Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation. --------------------------------------- © An official channel of www.spardhavahini.com
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
डेन्मार्कद्वारे बनविले जाणार जगातील पहिले ‘ऊर्जा बेट (Energy Island)’
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
डेन्मार्क सरकारमार्फत उत्तर समुद्रात जगातील पहिले ‘ऊर्जा बेट (Energy Island)’ तयार करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
युरोपियन देशातील ३० दशलक्ष कुटुंबांची विजेची गरज भागविण्यासाठी पुरेशी हरित ऊर्जा हे बेट साठवून ठेवेल अशी अपेक्षा आहे.
ठळक मुद्दे
या उर्जा बेटाचा वापर अंदाजे 3 दशलक्ष युरोपियन कुटुंबांच्या विजेच्या मागणीसाठी पुरेसे हरित उर्जा उत्पादन आणि साठवण्यासाठी केला जाईल.
उत्तर समुद्रातील हे कृत्रिम बेट फुटबॉलच्या 18 मैदानाच्या आकाराइतके असेल.
हे ऊर्जा बेट घरांना वीजपुरवठा करण्यासाठी शेकडो ऑफशोअर विंड टर्बाइनशी जोडले जाईल.
याचा उपयोग जड वाहतूक, नौवहन, विमानचालन आणि उद्योगात वापरण्यासाठी ग्रीन हायड्रोजन पुरवण्यासाठी देखील केला जाणार आहे.
ऊर्जा बेट:
हे ऊर्जा बेट उत्तर समुद्रात बांधले जाईल.
डेन्मार्कच्या पश्चिम किनाऱ्यापासून 80 किलोमीटर अंतरावर हे बांधले जाईल. या उर्जा बेटाभोवती पवन टर्बाईन वेढला जाईल आणि त्याची आरंभिक क्षमता 3 GW असेल.
डेन्मार्कने 2033 पर्यंत ऊर्जा बेट सुरू करण्याची योजना तयार केली आहे.
1990 च्या पातळीच्या तुलनेत 2030 पर्यंत ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 70% कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून डेन्मार्कने हे उर्जा बेट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर समुद्र (North Sea):
हा अटलांटिक महासागराचा समुद्र आहे.
हा समुद्र ग्रेट ब्रिटनने वेढला गेलेला आहे, त्याशिवाय या समुद्राला डेन्मार्क, जर्मनी, नॉर्वे, बेल्जियम, फ्रान्स आणि नेदरलँड्सची सीमा आहे.
उत्तर समुद्र इंग्लिश खाडी द्वारा दक्षिणेस महासागर आणि उत्तरेस नॉर्वेजियन समुद्रास जोडतो.
स्रोत : दै. जागरण जोश.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahi
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌
एरो इंडिया शो
🗓 08 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अलीकडे बेंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशन (कर्नाटक) येथे एरो इंडिया शोची 13 वी आवृत्ती पार पडली.
• एरो इंडिया हा द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय सैन्य आणि नागरी हवाई शो आहे.
• आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सैन्य आणि नागरी विमान उत्पादक कंपन्या व त्या संबंधित उद्योग, यांच्या साठी हा शो महत्वाचा आहे.
• या शोची सुरुवात 1996 मध्ये बंगळुरूमध्ये झाली होती.
एरो इंडिया 2021:
• हा या प्रकारातील पहिलाच 'हायब्रीड' शो आहे, म्हणजेच यामध्ये लोक डिजिटल पद्धतीने देखील सहभागी होऊ शकले.
• एरो इंडिया 2021 साठी केंद्रीय क्षेत्र 'हिंदी महासागर प्रदेश' (आयओआर) हे आहे.
• हा शो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) द्वारे आयोजित केला गेला.
• जगातील अव्वल विमान कंपन्यानी यामध्ये भाग घेतला होता.
• या शो दरम्यान, सरकारने सरकारी एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून 83 तेजस लढाऊ विमाने खरेदीसाठी 48000 कोटी रुपयांच्या करारावर औपचारिक स्वाक्षरी केली.
स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌
'नाट्यसंपदा'च्या संचालिका विजया पणशीकर यांचे निधन
🗓 06 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• दर्जेदार नाटकांच्या निर्मितीने मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या 'नाट्यसंपदा' संस्थेच्या संचालिका आणि नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या पत्नी विजया पणशीकर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
• नाट्यसंपदा संस्थेने 'तो मी नव्हेच', 'अश्रृंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यू', 'बेईमान', 'कट्यार काळजात घुसली' यांसह अनेक लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली आहे.
• १९६३ साली नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेची स्थापना करण्यात आली.
स्रोत : लोकसत्ता, लोकमत
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
87 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द.
🗓 3 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळवली आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,
• तब्बल 87 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
• करोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यावर्षी उशिरा सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
• रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक दिवसांच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे.
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
भारताचे नवीन अस्त्र -‘वॉरियर ड्रोन’.
🗓 3 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारताच्या पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची प्रतिकृती बनवण्याचे काम सुरु आहे. बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ‘वॉरियर’ असे या ड्रोनचे नाव आहे.
• CATS किंवा कॉमबॅट एअर टीमिंग सिस्टिम या स्वदेशी कार्यक्रमातंर्गत हे ड्रोन विकसित करण्यात येत आहे.
• ‘वॉरियर’ ड्रोन हे मानव आणि मानवरहीत प्लॅटफॉर्मचं असं मिश्रण आहे, जे शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदण्यास सक्षम आहे.
• भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानासोबत संचालन करण्याच्या दृष्टीने ‘वॉरियर’ ड्रोन बनवण्यात येत आहे. युद्धभूमीमध्ये दोन्ही विमानं एकत्र असताना ‘वॉरियर’ ड्रोन ‘तेजस’चे रक्षणही करेल आणि शत्रूवर हल्लाही करेल, तीच वॉरियर ड्रोनच्या निर्मिती मागची संकल्पना आहे.
• पुढच्या तीन ते पाच वर्षात ‘वॉरियर’ ड्रोनचे पहिले प्रोटोटाइप हवेत झेपावेल, अशी अपेक्षा आहे. एचएएलकडून यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.
• प्रत्येक हवाई मोहिम यशस्वी करणे आणि वैमानिकाच्या जीवाला असणारा धोका कमी करणे, ही या वॉरियर ड्रोनच्या निर्मितीमागची कल्पना आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांनी वॉरियर ड्रोन सुसज्ज असेल.
• वॉरियर ड्रोन पूर्णपणे स्टेल्थ नाहीय. स्टेल्थ विमान रडारला चकवा देण्यास सक्षम असते. हे सेमी स्टेल्थ प्रकारातील विमान आहे. त्यामुळे सहजासहजी शत्रूच्या रडारला सापडणार नाही. युद्धात उपयोगी पडणारे ड्रोन विमान विकसित करण्यासाठी एचएएल मागच्या पाचवर्षापासून काम करत आहे.
• भारताकडे सध्या असलेल्या ड्रोन विमानांमधून टेहळणी करता येते. पण शत्रूच्या प्रदेशात हवाई हल्ला करु शकणारे ड्रोन विमान नाहीय. भारताने सध्या टेहळणी बरोबरच युद्ध लढू शकणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिला आहे.
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
SPARDHAVAHINI Explained
आर्थिक सर्वेक्षण 2020-21 (सारांश)
स्रोत : पीआयबी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌
ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांचे निधन
🗓 01 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• मानवी जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले.
• डॉ. केळकर यांच्या हस्ते इलाही यांच्या 'दोहे इलाहींचे खंड १ व २' या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले होते. पंडितजींनी इलाही यांना दरमहा 'कृतज्ञता निधी' गेले कित्येक महिने सुरू ठेवला होता.
• जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. वयाच्या १८ व्या वर्षीपासून त्यांनी काव्यलेखन सुरू केले.
• आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम करणाऱ्या इलाही यांनी मराठी, हिंदी, उर्दू भाषेमध्ये कविता व गझललेखन केले.
• नवोदित कवींसाठी 'इलाही गझल क्लिनिक' या नावाने ते कार्यशाळा घेत असत.
• त्यांच्या मराठी काव्यरचना मराठी सुगम संगीत आणि 'स्वरचित्र' या कार्यक्रमांतून सादर झाल्या होत्या.
• 'जखमा अशा सुगंधी', 'भावनांची वादळे', 'दोहे इलाहीचे', 'मुक्तक', 'अनुराग', 'अनुष्का', 'अभिसारिका' आणि 'गुंफण' हे त्यांचे कविता आणि गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत.
स्रोत : लोकसत्ता, लोकमत
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
केपी ओली शर्माः नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधानांचीच पक्षातून हकालपट्टी
🗓 28 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत ओली यांच्या पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्श्वभूमी :
• नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाने संसद बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ती मान्य केली आहे.
• राष्ट्रपतींनी देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.
• आता नेपाळमध्ये 30 एप्रिल ते 10 मे दरम्यान दोन टप्प्यात निवडणूक पार पडेल.
• राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ओली सरकारनं राजधानी काठमांडूमधील सुरक्षा वाढवली आहे.
• दरम्यान, केपी ओली यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यांच्या या निर्णयाला विरोध करत 7 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
• रविवारी (20 डिसेंबर) सकाळी मंत्रिमंडळाच्या तातडीची बैठक बोलावण्यात आली आणि त्यात संसद बरखास्त करण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला.
• नेपाळच्या घटनेचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते, नेपाळमध्ये संसद बरखास्त करण्याबाबत कुठलीच स्पष्ट तरतूद घटनेत नाही. पंतप्रधानांचं पाऊल घटनेविरोधात असून, कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं.
स्रोत : बीबीसी मराठी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
📋 पद्म पुरस्कार 2021
Spardhavahini Explained
--------------------
यंदाच्या पद्म पुरस्कारांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
JOIN : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
'माय पॅड माय राईट' प्रोजेक्ट
🗓 25 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
'सेंट्रल बँक ऑफ इंडिया' आणि 'एन ए बी फाउंडेशन' यांनी जानेवारी 2021 मध्ये सामंजस्य करार केला असुन त्यानुसार, सेंट्रल बँक नाबार्ड पुरस्कृत 'माय पॅड माय राईट प्रोजेक्ट' प्रकल्प चालविणा-या सर्व बचत गटांना भांडवल पुरवठा करणार आहे.
'माय पॅड माय राईट' प्रोजेक्ट
• या प्रकल्पांतर्गत, देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक पॅड बनविण्याच्या मशिन बनविण्यासाठी चांगले काम करणा-या बचत गटांना अपेक्षित क्षमता वाढविण्याकरिता प्रति युनिट सुमारे 5 लाख रुपये अनुदान सहाय्य दिले जाणार आहे.
• या प्रकल्पाला नाबार्डकडून येत्या तीन वर्षांत सुमारे 50 कोटी रुपयांचा भांडवल पुरवठा मिळणार आहे.
• 'एन ए बी फाउंडेशन' ही राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
स्रोत : पीआयबी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________________🖌
क्वांटम कंप्यूटिंग एप्लीकेशन प्रयोगशाळा
🗓 22 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
● इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील पहिली क्वांटम कंप्यूटिंग एप्लीकेशन प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) बरोबर सहकार्य कराराची घोषणा केली आहे.
● या नवीन प्रयोगशाळेचा उद्देश संगणक विकासक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक समुदायांना क्वांटम कंप्यूटिंगच्या विकासासाठी योग्य वातावरण प्रदान करणे आहे.
● या प्रयोगशाळेतील संशोधकांना विषय तज्ञांशी काम करण्यास आमंत्रित केले जाईल. निवडक अर्जदारांना क्वांटम संगणन हार्डवेअर, सिम्युलेटर आणि प्रोग्रामिंग उपकरणे पुरविली जातील.
● तथापि, ही नवीन प्रयोगशाळा 'नॅशनल मिशन ऑन क्वांटम टेक्नोलॉजीज अँड एप्लीकेशन' (एनएम-क्यूटीए) च्या कक्षेत येते का हे अद्याप समजू शकलेले नाही.
पार्श्वभूमी
● केंद्र सरकारने गेल्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात (२०२०-२१) क्वांटम टेक्नोलॉजीज अँड एप्लिकेशन्स (एनएम-क्यूटीए) च्या राष्ट्रीय मिशन अंतर्गत पाच वर्षांसाठी 8000 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली होती.
● क्वांटम संगणनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करणे आणि अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरा मोठा देश बनविणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.
● अनेक देशांद्वारे या प्रदेशात क्वांटम संगणन तंत्रज्ञानाची गुंतवणूक केली जाण्याचे महत्त्व लक्षात घेता चीनने आपल्या ‘क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स फॉर नॅशनल लॅबोरेटरी फॉर क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स’ मध्ये १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
राज्यात स्टार्स प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
🗓 21 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results for States- STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
• या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा राज्यांची परफारर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मधील कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.
• या योजनेवर केंद्र शासन ६० राज्य शासन ४० टक्के या प्रमाणात खर्च करील.
• हा प्रकल्प पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी असून प्रकल्पाच्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ९७६.३९ कोटी रकमेची गरज लागणार आहे. यात केंद्र शासनाकडून ५८५.८३ कोटी तर राज्य शासनाकडून ३९०.५६ कोटी रुपयांचा निधी पाच वर्षाच्या कालावधीत उपलब्ध करून दिला जाईल.
• पुर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, नियमित व गतीशील प्रयत्नांनी अध्ययन निष्पती सुधारण्यावर भर देणे, योग्य व एकात्मिक शिक्षण देण्याच्या प्रयत्नांवर भर देणे, शाळांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक व्यवस्था पारदर्शक बनवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची निश्चिती करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर लक्ष केंद्रीत करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
स्रोत : लोकसत्ता, दृष्टी आयएएस
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌
बेस्ट CM च्या यादीत उद्धव ठाकरे देशात पाचवे
🗓 17 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. बेस्ट सीएमच्या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे.
• एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं.
• या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
• पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री
1. नवीन पटनायक (ओडिशा)
2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)
3. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
4. पी. विजयन (केरळ)
5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
6. भूपेश बघेल (छत्तीसगड)
7. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
8. शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
9. प्रमोद सावंत (गोवा)
10. विजय रुपाणी (गुजरात)
खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री
1. त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
2. मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
3. कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
4. के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
5. के. पलानीस्वामी (तामिळनाडू)
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. शशिकुमार चित्रे यांचे निधन
🗓 12 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• ज्येष्ठ गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचे सोमवारी मुंबई येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
• खगोलशास्त्रातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून चित्रे यांची ओळख होती.
• सौर भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र हे त्यांच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय होते. सौर डाग, सूर्याचे प्रभामंडळ आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र यांवर त्यांनी संशोधन केले होते.
• त्यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• चित्रे यांचा जन्म १९३६ मध्ये झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयांतून गणित विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
• यानंतर परदेशी शिक्षणासाठीची मानाची 'ड्युक एडिन्बर्ग' शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले.
• काही काळ लीड्स विद्यापीठात अध्यापन केले. त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथेही त्यांनी संशोधनाचे काम केले.
• चित्रे हे १९६७ मध्ये भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. २००१ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते याच संस्थेत कार्यरत राहिले.
• मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस याच्या उभारणीतही त्यांचे मोठे योगदान आहे.
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) तीन महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद.
🗓 11 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) तीन महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद असणार आहे. याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती दिली.
• नुकताच भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अस्थाई स्वरुपी सदस्य म्हणून आपला आठवा कार्यकाळ सुरू केला आहे. याआधी भारताची 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78,1984-85, 1991-92 आणि 2011-12 या वर्षात सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
• भारताला सुरक्षा परिषदेच्या तीन महत्त्वांच्या समित्यांचे अध्यक्षपद मिळणार आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
1) तालिबान निर्बंध समिती,
2) लिबियन मंजुरी समिती आणि
3) दहशतवादविरोधी समिती
• अफगाणिस्तानबद्दल असलेली शांतता, सुरक्षा, विकास आणि प्रगती याविषयीची भारताची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे.
• तालिबान प्रतिबंध समितीचे अध्यक्ष झाल्याने अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या प्रायोजकांवर लक्ष केंद्रित करण्यास भारताला मदत होईल. या समितीला 1988 ची मंजुरी समिती (1988 Sanctions Committee) म्हणून देखील ओळखले जाते.
• लिबिया मंजूरी समिती निर्बंध लादते. समितीने मालमत्ता गोठवणे, द्विमार्गी शस्त्रास्त्र बंदी, प्रवासी निर्बंध इ. निर्बंध लादले आहेत.
• 2022 मध्ये भारत दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्ष भूषवणार आहे. सप्टेंबर 2001 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी सन 2011-12 मध्ये भारताने या समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)
• संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही सर्वात शक्तिशाली आणि संयुक्त राष्ट्राच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे.
• सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.
• सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. म्हणजे पाच स्थायी सदस्य (चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका) तसेच दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.
• दहा अस्थायी सभासद राष्ट्र
1) एस्टोनिया (2020-21)
2) भारत (2021-22)
3) आयर्लंड (2021-22)
4) केनिया (2021-22)
5) मेक्सिको (2021-22)
6) नायजर (2020-21)
7) नॉर्वे (2021-22)
8) सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (2020-21)
9) ट्युनिशिया (2020-21)
10) व्हिएतनाम (2020-21)
• दर वर्षी दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी 10 पैकी 5 अस्थायी सदस्यांची निवड करण्यात येते. या 10 जागा क्षेत्रीय आधारावर ठरवण्यात येतात. पाच जागा या आफ्रिका आणि आशियाई देशांसाठी, एक पूर्व युरोप, दोन लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देश आणि दोन पश्चिम युरोप आणि अन्य देशांसाठी असतात. परिषदेत निवडून जाण्यासाठी दोन तृतीयांश देशांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.
• सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात. कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो. यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
• कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.
स्रोत : महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत. https://www.un.org/securitycouncil/
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे 9 फेब्रवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक ‘राम तेरी गंगा मैली’(1985) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ (1996)या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलं होतं.
राजीव कपूर यांचे काही गाजलेले चित्रपट
ज़िम्मेदार '(1990), नाग नागिन '(1989) ,शुक्रीया (1988),हम तो चले परदे '(1988), ज़लज़ला (1988), प्रीति (1986),लवर बॉय (1985), राम तेरी गंगा मैली '(1985), ज़बरदस्त (1985), लावा (1985), मेरा साथी '(1985), प्लाज्मा (1984), एक जान हैं हम '(1983)
निर्माता:
आ अब लौट चलें (निर्माता)
प्रेम ग्रंथ (कार्यकारी निर्माता)
हिना (कार्यकारी निर्माता)
स्रोत : लोकसत्ता. TIMES OF INDIA.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
गोबर धन एकात्मिक पोर्टल
🗓 08 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• बायोगॅस योजना / उपक्रमांच्या योग्य अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी अलीकडेच गोबर-धन (युनिफाइड पोर्टल ऑफ गोबर-धन) चे एकात्मिक पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
• या पोर्टलचे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग समन्वय करेल.
काय आहे गोबर-धन योजना?
• गोबर-धन (Galvanizing Organic Bio-Agro Resources Dhan - GOBAR-DHAN) योजना जलशक्ती मंत्रालयाने सुरू केली आहे.
• अंमलबजावणी : स्वच्छ भारत मिशनचा एक भाग म्हणून ही योजना राबविली जात आहे.
• घटक : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मधे गावे स्वच्छ करण्यासाठी दोन मुख्य घटक आहेत - ओपन डेफिकेशन फ्री (हागणदारी मुक्त) गावे बनविणे आणि खेड्यांमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन करणे.
• उद्देश : गावे स्वच्छ ठेवणे, ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे आणि गुरांद्वारे तयार होणाऱ्या कचऱ्यापासून उर्जा निर्माण करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
• या व्यतिरिक्त गावपातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करुन शेतकरी व इतर ग्रामस्थांचे उत्पन्न वाढविणे.
स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक जिंकला.
🗓 3 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघानं सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या जेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्धच्या प्रभावी गोलंदाजीला फलंदाजांचे योगदान लाभल्यामुळे तामिळनाडूनं अंतिम फेरीत बडोद्याचा सात गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला.
• तामिळनाडूनं 13 वर्षानंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवलं.
• 2006-07 नंतर तामिळनाडूचे हे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (एसएमएटी) चे विजेतेपद आहे. बडोदाने दोन वेळा (2011-12 आणि 2013-14 मध्ये) हे विजेतेपद जिंकले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
• सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केले आहे.
• रणजी करंडक संघांदरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाते.
• ट्रॉफीचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेट सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावर आहे.
• 2006-07 मध्ये ही स्पर्धा सुरु झाली. यामध्ये 5 झोनमधील 27 रणजी टीम ने भाग घेतला होता.
• सुरवातीला आंतरराज्य टी-20 अजिंक्यपद असे नाव देण्यात आले.
• गुजरात आणि बडोदाने ही स्पर्धा 2-2 वेळा जिंकली आहे.
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द ईयर : ‘ऑक्सफर्ड’चे ‘आत्मनिर्भरता’वर शिक्कामोर्तब!
🗓 3 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• ‘आत्मनिर्भरता’ हा 2020 या वर्षांतील महत्त्वाचा हिंदी शब्द ठरला आहे, असे ऑक्सफर्ड भाषा विभागाने म्हटले आहे. भारतीय लोकांनी करोना काळामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक आव्हानांचा सामना करीत मोठी कामगिरी केली. आत्मनिर्भरता (स्वयंसहायता या अर्थाने) या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय व इमोगेन फॉक्सेल यांनी केली आहे.
• ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार, या हिंदी शब्दात संपूर्ण वर्षांतील भावना व इतर सर्व गोष्टी व्यक्त झाल्या आहेत, त्यामुळे 2020 मधील महत्त्वाचा हिंदी शब्द म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.
• करोनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भारताचे कोविड पॅकेज जाहीर केले तेव्हा त्यांनी देशाला स्वयंपूर्णतेचे आवाहन केले होते. कारण त्यावेळी अर्थव्यवस्था, समाज व व्यक्ती असे सर्वच घटक एका कधीही सामोऱ्या न गेलेल्या स्थितीतून मार्गक्रमण करीत होते. आत्मनिर्भरता या शब्दांचा वापर त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नंतरच्या अनेक भाषणांतून केला होता. त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडीही हा शब्द आला.
• आत्मनिर्भर भारत मोहीम ही कोविड काळात उत्पादन क्षेत्रात राबवण्यात आली. प्रजासत्ताक दिन संचलनात जैवतंत्रज्ञानावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता त्यात कोविड लस विकसन प्रक्रिया भारताने स्वबळावर केल्याचे दाखवण्यात आले होते.
• लोकप्रिय शब्दासाठी अनेक प्रवेशिका आल्या होत्या त्यातून आत्मनिर्भरता या शब्दाची निवड केली आहे. कारण दैनंदिन जीवनात हा शब्द अनेक भारतीयांनी वापरला. या शब्दाने आबालवृद्धांना सामर्थ्य दिले आहे.
• ऑक्सफोर्ड हे जगभरात बोलल्या जाणार्याआ विशिष्ट भाषांमध्ये बोलल्या जाणार्या आणि नवीन शब्दांच्या अभिसरणांवर एक विशेष नजर ठेवत असते. ऑक्सफोर्ड डिक्शनरी जगभरात प्रसिद्ध आहे आहे आणि जगभरातील लोक नवीन शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी या डिक्शनरीचा वापर करतात.
यापूर्वी चे ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द ईयर खालील प्रमाणे :
• 2017 : आधार,
• 2018 : नारी शक्ती
• 2019 : संविधान.
स्रोत : लोकसत्ता, दैनिक भारत.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांची नियुक्ती.
🗓 03 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
• अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या समिक्षा पथकाच्या सदस्या म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासाने एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
• भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.
• भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी भाव्या नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅीडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अॅ डव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.
• भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केलं आङे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अॅननालिसिस सायन्स अॅ ण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या.
• एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे.
• अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.
• अंतराळ क्षेत्रातील संशोधनामध्ये भाव्या यांनी मोठं योगदान दिलं आहे. आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अॅंस्ट्रोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. अणू विज्ञान म्हणजेच न्यूक्लिअर सायन्स या विषयात भाव्या यांनी बीएससी आणि एमएसस्सीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. इतकचं नाही तर सार्वजनिक प्रशासन या विषयामध्येही भाव्या यांनी डॉक्टरेटचं शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयक अनेक कार्यक्रमांच्या आणि संस्थांचं प्रमुख पद भूषवणाऱ्या भाव्या यांच्यावर आता थेट नासाच्या कार्यकारी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
• भाव्या लाल या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहे. कोणत्या अंतराळ मोहिमांसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी आता भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.
स्रोत : लोकसत्ता. महाराष्ट्र टाइम्स.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
भ्रष्टाचार निर्देशांक 2020
---------------------
JOIN : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा
🗓 28 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
इटलीचे पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. इटलीसमोर सध्या कोरोनाचे तसेच आर्थिक संकट आ वासून उभं असताना देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पार्श्वभूमी :
• पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांचे सरकार अल्पमतातले होते. त्यांनी आपल्या आघाडीच्या बाहेरच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. देशासमोरच्या कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा असेल तर बहुमताच्या सरकारची गरज असल्याचं सांगत त्यांनी पाठिंब्याची मागणी केली होती.
• गेल्या आठवड्यात ग्यूसेप कोन्ते यांनी सीनेटमध्ये विश्वास मताचा ठराव जिंकला होता आणि आपल्या अल्पमतातल्या सरकारला वाचवलं होतं. त्यासाठी त्यांना अनेक लहान पक्षांचा पाठिंबा मिळाला होता.
• पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांना 140 मते मिळाली होती आणि त्यावेळी 16 खासदार अनुपस्थितीत राहिले होते. कोन्ते यांना मतदान करणाऱ्यांमध्ये माजी पंतप्रधान सिलवियो बर्लुस्कोनी यांच्या पक्षाचे दोन बंडखोर खासदारही होते.
• इटलीच्या सीनेटमध्ये बहुमतासाठी 161 मतांची आवश्यकता असते.
• ग्यूसेप कोन्ते यांचे सरकारला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांनी आपला पाठिंबा काढून घ्यायचा निर्णय घेतला. त्यांनतर पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांनी आपल्या मंत्र्याना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींच्याकडे सोपवला.
• जोपर्यंत नवीन सरकारविषयी कायदेशीर सल्ला मिळत नाही तोपर्यंत ग्यूसेप कोन्ते हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील असे इटलीच्या राष्ट्रपतीनी जाहीर केलंय.
इटलीतील कोरोनाची स्थिती :
• इटलीला कोरोनाच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. इटलीत कोरोनाचे 85 हजार बळी गेले आहेत.
• युरोपमध्ये ब्रिटननंतर इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बळी गेले आहेत.
• तर, कोरोनाच्या मृतांच्या आकड्यात इटलीचा जगात सहावा क्रमांक लागतो.
स्रोत : बीबीसी मराठी, सकाळ
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌
पद्म पुरस्कार - 2021 (महाराष्ट्र विशेष)
🗓 28 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
• महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पाच जण पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
• परशुराम आत्माराम गंगावणे (कला), नामदेव सी. कांबळे (साहित्य आणि शिक्षण), गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य), जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार) आणि सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)
परशुराम आत्माराम गंगावणे
• कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील परशुराम गंगावणे यांना जाहीर झाला आहे.
• परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन आणि प्रसार करण्याचे काम करत आहेत.
• आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जोपासली असल्याने त्यांचे कार्य विशेष ठरले.
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांची कला जोपसली आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक लोककथा सादर केल्या आहेत.
• आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे.
• त्यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टही सुरू केले आहे या संग्रहालयात पपेट, चित्रकथा, कळसूत्री पहायला मिळतात.
सिंधुताई सपकाळ
• सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली.
• अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
• सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत.
• त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.
नामदेव कांबळे
• गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे.
• 'राघववेळ' या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
• वाशीममधील शिरपूर गावात शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत ते शिक्षक होते. याच शाळेत त्यांनी सुरुवातीला सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली.
• अस्पर्श,राघववेळ, ऊनसावली, साजरंग अशा आठ कांदबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, चरित्र लेखन, भाषण संग्रह असे साहित्य त्यांच्या नावावर आहे.
• डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. बालभारतीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.
गिरीश प्रभुणे
• सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे. उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी काम केले.
• 'भटके-विमुक्त समाज परिषदे'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले.
• चिंचडवड येथील 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'मधील भटक्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी त्यांनी कार्य केले.
• पारधी समाजासाठी, त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी लेखन केले.
• 'पारधी' पुस्तकाचे ते लेखक आहेत.
जसवंतीबेन जमनादास पोपट
• व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला.
• सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत.
• 80 रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून 42 हजार महिला कर्मचारी येथे काम करतात.
• मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन आणि त्यांच्या सात मैत्रीणींच्या पुढाकाराने हा उद्योग 1965 साली सुरू झाला.
• आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड घराघरात पोहचला.
स्रोत : बीबीसी मराठी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
स्पेस एक्स ने एकाच क्षेपणास्त्राच्या सहाय्याने 143 उपग्रह केले प्रक्षेपित
🗓 26 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने एकाच क्षेपणास्त्राच्या साहाय्याने 143 उपग्रह अवकाशात पाठवून एक नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे.
• हे सर्व उपग्रह फाल्कन 9 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
• फ्लोरिडाच्या कॅप कॅनावेरल येथून रविवारी रात्री 8.31 वाजता हे उपग्रह प्रक्षेपित केले गेले.
• यामध्ये 133 व्यावसायिक आणि 10 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हा कंपनीच्या स्मॉलसेट राइडशेअर प्रोग्रामचा एक भाग होता ज्याद्वारे छोट्या उपग्रह चालकांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याचे उद्दीष्ट आहे.
• यापूर्वी सन 2017 मध्ये भारताने एकाच क्षेपणास्त्राच्या साहाय्याने 104 उपग्रह अवकाशात पाठविले होते. आतापर्यंत एकाच क्षेपणास्त्राच्या साहाय्याने सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम भारताकडे होता.
स्पेस एक्स
- स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन, अर्थात 'स्पेसएक्स' ही एक खासगी अमेरिकन एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी आहे
- मुख्यालय : थॉर्न, कॅलिफोर्निया
- अंतराळ वाहतूक खर्च कमी करणे आणि मंगळ ग्रहाला मानव वसाहत योग्य करणे या उद्दीष्टाने उद्योजक एलोन मस्क यांनी २००२ मध्ये या कंपनीची स्थापना केली आहे.
स्रोत : जनसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020
🗓 25 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• निति आयोगाने 20 जानेवारी 2021 रोजी इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 जाहीर केले.
• या अहवालात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नाविन्यपूर्ण क्षमता आणि कार्यक्षमतेचे मापन केले जाते.
• निर्देशांकाची ही दुसरी आवृत्ती आहे, ऑक्टोबर 2019 मध्ये निर्देशांकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली होती.
• हा निर्देशांक निति आयोगाद्वारे इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटीटीव्हनेसच्या मदतीने तयार केला आहे.
प्रमुख राज्य श्रेणी:
• या श्रेणीमधे कर्नाटकने अव्वल स्थान कायम राखले, तर महाराष्ट्राने तामिळनाडूला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे.
• तामिळनाडू तिस-या, तेलंगणा चौथ्या, केरळ पाचव्या, हरियाणा सहाव्या, आंध्र प्रदेश सातव्या, गुजरात आठव्या, उत्तर प्रदेश नवव्या आणि पंजाब दहाव्या क्रमांकावर आहे.
• बिहारला सर्वात कमी स्थान मिळाले आहे (17 वे).
केंद्रशासित प्रदेश व लघु राज्य श्रेणी:
• या श्रेणीमधे दिल्ली 46.60 च्या गुणांसह सर्वोत्कृष्ट तर चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षद्वीपने शेवटच्या म्हणजेच नवव्या स्थानावर आहे.
ईशान्य / डोंगराळ राज्यांची श्रेणी:
• या श्रेणीमधे हिमाचल प्रदेश पहिल्या स्थानावर असून त्यानंतर उत्तराखंड, मणिपूर आणि सिक्कीम आहे. मेघालय सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.
निर्देशांक निकषः
• इनोव्हेशन इंडेक्सची गणना पाच सक्षमीकरण निकष आणि दोन परफॉरमन्स पॅरामीटर्सद्वारे केली जाते.
• मानवीय भांडवल, गुंतवणूक, ज्ञान कामगार, व्यवसाय वातावरण आणि सुरक्षा आणि कायदेशीर पर्यावरण हे पाच सक्षमीकरण निकष आहेत, तर नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन हे दोन परफॉरमन्स पॅरामीटर्स आहेत.
स्रोत : पीआयबी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________________🖌
शाहीन- III क्षेपणास्त्र
🗓 22 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
● अलीकडेच पाकिस्तानने शाहीन-II क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
● हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
● याची 2750 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
● शस्त्रास्त्र यंत्रणेच्या विविध रचना व तांत्रिक बाबी पुन्हा सत्यापित करण्याच्या उद्देशाने हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले.
भारताचे काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र:
1) शौर्य क्षेपणास्त्र
2) ब्रह्मोस क्षेपणास्त्र
3) पृथ्वी क्षेपणास्त्र
4) अग्नि क्षेपणास्त्र
स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌
बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ
🗓 21 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या 49 व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली.
• अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या लॅटिन-वंशीय न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी कमला हॅरिस यांना शपथ दिली.
• 78 वर्षांचे बायडेन हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष ठरले. तर 56 वर्षीय कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकी-भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष ठरल्या.
• मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स हे मात्र उपस्थित होते.
• याशिवाय बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा हे माजी अध्यक्षही सपत्नीक उपस्थित होते.
यापूर्वीचे अमेरिकेचे अध्यक्ष
2017-21 : डोनाल्ड ट्रम्प
2009-17 : बराक ओबामा
2001-09 : जॉर्ज डब्लू बुश
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌
मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
🗓 14 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
• गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
• याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना ही मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रसार करण्याच्या हेतूने ६ मार्च २००१ रोजी आंतरराष्ट्रीय करार आणि मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली.
आयोगाची रचना -
• राज्य मानवी हक्क आयोग ही एक बहुसदस्यीय संस्था असून यामधे एक अध्यक्ष व दोन सदस्य असतात.
• अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा निवृत्त मुख्य न्यायाधीश असावा. • सदस्य हे १) उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा कमीत कमी ७ वर्षे अनुभव असलेले जिल्हा न्यायाधीश ३) एक सदस्य मानवी हक्क संरक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती असतात.
• अध्यक्ष आणि सदस्यांची निवड ही निवड समितीच्या शिफारसीवरुन राज्यपाल करतात. या समिती मधे १) मुख्यमंजी (अध्यक्ष) २) विधानसभा सभापती ३) विधानपरिषद अध्यक्ष (जेथे विधानपरिषद अस्तित्वात असेल) ४) विधानसभा विरोधी पक्षनेता ५) विधानपरिषद विरोधी पक्षनेता (जेथे विधानपरिषद अस्तित्वात असेल) ६) राज्याचा गृहमंञी यांचा समावेश असतो.
• उच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाशी सल्लामसलत करणे आवश्यक असते.
• अध्यक्ष व सदस्य हे ५ वर्षे किंवा वयाची ७० वर्षे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पदावर कार्यरत राहतात. पदाच्या कार्यकालानंतर ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पदासाठी अपाञ असतात.
• राष्ट्रपती (राज्यपाल नाही) अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या कार्यकाळात पदावरुन दूर करू शकतात. जर तो १) दिवाळखोर असेल २) इतर ठिकाणी त्याने पगारी पद स्विकारले. ३ ) पदासाठी शारीरिक किंवा मानसिक दुर्बल असेल. ४) न्यायालयाने त्याला वेडा ठरवले असेल. ५) एखाद्या गुन्ह्यासाठी कारावास झाला असेल. याबरोबरच राष्ट्रपती अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तणूक व अकार्यक्षमता यामुळे देखील पदावरुन दूर करू शकतात.
आयोगाचे कार्य
• लोकसेवकांकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर नजर ठेवणे आणि त्या संदर्भात चौकशी करणे
• कोणत्याही कारागृहात स्थानबद्ध कैद्यांचे संरक्षण, उपचार, त्यांच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भेट देणे व शिफारशी करणे
• मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सुरक्षात्मक उपायांचा व तरतुदींचा आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा करणे.
• मानवी हक्कांसंबंधीचे करार व आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे
स्रोत : लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार
🗓 12 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.
• प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्षांची जनस्थान पुरस्कारासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जनस्थान पुरस्कार
• मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्या साहित्यिकाला येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
• दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
• सुरुवात - 1991 (पहीला- विजय तेंडुलकर)
• 2019 - वसंत आबाजी डहाके
मधू मंगेश कर्णिक
• कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक अशी साहित्य क्षेत्रात चौफेर ओळख असलेले कर्णिक यांनी महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभाग तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
• कर्णिक यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून २०१४ ते २०१९ या कालावधीत जबाबदारी सांभाळली आहे.
• १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
• आत्मचरित्र - करूळचा मुलगा
• पुरस्कार / सन्मान - ग.दि. माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार,
दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
• त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती - ’कोकणी गं वस्ती’ (पहिला कथासंग्रह), तारकर्ली, करूळचा मुलगा, जुईली, अर्घ्य, कातळ
स्रोत : लोकसत्ता, विकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
‘एनडीआरएफ’चे संयुक्त राष्ट्रांकडून प्रमाणीकरण
🗓 11 Jan 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारत आता संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण मोहिमांचा भाग बनणार असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण या वर्षांत होणार आहे.
• स्वित्र्झलडमधील इंटरनॅशनल सर्च अँड रेस्क्यू अॅ डव्हायजरी ग्रुप (इन्साराग) ही संस्था हे प्रमाणन देत असते.
• एकूण 90 देश या संस्थेचे सदस्य असून शहरी व इतर शोध मोहिमांमध्ये त्यांचे चमू सहभागी होत असतात.
• भारतात ज्या प्रमाणे भारतीय मानक संस्था आहे, तशीच संयुक्त राष्ट्रांची ‘इन्साराग’ ही संस्था मानांकन किंवा प्रमाणीकरणाचे काम करते.
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले, की भारताच्या प्रतिसाद दलास 2021 मध्ये प्रमाणन मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ते मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी मागणी केल्यास आपली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दले आपल्याला आंतरराष्ट्रीय मोहिमांसाठी पाठवावी लागतील.
• सिंगापूर व ऑस्ट्रेलियाच्या मदत पथकांनी भारताची पथके कशी काम करतात, याची पाहणी सप्टेंबर 2019 मध्ये केली होती. कोविड साथीमुळे पुढची प्रक्रिया होऊ शकली नाही. पण 2021 मध्ये भारताच्या किमान दोन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद चमूंना ‘इन्साराग’ चमू म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
• सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलात १२ बटालियन आहेत, बीएसएफ व सीआरपीएफचे प्रत्येकी तीन आणि सीआयएसएफ, आयटीबीपी व एसएसबीचे प्रत्येकी दोन बटालियन आहेत.
एनडीआरएफ :
• स्थापना: 2006; 15 वर्षांपूर्वी
• मुख्यालय: एनडीआरएफ मुख्यालय, अंत्योदय भवन, नवी दिल्ली.
• ब्रीदवाक्य: Saving Lives & Beyond
• महासंचालक: एस. एन. प्रधान, (आयपीएस).
• मूळ कायदा : आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005.
स्रोत : वृत्तसंस्था, विकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini