.
महासंसदरत्न खा. मा. सुप्रियाताई सुळे यांनी आज महाराष्ट्राची संत परंपरा आणि आपले संस्कार याबद्दल जनतेशी संवाद साधला.
#SupriyaSule #NCP #Maharashtra #MarathiLiterature
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे कोकणातील शेतकर्यांच्या उद्धारासाठीचे योगदान, साहेबांचा जनतेशी असणारा संपर्क आणि त्यांचे नेतृत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा, पक्ष फोडीचे राजकारण, आमदार अपात्रता सुनावणी, प्रशांत यादव यांची दूरदृष्टी याबद्दल परखड मत व्यक्त केले.
#JayantPatil #NCP #Maharashtra
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी।।
या वचनाचा उपयोग केंद्र सरकार फक्त मतांचं राजकारण करण्यासाठीच करतं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पूजनीय व्यक्तिमत्त्वाचा अशा प्रकारे वापर करणं निश्चितच अपमानास्पद आहे, आणि या अपमानाचा बदला महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही!
#ChhatrapatiShivajiMaharaj #RepublicDay #NCP #Maharashtra
देशातील जनतेला संविधानाचं महत्त्व पुन्हा एकदा ७५ वर्षांनंतर पटवून देणं काळाची गरज आहे. यासाठी जनतेनेच एकत्र यायला हवं..!
#JayantPatil #NCP #RepublicDay #Maharashtra #SharadPawar
न्यायव्यवस्था, प्रशासन यांच्यावर सातत्याने अंकुश ठेवला जातो आहे याची सामान्य माणसाला चिंता वाटू लागली आहे. ही प्रजासत्ताक भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने बाधा आणणारी गोष्ट आहे.
#JayantPatil #NCP #RepublicDay #Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. जरांगे पाटील, सरकारची आश्वासने, टाळलेली जबाबदारी, सर्वेक्षणाचा दिखाऊपणा अशा अनेक विषयांवर त्यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले.
#JayantPatil #NCP #RepublicDay #MarathaProtest #MarathaReservation
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी देशातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर भाष्य केले व उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले.
देशात संविधानाची होणारी पायमल्ली, सामान्य माणसाच्या अधिकारांवर येणार्या मर्यादा, सर्वधर्मसमभावाबद्दलचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू, धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार आणि भूमिका, व गरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नांबद्दल सरकारला नसलेली चाड या मुद्द्यांवर त्यांनी परखड वक्तव्य केले.
#JayantPatil #NCP #RepublicDay #Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने श्रीमती राधिका देवदत्त हंकारे यांची पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या 'राज्यप्रमुख' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माननीय आमदार सुनील भुसारा यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Читать полностью…‘किसान संपदा’ योजना पंतप्रधानांनी केवळ भाजप नेते आणि त्यांच्या परिवारासाठी सुरू केलेली आहे वाटतं..!!!
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यानंतर, भाजपचे आणखी एक नेते, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांनी देखील आपल्या सत्तेचा वापर करून १० कोटींचा निधी स्वतःच्या कन्या, सुप्रिया गावित यांच्या फर्मकडे वळवला.
पंतप्रधानांनी जरा डोळे उघडून पाहिलत तर बरं होईल, सर्वसामान्य जनतेने तुम्हाला, तुमच्या पक्षाला केंद्रात स्थान दिलेले आहे.