Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation. --------------------------------------- © An official channel of www.spardhavahini.com
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांचा राजीनामा
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी (वय 83 वर्ष) यांनी महिलांबद्दल शेरेबाजी केल्याप्रकरणी 12 फेब्रुवारीला पदाचा राजीनामा दिला.
• टोक्यो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मोरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या वारसदाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
• ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर कडाडून टीका होत होती. सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार देत त्यांनी सर्वाची माफी मागितली होती. पण पुरस्कर्ते, दूरचित्रवाणीवरून सातत्याने दबाव येऊ लागल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
• 2014 मध्ये योशिरो मोरी ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष झाले. ते जपान चे माजी पंतप्रधान आहेत.
महत्वाचे:
• जपानच्या संसदेमध्ये महिलांचा केवळ 10 टक्के हिस्सा आहे, जो जगातील सर्वात कमी (135 वा क्रमांकावर) आहे. सूचीबद्ध कंपन्यांमध्ये महिलांची उपस्थिती 5.3% आहे,
• वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2020 च्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालात 153 देशांपैकी जपान 121 व्या स्थानावर आहे.
• या जेंडर गॅपमध्ये भारत 112 व्या स्थानावर होता.
स्रोत :लोकसत्ता, नवभारत टाईम्स, लोकमत.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• या वर्षीच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले असून, पुरुष आणि महिलांच्या या स्पध्रेचे उस्मानाबाद येथे 24 ते 28 मार्चदरम्यान आयोजन करण्यात येणार आहे.
• डिसेंबर 2019 मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
• त्यानंतर मार्च महिन्यापासून देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील खो-खोची मैदाने बंद झाली.
• परंतु राज्य शासनाने आता स्पर्धेच्या आयोजनांना परवानगी दिल्याने आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आल्यामुळे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या तारखा लवकरच निश्चित होऊ शकतील, अशी आशा आहे. याचप्रमाणे अन्य वयोगटांच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र खो-खो संघटना प्रयत्नशील आहे.
• ‘‘श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल”, उस्मानाबाद येथे 24 ते 28 मार्चदरम्यान पुरुष आणि महिला गटाच्या 54व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे.
• करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच स्पर्धेची रूपरेषा आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
एस थिओडोर बास्करन यांनी सैंक्चुअरी लाइफटाइम सर्व्हिस अवॉर्ड 2020 जिंकला
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• लेखक, इतिहासकार, निसर्गवादी आणि कार्यकर्ते असलेल्या एस थिओडोर बास्करन यांनी सैंक्चुअरी लाइफटाइम सर्व्हिस पुरस्कार, 2020 (Sanctuary Lifetime Service Award 2020) जिंकला आहे.
• सैंक्चुअरी नेचर फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
• एस थिओडोर बास्करन यांची वन्यजीव संवर्धनाबद्दलचे योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
• इंग्रजी आणि तामिळ भाषेत पर्यावरण संरक्षणाबद्दल त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे
एस थिओडोर बास्करन:
• त्यांचा जन्म 1940 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला होता.
• ते एक भारतीय चित्रपट इतिहासकार आणि वन्यजीव संरक्षक आहे.
• 1960 मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून इतिहासाची बी.ए. (ऑनर्स) पदवी घेतली.
• त्यांनी तामिळनाडू राज्य अभिलेखामध्ये संशोधक म्हणून काम केले.
• नंतर 1964 मध्ये ते भारतीय टपाल सेवेत विभागीय अधीक्षक म्हणून रुजू झाले.
• शिलॉंगमध्ये 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी “युद्ध-प्रयत्नासाठी विशेष अधिकारी” म्हणून काम केले.
इंग्रजी भाषेतील त्यांची काही पुस्तके:
• डान्स ऑफ द सार्स: एसेज ऑफ वंडरिंग नेचुरलिस्ट; बुक ऑफ इंडियन डॉग्स, डे विथ शमाः एसेज ऑन नेचर.
स्रोत : द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
संयुक्त राष्ट्र सरचिटणीसपदासाठी आकांक्षा अरोरा यांची उमेदवारी.
🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• संयुक्त राष्ट्रातील भारतीय वंशाच्या कर्मचारी आकांक्षा अरोरा (वय 34) यांनी सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून सध्याचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस हेही पुन्हा पाच वर्षांसाठी या पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
• जानेवारी 2022 पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नवीन प्रमुखांचा कार्यकाल सुरू होणार आहे. अरोरा या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम विभागातील लेखा समन्वयक आहेत.
• त्यांनी ‘अरोरा फॉर एसजी’ या हॅशटॅगने प्रचार मोहीम सुरू केली आहे. माझ्यासारख्या पदावरील कुणी ही निवडणूक लढवण्याचे धाडस करणार नाही, पण मी ते करत आहे. रोज कामावर जायचे. मान खाली घालून काम करायचे व जग जसे आहे तसे स्वीकारायचे, या चाकोरीपलीकडे जाण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. आकांक्षा यांनी चित्रफितीत म्हटले आहे, की ‘यापूर्वी जे लोक संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख होऊन गेले त्यांनी त्यांचे उत्तरदायित्व निभावले असे वाटत नाही.’
• गेल्या ७५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. निर्वासितांचे संरक्षण केले नाही. मानवतावादी मदतीचा हात पुढे केला नाही. तंत्रज्ञान व नवप्रवर्तनाला प्राधान्य दिले नाही. संयुक्त राष्ट्रांनी प्रगती घडवून आणायला हवी होती पण ते झाले नाही. त्यामुळे मी सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढवित आहे. केवळ बघ्याची भूमिका घेण्यात अर्थ नाही. संयुक्त राष्ट्रे आतापर्यंत जी कामगिरी केली त्यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवू शकतात.’
अँतोनियो गट्रेस (जन्म: 30 एप्रिल 1949, लिस्बन) :
• हे एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पंतप्रधान होते. ऑक्टोबर 1995 ते एप्रिल 2002 दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेले अँतोनियो गट्रेस यांनी 2005 सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
• अँतोनियो गट्रेस संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
• जानेवारी महिन्यात अँतोनियो गट्रेस (वय 71) यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पुढील पाच वर्षे या पदासाठी इच्छुक आहेत.
• गट्रेस यांची मुदत या वर्षी 31 डिसेंबरला संपत असून नवीन सरचिटणीस 1 जानेवारी 2022 रोजी पदभार स्वीकारतील. गट्रेस हे 2017 पासून सरचिटणीस पदावर आहेत. नववे सरचिटणीस असलेले गट्रेस यांनी काही पातळीवर संवादाचा प्रयत्न केला. अजून हे पद महिलेला मिळालेले नाही.
आकांक्षा अरोरा:
• त्या टोरांटोतील यॉर्क विद्यापीठातून पदवीधर झालेल्या असून त्यांनी प्रशासकीय अभ्यास विषयात पदवी घेतली आहे.
• त्यांनी सार्वजनिक प्रशासन विषयात कोलंबिया विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेतली आहे.
• त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम करताना आर्थिक पातळीवर काही सुधारणा केल्या आहेत.
• त्या भारतात जन्मलेल्या असल्या, तरी त्यांच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे.
• त्यांनी कुणाही देशाकडे उमेदवारीसाठी पाठिंबा मागितलेला नाही. आपल्या उमेदवारीने निवड प्रक्रियेत बदल होईल, असा आशावाद त्यांनी पासब्लू संकेतस्थळावर व्यक्त केला आहे.
अद्याप एकही महिला संयुक्त राष्ट्रांची सरचिटणीस झाली नाही.
अँतोनियो गट्रेस 1 जानेवारी 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे नवीन सरचिटणीस झाले.
75 वर्षांच्या इतिहासात एकाही महिलेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली नाही.
या वर्षी डिसेंबरपर्यंत सरचिटणीस निवडणुका होणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांची नियुक्ती आमसभा करीत असते व त्यासाठी सुरक्षा मंडळाची शिफारस लागते.
पाच स्थायी सदस्यांपैकी कुणीही त्यात नकाराधिकार वापरू शकतो.
ही सदस्य देशांनी चालवलेली प्रक्रिया असते. सदस्य देशच उमेदवारी ठरवू शकतात.
आजवरचे सरचिटणीस
1. ग्लॅडविन जेब (२४ ऑक्टोबर 1945 –1 फेब्रुवारी 1946)
2. दाग हामारहोएल्ड (10 एप्रिल 1953 –18 सप्टेंबर 1961)
3. उ थांट (30 नोव्हेंबर 1961 – 31 डिसेंबर 1971)
4. कर्ट वाल्डहाइम (1 जानेवारी 1972 – 31 डिसेंबर 1981)
5. हाव्हियेर पेरेझ दे क्युलार (1 जानेवारी 1982 –31 डिसेंबर 1991)
6. बुट्रोस बुट्रोस-घाली (1 जानेवारी 1992 –31 डिसेंबर 1996)
7. कोफी अन्नान (1 जानेवारी 1997 –31 डिसेंबर, 2006)
8. बान की-मून (1 जानेवारी 2007–31 डिसेंबर, 2016)
9. अँतोनियो गुतेरेस (1 जानेवारी 2017–चालू)
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा.
🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय खगोलवैज्ञानिकांना बीएस लॅसिरटी या खूप जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा दिसल्या आहेत. त्यातून त्या कृष्णविवराचे वस्तुमान ठरवता येईल, तसेच प्रकाशाच्या स्रोताचाही मागोवा घेता येईल, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे.
• या कृष्णविवरातील ज्वालेच्या विश्लेषणातून विश्वाच्या उत्पत्तीच्या अवस्थाही समजण्यास मदत होणार आहे.
• कृष्णविवरातील ज्वाला या खगोलवैज्ञानिकांच्या दृष्टीने संशोधनाचा महत्त्वाचा विषय राहिला असून त्यात भारित कणांचे प्रवाह असतात. ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. त्यामुळे या ज्वाळा विश्वातील प्रकाशमान घटक मानल्या जातात.
• बीएल लॅसिरटी मधील ज्वाळा या 10 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतरावर असून त्यातील पन्नास ज्वाळा लहान दुर्बिणीच्या मदतीनेही दिसू शकतात. होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने यातील 3 ते 4 ज्वाळा शोधल्या आहेत.
• यात आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेचे आलोक चंद्रा यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2020 पासून या ज्वाळांवर संशोधन सुरू असून त्यात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा समावेश आहे. 16 जानेवारीला त्यातील सर्वात प्रखर ज्वाळा दिसली आहे.
• संपूर्णानंद दुर्बीण नैनीताल येथे आहे तेथून ही ज्वाळा स्पष्टपणे दिसली असून यातील माहितीच्या आधारे त्या कृष्णविवराचे वस्तुमान व इतर माहिती मिळू शकते.
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
‘बँकिंग नियमन’साठी केंद्रीय समिती.
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• बँकिंग नियमन कायदा 2020 आढावा घेण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी? याबाबत केंद्रीय समिती स्थापन करण्याची नागरी सहकारी बँकांची मागणी केंद्रीय अर्थमंत्रालयाने मान्य केली आहे.
• या समितीचे अध्यक्षपद रिझव्र्ह बँकेकडे (आरबीआय) देऊ नये आणि समितीमध्ये नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, या मागण्याही नागरी सहकारी बँकांनी केल्या आहेत.
• देशात 26 जून 2020 पासून नवीन बँकिंग कायदा लागू झाला आहे. या कायद्याने सहकारी बँकांच्या नियमनाचे अधिकार ‘आरबीआय’ला मिळाले आहेत. त्यातून सहकारी बँकांची मुस्कटदाबी होत असल्याची भीती सहकार क्षेत्रात निर्माण झाली आहे.
• या पार्श्वभूमीवर ‘द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फे डरेशन’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
• या समितीचे स्वरूप कसे असेल? याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे काढली जाणार आहे. ‘नव्या कायद्यात नागरी बँकांना देखील व्यापारी बँकांप्रमाणे नियम लागू झाले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक तो बदल करण्यासाठी रिझव्र्ह बँक जी पद्धत अवलंबणार आहे, त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा पतपुरवठा धोरणात ४ फेब्रुवारी रोजी केली आहे.
• व्यापारी बँका, नागरी बँकांना समान नियम लागू झाल्याने नागरी सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीत जो बदल अपेक्षित आहे. त्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नागरी बँकांना ‘व्यापारी’ स्वरूप
• नव्या कायद्यामुळे ‘आरबीआय’ला एखाद्या संचालक मंडळावर किंवा संचालकावर थेट कारवाई करता येणार आहे. यापूर्वी ‘आरबीआय’ला सहकार आयुक्तांमार्फत अहवाल मागवून कारवाई करता येत होती. मात्र, आता राज्यातील सहकारी बँकांबाबत सहकार आयुक्तांशी केवळ सल्लामसलत होणार आहे.
• संचालक मंडळाच्या पात्रतेचे निकष ‘आरबीआय’ निश्चित करणार आहे. नागरी सहकारी बँकांना भागभांडवल उभारणीसाठी खुल्या बाजारातून समभाग, बॉण्ड आणि कर्जरोखे विक्रीतून भागभांडवल उभारता येणार आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना आता व्यापारी बँकांचे स्वरूप येणार आहे.
• व्यापारी बँका, नागरी बँकांना समान नियम लागू झाल्याने नागरी सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीत जो बदल अपेक्षित आहे. त्यासाठी ही केंद्रीय समिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्रोत : महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
चीनचा तियानवेन-1 प्रोब मंगळाच्या कक्षेत दाखल..
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• चीनचा तियानवेन-1 अवकाशयानानं 10 फेब्रुवारी 2021 रोजी मंगळाच्या कक्षामध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला.
• पृथ्वीवरून साडेसहा महिने प्रवास केल्यावर हा प्रोब मंगळाच्या कक्षेत गेला आहे.
• मंगळावर चीनची ही पहिलीच स्वतंत्र मोहीम आहे.
• टियानवेन -1 मिशन एक लँडिंग कॅप्सूल पाठविण्याचा प्रयत्न करेल ज्यामध्ये 240 किलोग्राम रोव्हर असेल. या रोव्हर ला मंगळाच्या उत्तरी गोलार्धात पाठवले जाईल ज्याला यूटोपिया प्लॅनिटिया म्हणतात.
• हा रोव्हर यशस्वीरित्या उतरल्यानंतर, सौरऊर्जेवर चालणारा रोव्हर 90 दिवस मंगळाच्या पृष्ठभागाचा शोध घेईल.
• हा रोव्हर मातीचा अभ्यास करेल आणि प्राचीन काळातील जीवनाची चिन्हे देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करेल.
तियानवेन-1
• तियानवेन-1 ही चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाची (CNSA) एक आंतर-ग्रह अभियान आहे.
• या मोहिमेअंतर्गत सीएनएसएने मंगळावर रोबोटिक अवकाशयान पाठविले आहे. अंतराळ यानात ऑर्बिटर, तैनात करण्यायोग्य कॅमेरा, लँडर आणि रोव्हर आहे.
• 23 जुलै 2020 रोजी हे अंतरिक्षयान वेनचांग अंतराळयान प्रक्षेपण साइटवरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.
स्रोत : नवभारत टाईम्स,द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
केंद्रीय रस्तेवाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले भारताच्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्घाटन.
🗓 12 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• केंद्रीय रस्तेवाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील पहिला डिझेल-रुपांतरित सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला.
• रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण, शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल.
• कार्बन आणि इतर प्रदूषकांचे अंश अतिशय कमी असल्याने सीएनजी हे अतिशय स्वच्छ इंधन आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये शिशाचे प्रमाण शून्य असल्यामुळे ते स्वस्त आहे आणि ते गंजरोधक, विरल न करता येण्याजोगे आणि दूषित न होणारे असल्याने इंजिनचे आयुष्य वाढते आणि त्याचा देखभाल खर्च कमी होतो.
• सातत्याने चढ उतार होणाऱ्या पेट्रोलच्या दरांपेक्षा सीएनजीचे दर स्थिर असल्याने ते खूपच स्वस्त आहे. तसेच सीएनजीमुळे डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी इंधनात सरासरी जास्त अंतर कापता येते.
• सध्या या ट्रॅक्टरची निर्मिती रॉमॅट टेक्नो सोल्युशन्स आणि तोमासेटो एचील इंडियाकडून संयुक्तपणे होत असून हा प्रायोगिक पथदर्शी प्रकल्प आहे आणि कालांतराने हे ट्रॅक्टर उपलब्ध होतील.
• भारत हा जगातील सर्वाधिक इंधनाचा वापर करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे पण जागतिक सरासरीमध्ये दरडोई इंधनाचा वापर केवळ एक तृतीयांश आहे.
सीएनजीमध्ये रूपांतरणाचे महत्त्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे आहेत:
• कार्बन व इतर प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी असल्याने हे स्वच्छ इंधन आहे.
• हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे कारण यात शिसे नसून ते न गंजणारे, संहत आणि प्रदूषण न करणारे असल्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत करण्याबरोबरच नियमित देखभालही कमी करावी लागते.
• सतत चढ-उतार होणाऱ्या पेट्रोलच्या दरापेक्षा सीएनजीचे दर बऱ्याचदा स्थिर असल्याने ते स्वस्त आहे; डिझेल / पेट्रोल वरील वाहनांपेक्षा सीएनजी वरील वाहनांचे सरासरी माइलेज चांगले आहे.
• ते सुरक्षित आहे कारण सीएनजी टाक्या कडक सीलसह येतात, ज्यामुळे इंधन भरताना किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी असते.
• हे भविष्य आहे कारण सध्या जगभरात सुमारे 12 दशलक्ष वाहने नैसर्गिक वायूवर चालविली जातात आणि सीएनजी चळवळीत दररोज अधिकाधिक कंपन्या व नगरपालिका सामील होत आहेत.
• हा कचऱ्यातून संपत्तीचा एक भाग आहे कारण बायो-सीएनजी तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कापणी पश्चात पिकांच्या अवशेषांचा उपयोग (परळी) केला जाऊ शकतो जो शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील बायो-सीएनजी उत्पादन युनिटमध्ये विकून पैसे कमावण्यास मदत करेल.
• ट्रॅक्टरला सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचे शेतकऱ्याला होणारे अधिक विशिष्ट फायदेः
• चाचणी अहवालात असे दिसून येते की डिझेलवरील इंजिनच्या तुलनेत रेट्रोफिटेड ट्रॅक्टर जास्त किंवा सारख्याच शक्तीने चालतो.
• डिझेलच्या तुलनेत एकूण उत्सर्जन 70% कमी झाले आहे.
• सध्याच्या डिझेलचे दर प्रति लिटर 77.43 रुपये आहेत तर सीएनजी फक्त 42 रुपये प्रति किलो आहे.
स्रोत : PIB द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌
2 मार्चपासून सुरू होणार दुसरी मेरीटाईम इंडिया समिट-2021
🗓 12 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• 2 मार्चपासून दुसरी मेरीटाईम इंडिया समिट-2021 सुरू होणार आहे.
• 2 ते 4 मार्च दरम्यान आभासी माध्यमातून होणाऱ्या दुसर्या मेरीटाईम इंडिया समिट-2021 मध्ये सुमारे 20,000 प्रतिनिधी, 24 भागीदार देश सहभागी होतील आणि 400 हून अधिक प्रकल्प प्रदर्शित केले जातील.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मार्च रोजी मेरीटाइम इंडिया समिट -2021 चे उद्घाटन करतील.
• बंदर, नौवहन व जलवाहतूक मंत्रालयाने औद्योगिक भागीदार फिक्की आणि ज्ञान भागीदार इवाय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
• मेरीटाइम इंडिया समिट (एमआयएस) आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ उपलब्ध करुन देईल आणि ज्ञान आणि संधींचे परस्पर आदानप्रदान करण्यासाठी भागीदार देशांना एकत्र आणेल.
• सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीच्या परिस्थितीमुळे संपूर्ण शिखर परिषद www.maritimeindiasummit.in या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म वर आयोजित केली जाईल.
पहिली मेरीटाईम इंडिया समिट -2016
ठिकाण : मुंबई
स्रोत : पीआयबी, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे उद्घाटन
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे उद्घाटन झाले.
• या परिषदेची संकल्पना ‘आपल्या सामायिक भविष्याची पुनर्व्याख्या : सर्वांसाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण’ अशी आहे.
• गयानचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे, मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपसरचिटणीस अमिना जे मोहम्मद आणि भारताचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.
• 'द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट' (टेरी) संस्थेने, ही शिखर परिषद आयोजित केली आहे.
शिखर परिषदेबद्दल
• जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद या ऊर्जा आणि संसाधने संस्थेच्या (टेरी) महत्वाकांक्षी कार्यक्रमाची 20वी आवृत्ती, 10-12फेब्रुवारी, 2021 दरम्यान ऑनलाइन होणार आहे.
• या परिषदेत अनेक देशांचे प्रमुख, व्यापारी नेते, शिक्षणतज्ज्ञ, हवामान वैज्ञानिक, युवा आणि नागरी समाज, हवामान बदलाच्या विरूद्ध लढ्यात एकत्रित येत आहेत.
• भारताचे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व भू विज्ञान मंत्रालय या शिखर परिषदेचे प्रमुख भागीदार आहेत.
• ऊर्जा आणि उद्योग संक्रमण, अनुकूलन आणि लवचिकता, निसर्ग आधारित उपाय, हवामान वित्तसहाय्य, सर्क्युलर अर्थव्यवस्था, स्वच्छ महासागर आणि वायू प्रदूषण या सारख्या विषयांवर परिषदेदरम्यान चर्चा होणार आहे.
• या परिषदेची सुरुवात 2001 मध्ये झाली.
• या परिषदेत आत्तापर्यंत 49 राज्य व सरकार प्रमुख, 13 नोबेल पुरस्कार विजेते, 77 देशांचे मंत्री, 1800 + व्यवसाय नेते, 2200+ स्पीकर्स आणि जगभरातील 13,000 पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
स्रोत : PIB, TERI अधिकृत संकेतस्थळ.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
अमेरिकेची परसीवरन्स मोहीम
• नासाची मोहीम मंगळावरील प्राचीन सूक्ष्मजीवांचे पुरावे शोधणार आहे. यामध्ये मंगळावर जीवन होतं की नाही याचे संकेत देणारे खडकाचे नमुने गोळा केले जातील.
• दुसऱ्या ग्रहावर उतरण्यासाठी पाठवलेले सर्वांत मोठं, अत्याधुनिक यान 18 फेब्रुवारीला मंगळावरील जेझिरो नावाच्या विषववृत्तीय खड्ड्यावर स्पर्श करेल अशी अपेक्षा आहे.
• रोव्हरचा आकार एका छोट्या एसयूव्हीसारखाच आहे आणि त्याचे वजन एक मेट्रिक टन आहे.
• हे यान दररोज 200 मीटर उंचीवरून जाऊ शकतं आणि त्यात 19 कॅमेरे आणि दोन मायक्रोफोन आहेत. यामुळे मंगळ ग्रहावरील आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला जाईल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
• या मोहिमेत प्रथमच दुसऱ्या जगावर 1.8 किलो वजनाचं ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
• मंगळ ग्रहावरून घेतलेले नमुने पृथ्वीपर्यंत पोहचल्यानंतरच याबाबतची संपूर्ण ठोस माहिती प्रसिद्ध करता येईल. ही मोहीम संपुष्टात येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वाट पाहवी लागेल.
स्रोत : बीबीसी मराठी, महाराष्ट्र टाईम्स,लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
मुनिता प्रजापती ने केला चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम.
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्याच्या मुलीनं चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे.
• मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे.
• ३६ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
• मुनिता प्रजापती हिनं ४७ मिनिट ५४ सेकंदात दहा हजार मीटर चालण्याचा पराक्रम केला.
• प्रजापतीनं रेश्मा पटेल हिला (४८ मिनिट २५ सेकंद) हिला पराभवूत करत अव्वल स्थान पटाकवलं आहे.
• गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. या स्पर्धेत पटेल हिला सुवर्णपदक मिळालं होतं.
स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम - थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21)
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम - द्विवार्षिक थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21) जानेवारीच्या सुरूवातीला सुरू झाला असून सध्या जहाजे, पाणबुडी, विमान तसेच भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या कार्यान्वित तुकड्यांच्या सहभागाने सुरू आहे. फेब्रुवारीच्या तिसर्याच आठवड्यात या सरावाचा समारोप होईल.
• हिंद महासागर क्षेत्रात हा सराव आयोजित करण्यात आला असून सध्याच्या भौगोलिक धोरणात्मक संदर्भात जटिल बहु-आयामी परिस्थितीत नौदलाच्या लढाऊ सज्जतेची चाचपणी करणे हा यामागचा उद्देश आहे.
• नौदलाच्या संरक्षण क्षमतांचे प्रमाणीकरण करणे, सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे आणि हिंद महासागर प्रदेशात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करणे हा देखील या ट्रोपेक्स सरावाचा उद्देश आहे.
• भारतीय नौदलाचे तीनही कमांड आणि पोर्ट ब्लेअर येथील ट्राय सर्व्हिसेस कमांडच्या सहभागाने नौदल मुख्यालयांकडून ट्रोपेक्सचे संचलन केले जात आहे.
• ट्रॉपेक्स विविध टप्प्यांतून जात असून शांतता काळापासून युद्धापर्यत नौदलाच्या स्थित्यंतराची देखील चाचणी केली जाते.
• पहिल्या टप्प्यात, भारतीय नौदलाने 12-13 जानेवारी 2021 रोजी किनारपट्टी आणि बेटांवर 'सी व्हिजिल' हा किनारपट्टी संरक्षण सराव आयोजित केला होता. या अभ्यासाचा उद्देश देशाच्या किनारपट्टीच्या संरक्षण व्यवस्थेस मान्यता देणे हा होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली होती. या सरावात भारतीय नौदल, तटरक्षक दल, 13 किनारपट्टी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे सागरी पोलिस आणि सागरी क्षेत्रातील इतर हितधारकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
• सी व्हिजिल सरावानंतर 21-25 जानेवारी दरम्यान अँफेक्स -21 हा तिन्ही सेवादळांचा संयुक्त सराव पार पडला.
स्रोत : PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
ऋषभ पंतला ICC कडून मानाचा पुरस्कार जाहीर.
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी भारताचा फलंदाज ऋषभ पंत ठरला आहे.
• जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 97 धावांची धडाकेबाज खेळी होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 89 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी 2021 सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
• ऋषभ पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 245 धावा केल्या. 81.66 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे ICC च्या मतदान समितीने (ICC Voting Academy for ICC Player of the Month) आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी ऋषभ पंतची निवड केली.
‘असा’ निवडला जातो विजेता:
• ICC कडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील 3 सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातात.
• खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातात.
• एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी ICCच्या मतदान समितीकडे 90 टक्के तर चाहत्यांकडे 10 टक्के मतदानाचे अधिकार असतात.
• ICCच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येतं. विजेत्या खेळाडूंचं नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर करण्यात येतं.
स्रोत : दै. लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahi
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
महान टेनिस प्रशिक्षक अख्तर अली यांचे निधन
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारताचे महान टेनिस प्रशिक्षक अख्तर अली (८३ वर्षे) यांचे रविवारी प्रदीर्घ आजारपणामुळे कोलकाता येथे निधन झाले.
• अख्तर यांच्या आक्रमक खेळाने देशातील अनेकांची कारकीर्द घडवली आहे. यात महान टेनिसपटू लिएण्डर पेस यांच्यासह त्यांचा मुलगा झीशान अली यांचाही समावेश आहे.
• झीशान सध्या भारताच्या डेव्हिस चषक संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा विजय अमृतराज आणि रमेश कृ ष्णन यांच्यावरही प्रभाव आहे.
• अख्तर यांनी ते 1958 ते 1964 या कालावधीत आठ डेव्हिस चषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी भारताचे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपदही भूषवले आहे.
स्रोत : दै. लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahi
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
भारताचे तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. त्यामुळे संदीप, प्रियांका आणि राहुल कुमार या भारताच्या तीन खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
• आता टोक्यो ऑलिम्पिकसाठी चालण्याच्या शर्यतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. याआधी के . टी. इरफान आणि भावना जट यांनी पात्रता निकष पार केले होते.
• संदीपने एक तास 20 मिनिटे 16 सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. प्रियांकाने 1 तास 28 मिनिटे 45 सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक संपादन केले. राहुल याने पुरुष गटात 1 तास 20 मिनिटे 26 सेकंद अशा कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे.
• संदीप याने 50 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
महाभियोगातून ट्रम्प यांची मुक्तता
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• सत्तांतराच्या वेळी त्यांच्या समर्थकांना कॅपिटॉल हिल येथे हिंसाचारास उत्तेजन दिल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या महाभियोगाच्या आरोपातून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सेनेटमधील मतदानात मुक्तता झाली आहे.
• त्यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती, पण तेवेढे बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गोळा करता आले नाही.
• माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सात सदस्य फुटले होते, पण त्यामुळे बहुमताचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्यामुळे ट्रम्प यांची मुक्तता झाली. सात सदस्यांनी या ऐतिहासिक महाभियोगात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले.
• ट्रम्प यांच्यावरचा हा दुसरा महाभियोग होता. यापूर्वी यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणी ट्रम्प यांच्यावर पहिला महाभियोग दाखल करण्यात आला होता पण तोही यशस्वी झाला नव्हता.
• ट्रम्प यांच्यावर या वेळी 6 जानेवारीला यूएस कॅपिटॉल येथे दंगलीस उत्तेजन दिल्याचा आरोप होता.
• 57 विरुद्ध 43 मतांनी ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग या वेळी फेटाळला गेला. सात रिपब्लिकनांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले होते. दोन तृतीयांश बहुमताला 10 मते कमी पडली. एकूण 67 मतांची गरज बहुमतासाठी होती पण तेवढी मते डेमोक्रॅट पक्षाला गोळा करता आली नाहीत.
• सेनेटने फेब्रुवारी 2020 मध्ये पहिल्या महाभियोगातून ट्रम्प यांना मुक्त केले होते. जो बायडेन यांच्या मुलाची युक्रेनच्या अध्यक्षांनी चौकशी करावी यासाठी त्यांनी दबाव आणला होता.
स्रोत :महाराष्ट्र टाइम्स.लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
लष्करात स्वदेशी ‘अर्जुन’
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• स्वदेशात निर्मित अर्जुन एमके-1ए हा लढाऊ रणगाडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लष्कराच्या सुपूर्द केला.
• या अत्याधुनिक रणगाड्याची निर्मिती आणि विकास भारतात झाला आहे. या रणगाड्यात स्वदेशी दारूगोळ्याचा वापर केला जातो.
• या रणगाड्याचे उत्पादन संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने केले आहे.
• DRDO नं 8400 कोटी रुपये खर्च करुन हे रणगाडे तयार केले आहेत.
अर्जुन (MK – 1A) :
हा रणगाडा सतत हलचाल करणाऱ्या टार्गेटलाही अचूक लक्ष्य करतो. भू सुरुंग पेरली असतील तरी हा त्यावरुन पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर या रणगाड्यासमोर ग्रेनेड आणि क्षेपणास्त्र हल्ले देखील निष्प्रभ ठरतात.
या रणगाड्यांमध्ये केमिकल हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर लावण्यात आले आहेत. पश्चिम राजस्थानातील सैन्याच्या रेजिमेंटच्या मदतीला हे रणगाडे असतील. याचा नेमका अर्थ म्हणजे या रणगाड्यांच्या टार्गेटपासून पाकिस्तान फार दूर नसेल.
अर्जुन MK – 1A रणगाड्यांना ‘किलर रणगाडे’ असंही म्हंटलं जातं. एक रणगाडा तयार करण्यासाठी 54 कोटी रुपये खर्च आला आहे. रविवारी 118 रणगाडे सैन्यात दाखल झाली आहेत. 124 रणगाडे पूर्वीपासून सैन्याकडं आहेत.
वैशिष्ट्यं:
रणगाड्याची मारक क्षमता पहिल्या पेक्षा अधिक आहे
रणगाड्यावर हेलिकॉप्टर विरोधी मशीन गन
जमिनीवरुन आकाशात अचूक लक्ष्य गाठण्याची क्षमता
आधुनिक ट्रान्समिशन सिस्टिममुळे शत्रुचा शोध घेणे शक्य
रासायनिक हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर
रात्रीच्या वेळी शत्रुला शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग सिस्टम
वजन 68 टन, वेग 58 किमी प्रति तास
स्रोत : लोकमत,द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
आंतरराष्ट्रीय जागतिक डाळ दिवस 2021 - ग्लोबल व्हर्च्युअल सोहळा रोम मध्ये साजरा.
🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
स्थळ : रोम, इटली.
विषय : Pulses for sustainable food systems and healthy diets.
• ‘जागतिक डाळी दिवसा’ निमित्त रोम येथे दि.12 फेब्रुवारी ला आयोजित या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण केले.
• भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहकही असून आता भारताने डाळींच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्णता साध्य केली आहे, असे प्रतिपादन, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
• संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार 2016 पासून जागतिक डाळी दिवस साजरा केला जातो.
• या कार्यक्रमाला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस डॉ अग्नेस कलिबाता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाचे
• गेल्या पाच-सहा वर्षात, भारतातील डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून ते 140 लाख टनांपासून ते 240 लाख टनांपर्यंत वाढ झाली आहे.
• 2019-20 या वर्षात भारताने 23.15 दशलक्ष टन डाळींचे उत्पादन केले, जे जागतिक उत्पादनाच्या 23.62% टक्के आहे.
• डाळी अत्यंत पोषक असून त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळेच एक अन्नघटक म्हणून तो महत्वाचा आहे. विशेषत: भारतासारख्या देशात, जिथे शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक आहे, तिथे आहारात डाळींना विशेष महत्व आहे. डाळींन कमी पाणी लागते आणि ती कोरडवाहू जमिनीवर देखील पिकू शकते.
• भारतात 86 टक्के छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करुन अशा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे. केंद्र सरकार देशभरात 10,000 नव्या शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करत असून त्यासाठी येत्या पाच वर्षात 6,850 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या संघटनांमुळे, शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन, खरेदी यात मदत होईल तसेच उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध होईल.
• भारतीय कृषी संशोधन परिषदेने केलेल्या संशोधन आणि विकास कार्यांमुळे डाळींचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत मिळाली आहे. डाळींच्या पिकांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली असून डाळींच्या नव्या संकरित वाणांवर अभूतपूर्व संशोधन करण्यात आले आहे.
• गेल्या पाच वर्षात,डाळींच्या 100 सुधारित आणि उत्तम पिक देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
• भारतात, राष्ट्रीय पोषाहार योजनेअंतर्गत 1.25 कोटी आंगणवाड्यांमध्ये डाळींचे वाटप केले जाते. टाळेबंदीच्या काळातही, केंद्र सरकारने 80 कोटी गरिबांना मोफत चणाडाळींचा पुरवठा केला.
स्रोत : PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
ई-गव्हर्नन्समधील उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला 18वा सीएसआय एसआयजी ई- गव्हर्नन्स पुरस्कार 2020 मध्ये कृतज्ञता पुरस्कार प्राप्त.
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा उपक्रम म्हणून सुरू केलेला 'आदिवासी सक्षमीकरण-बदलता भारत' या प्रात्यक्षिक डॅशबोर्डसाठी 18वा सीएसआय एसआयएन ई गवर्नन्स पुरस्कार 2020चा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या हस्ते आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी लखनऊ येथे काल हा पुरस्कार स्वीकारला.
• डिजीटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मंत्रालय अनेक पावले उचलत आहे. देशाच्या सर्वात दुर्गम भागापर्यंत डिजिटायजेशनचा लाभ पोहोचेल, यासाठी देखील मंत्रालय पावले उचलत आहे आणि यासारख्या उपक्रमांच्या पुढाकारामुळे तेथील आदिवासी समाजाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडणार आहे.
• देशात ई – गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांची नोंद व्हावी यासाठी द कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) यांच्या वतीने पुरस्कारांची मालिका सुरू करण्यात आली आहे.
• हे पुरस्कार सीएसआय – एसआयजी ई-गव्ह यांच्या वतीने दिले जातात. राज्य, विभागीय, जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर ई – गव्हर्नन्स संकल्पनेच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
• ई – गव्हर्नन्स वापराबाबत आदिवासी कल्याण मंत्रालय आघाडीवर आहे. त्याचे प्रदर्शन डॅशबोर्ड, आदिवासी सक्षमीकरण – बदलता भारत हे एक इंटरअक्टीव आणि गतिशील ऑनलाईन व्यासपीठ आहे, जे या मंत्रालयाच्या 11 योजना किंवा उपक्रमांचे अद्ययावत आणि रियलटाइम तपशील दर्शवितो.
स्रोत : नवभारत टाईम्स, PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
कूच बिहार येथे उद्या अकराव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन.
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अकराव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे राज्यपाल जगदीप धनख़ड यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री प्रह्लाद सिंह पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
• हा महोत्सव, 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, पहिल्या टप्प्यात, 16 फेब्रुवारीपर्यंत कूच बिहार येथे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 22 ते 24 दरम्यान दार्जीलिंग येथे आणि तिसऱ्या टप्प्यात 27 आणि 28 फेब्रुवारीला मुर्शिदाबाद दरम्यान होणार आहे.
• या महोत्सवात, भारतीय संस्कृतीच्या मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे संवर्धन,प्रोत्साहन आणि प्रचार करण्याची जबाबदारी संस्कृती मंत्रालयाकडे देण्यात आली आहे. यात, पारंपरिक लोकनृत्ये आणि कलाप्रकार, नृत्य- नाट्य आणि गायनासारख्या सादरीकरण कला आणि समृद्ध अशा आदिवासी परंपरांचा समावेश आहे. मंत्रालयातर्फे या कलांना व्यासपीठ देणारे सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि नाट्यविष्कार आयोजित केले जातात.
• राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा संस्कृती मंत्रालयाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असून 2015 पासून त्याचे आयोजन केले जात आहे. देशातील सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचा या महोत्सवाच्या आयोजनात महत्वाचा वाटा असून, भारतातील समृद्ध, विविधरंगी संस्कृती केवळ प्रदर्शने आणि आर्ट गैलरीपुरती मर्यादित न ठेवता, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
• एका राज्यातील लोक आणि आदिवासी कला, नृत्य, संगीत, खाद्यपद्धती आणि संस्कृती इतर राज्यांपर्यंत पोहोचवण्यात हा महोत्सव अत्यंत महत्वाचा ठरला असून, “एक भारत-श्रेष्ठ भारत” चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करत आहे. त्याचवेळी लोककलावंतांना महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत, त्यांची उपजीविका चालण्यासही यातून मदत होते.
• सध्या भारत कोविड-19 महामारीच्या संकटातून बाहेर पडत असतांना आयोजित होत असलेल्या यंदाच्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाला विशेष महत्व आहे. कारण कोविडचा मोठा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे.
• या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील लोक-आदिवासी कला आणि कलावंतांना अत्यावश्यक असलेला आधार आणि प्रोत्साहन देण्याचा, मंत्रालयाचा प्रयत्न आहे. तसेच आवश्यक ती काळजी आणि उपाययोजना करुन असे महोत्सव आयोजित केले जाऊ शकतात, असा विश्वासही या निमित्ताने निर्माण होऊ शकेल.
स्रोत : बीबीसी मराठी, महाराष्ट्र टाईम्स,लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
13 फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन.
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो.
• मनोरंजन, माहिती आणि संप्रेषण याचे माध्यम म्हणून रेडिओचे महत्त्व अधोरेखित करणे हा त्याचा हेतू आहे.
• यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाचं घोषवाक्य आहे ‘नवं जग नवा रेडिओ’ ("New World, New Radio").
जागतिक रेडिओ दिन
• 'युनेस्को'ने 2011 मध्ये 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली.
• नंतर संयुक्त राष्ट्र महासभेने तो आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.
• 1946 मध्ये त्याच दिवशी, संयुक्त राष्ट्र रेडिओद्वारे पहिले कॉल साइन ट्रांसमिट केले होते.
• इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे 2012 पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली.
भारतात कधी सुरू झाला रेडिओ?
• भारतात 1927 मध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले. भारतात 'टाइम्स ऑफ इंडिया' व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट 1921 मध्ये 'टाइम्स'च्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे.
स्रोत :महाराष्ट्र टाइम्स.लोकमत.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____🖌
27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 दरम्यान पहिल्या इंडिया टॉय फेअरचे आयोजन
🗓 12 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर भर आणि भारताच्या खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक', स्मृती इराणी आणि पियुष गोयल यांनी एकत्रितपणे इंडिया टॉय फेअर - 2021 चे संकेतस्थळ http://www.toyfair.in आज नवी दिल्लीत सुरु केले.
• केंद्र सरकार 27 फेब्रुवारी ते 02 मार्च 2021 या कालावधीत पहिल्या इंडिया टॉय फेअरचे आयोजन करत आहे.
• इंडिया टॉय फेअर 2021 आयोजित करण्याच्या प्रस्तावाचा उद्देश आधुनिक भारताच्या गरजा पूर्ण करणे आणि त्याचबरोबर स्थानिक खेळणी निर्मिती उद्योगाला मदत करणे हा आहे.
• इंडिया टॉय फेअर स्थानिक उत्पादक आणि कारागिरांना दर्जेदार खेळणी विकसित करण्यासाठी आणि चांगली प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित करेल जेणेकरुन त्यांची उत्पादने देशांतर्गत बाजारात विकली जातील तसेच त्यांची निर्यातही होऊ शकेल
• देशातील खेळणी उत्पादन उद्योग बळकट करण्यासाठी, जानेवारी 2021 मध्ये सरकारने पहिल्या टॉयकेथॉनचे आयोजन केले होते.
स्रोत : पीआयबी
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
🗓 10 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
विंदा करंदीकर जीवन गौरव
• मराठी भाषेचा प्रसार, प्रचारासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे.
• पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारा’चे स्वरूप आहे.
रंगनाथ पठारे :
• रंगनाथ पठारे यांनी विपुल साहित्यलेखनासोबतच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भरीव योगदान दिले आहे.
• महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पदही त्यांनी भूषविलेले आहे.
• रंगनाथ गबाजी पठारे हे मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत.
• त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान-
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मसाप सन्मान, 2015
- साहित्य अकादमी पुरस्कार 1999 (`ताम्रपट’साठी)
- 2017 मधे अहमदनगर येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
श्री. पु. भागवत पुरस्कार
• श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. • या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी ‘शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.
मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार
• मराठी भाषा अभ्यासक पुरस्कारासाठी औरंगाबादचे डॉ. सुधीर रसाळ यांची निवड झाली असून पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
• डॉ. रसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रांत लेखन करीत आहेत.
कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
• कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे.
• दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
• भगत यांनी भाषा संचालनालयाने तयार केलेला परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणक माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले.
स्रोत : लोकसत्ता, विकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
अमेरिका पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत सामील होणार.
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाने पुन्हा संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
• डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने 2018 मध्ये परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
पार्श्वभूमी
• इस्रायलशी भेदभावामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेतून माघार घेण्याची घोषणा केली.
• इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत इस्त्राईलला परिषदेचे सर्वाधिक ठराव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेशी चर्चा केली होती.
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद (यूएनएचसीआर)
• यूएनएचआरसी ही संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीतील एक आंतर-सरकारी संस्था आहे.
• ही एजन्सी जगभरात मानवी हक्कांच्या संवर्धन आणि संरक्षणास बळकटी देण्यात सहभागी आहे.
• ही एजन्सी मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर देखरेख ठेवते.
• ही परिषद 2006 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 60/251 च्या ठरावाद्वारे तयार केली गेली होती.
• परिषदेच्या स्थापनेनंतर तीन महिन्यांनतर 2006 मध्ये त्याचे पहिले अधिवेशन झाले.
• एजन्सी मानवीय हक्कांच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात सहभागी असते.
• यूएनएचआरसीची स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या (यूएनसीएचआर) जागी केली गेली.
• या परिषदेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे 47 सदस्य राष्ट्र आहेत. या सदस्य देशांची निवड यूएनजीएद्वारे थेट आणि गुप्त मतपत्रिकेद्वारे केली जाते.
यूएनएचआरसी सत्र
• यूएनएचआरसी एका वर्षात तीन नियमित सत्रांचे आयोजन करते.
• ही सत्रे एकूण 10 आठवडे चालतात. हे सत्र मार्च महिन्यात चार आठवडे, जून महिन्यात तीन आठवडे आणि सप्टेंबर महिन्यात तीन आठवडे चालते.
• ही सत्रे स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात आयोजित केली जातात.
स्रोत : बीबीसी मराठी, महाराष्ट्र टाईम्स,लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
अमेरिका, चीन आणि यूएई यांच्या मंगळ मोहिमा...एक दृष्टिक्षेप.
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• येत्या काही दिवसांत एक,दोन नव्हे तर तीन अंतराळयानं मंगळावर जाणार आहेत. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या संशोधनात प्रगती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
• संयुक्त अरब अमिराती (UAE),चीन आणि अमेरिकेचं अवकाश यान मंगळ ग्रहावर संशोधनासाठी जाणार आहे.
• भूगर्भशास्त्र आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तसंच प्राचीन सूक्ष्म जीवाणूंच्या अस्तित्वाची संभाव्य लक्षणं शोधण्यासाठी मंगळ ग्रहावर जाणाऱ्या या मोहिमांचं नियोजन करण्यात आलं आहे.
• 9 फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीची 'होप' ही मंगळ मोहीम सुरू झाली. दोन दिवसांनी तियानवेन-1 ही चीनची मोहीम लाँच होणार आहे तर नासाची मोहीम 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
• पृथ्वी आणि मंगळ ग्रह आपआपल्या कक्षात फिरत असताना सध्या एकमेकांच्या जवळ आले आहेत. सूर्याभोवती फिरताना त्यांच्या वेगवेगळ्या वेगामुळे दोन्ही ग्रहांमधील अंतर सतत बदलत असतं. त्यामुळे कमी झालेलं अंतर कमी इंधनाच्या सहाय्याने पार करता येतं.
• मोहीमेसाठी दर 26 आठवड्यातून एकदा कमीत कमी इंधन वापरलं जातं. पण प्रत्येक अवकाश मोहिमेप्रमाणे या तीन मोहिमांसमोरही मोठी आव्हानं आहेत. अवकाशातून जमिनीवर येण्याच्या "सात मिनिटांची दहशत" हे आव्हानही कायम आहे.
UAE ची 'होप' मोहीम
• युएईची पहिली ऐतिहासिक मोहीम गेल्यावर्षी जुलै महिन्यात जपानहून लाँच करण्यात आली होती. या मोहिमेत मंगळ ग्रहावरील हवामानाचा वेध घेतला जाईल. असं संशोधन यापूर्वी कोणत्याही मंगळ ग्रहाच्या मोहिमेत करण्यात आलेलं नाही.
• विशेषत: मंगळ ग्रहावरील हवा कशी कमी झाली आणि पाण्याच्या अस्तित्वाबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असं शास्रज्ञ सांगतात. चिनी आणि अमेरिकन मोहिमेच्या तुलनेत 'होम' मोहीम मंगळावर उतरणार नाही पण साधारण 687 दिवस ग्रहाभोवती फिरेल.
• साधारण सप्टेंबर महिन्यापासून यासंदर्भातील माहिती पृथ्वीवर पोहचण्यास सुरूवात होईल. पण याआधी या मोहिमेला एक गंभीर आणि गुंतागुतीचा टप्पा पार करावा लागणार आहे, यासाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
• फक्त अमेरिका, भारत, पूर्वाश्रमीचा सोव्हिएत युनियन आणि युरोपियन स्पेस एजन्सी यापूर्वी मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आहेत.
• योगायोगाने संयुक्त अरब अमिरातीच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'होप' मोहीम सुरू होत आहे. यावेळी संयुक्त अरब अमिरातीतील ऐतिहासिक ठिकाणं लाल रंगात उजळून निघाली.
चीनची तियानवेन-1 मोहीम
• चीनची पहिली मंगळ मोहीम ज्याला "Questions to Heaven" म्हणून संबोधलं जातं ही प्रत्यक्षात ग्रहापर्यंत पोहेचण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ घेणार आहे. यामुळे अभियंत्यांना धोकादायक टप्प्यात पोहचण्यापूर्वी ग्रहांच्या वातावरणाचा वेध घेण्याची संधी मिळेल.
• मंगळावर उतरण्यासाठी शास्त्रज्ञांना 20,000 किमी प्रति तास प्रवासाचा वेग कमी करण्याचं आव्हान पेलणं गरजेचं आहे.
• मे महिन्यापर्यंत युटोपिया इम्पॅक्ट बेसिनमधील एका सपाट मैदानावर 240 किलो वजनाचा रोव्हर उतरवण्याची आशा चीनला आहे. फोल्ड-आऊट सोलर पॅनल्सवर चालणारा हा रोव्हर त्या प्रदेशाच्या भूगर्भशास्त्राचा तसंच अगदी खोलवर पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे.
• एक उंच मास्ट फोटो काढण्यासाठी आणि नेव्हिगेशनला मदत करण्यासाठी कॅमेऱ्यासहीत सज्ज आहे. आणखी पाच उपकरणं स्थानिक खडकांच्या खनिजाचं मूल्यांकन करण्यास आणि बर्फ शोधण्यास मदत करतील.
• रोबोट किमान 90 दिवसांसाठी काम करेल असं चिनी शास्त्रज्ञांना अपेक्षित आहे. आतापर्यंत केवळ अमेरिकेला दीर्घकालीन मोहीम पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. (सोव्हिएतच्या मंगळ-3 आणि युरोपच्या बीगल-2 मोहिमा उतरल्या होत्या पण काही वेळातच ते अपयशी ठरले.)
• तियानवेन-1 मोहिमेकडून आधीच मंगळ ग्रहाची प्रतिमा पृथ्वीवर पाठवण्यात आली आहे. शियापारेली क्रेटर आणि व्हॅलेस मरीनरिस सारखी भौगोलिक वैशिष्ट्यं आणि मंगळाच्या पृष्ठभागावरील दशांशांचा प्रचंड पट्टा दाखवणारा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आहे. मंगळापासून 22 लाख किलोमीटर अंतरावरून हा फोटो काढण्यात आला.
• तियानवेन-1 हा मंगळावर पोहोचण्याचा चीनचा पहिला प्रयत्न नाही. 2011 मध्ये प्रक्षेपण अयशस्वी ठरल्याने रशियाबरोबरची एक मोहीम अकाली संपली. पण चंद्रावर दोन रोव्हर्स पाठवल्यानंतर चीनचा आत्मविश्वास वाढला आणि गेल्या वर्षी चीन हा दूरवर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला.
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
संसदेत आज महत्वाच्या बंदरे प्राधिकरण विधेयक 2020 ला मंजुरी
🗓 10 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• संसदेत आज महत्वाची बंदरे प्राधिकरण विधेयक, 2021 मंजूर करण्यात आले.
• केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले आणि त्याला सभागृहाने मंजुरी दिली.
• आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.
• बंदरे पायाभूत सुविधा अधिक बळकट करणे आणि बंदरांवरुन होणारा व्यापार तसेच वाणिज्य याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाची बंदरे प्राधिकरण विधेयक, 2021 मध्ये विशेष तरतुदी आहेत.
• त्यानुसार, निर्णयप्रक्रीयेचे विकेंद्रीकरण आणि महत्वाच्या बंदरांच्या प्रशासनात व्यावसायिकता तसेच कार्यक्षमता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात, जलद आणी पारदर्शक निर्णयप्रक्रिया अभिप्रेत असून, ज्याचा लाभ सर्व हितसंबंधीयांना होईल तसेच प्रकल्पाची कार्यान्वयन क्षमता सुधारणे अपेक्षित आहे.
• या विधेयकाचा उद्देश, जगाभरात यशस्वी ठरलेल्या पद्धतींच्या धर्तीवर, मध्यवर्ती प्रमुख बंदरांमध्ये प्रशासाकीय धोरण राबवणे हा आहे. यामुळे, या महत्वाच्या बंदरांच्या कार्यान्वयनात अधिक पारदर्शकता येण्यासही मदत होईल.
• यामुळे, प्रमुख बंदरांच्या संस्थात्मक आराखड्याचे आधुनिकीकरण होईल तसेच, प्रशासनाला स्वायत्तता मिळून ह्या बंदरांची कार्यक्षमता वाढेल.
स्रोत : PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
स्पर्धावाहिनी | #MPSC_Alerts
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017
अंतिम निकाल
-----------------------------------
Join » @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
YUDH ABHYAS 20 : राजस्थानमध्ये भारतीय-अमेरिकन सैन्याच्या युद्ध अभ्यास सुरु.
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये सोमवारपासून भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरु झाला आहे.
• दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजांना या युद्ध अभ्यासामध्ये सहभागी होणाऱ्या सैनिकांनी सलाम करुन या युद्ध अभ्यासाला सोमवार म्हणजेच आठ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.
• 'युद्ध अभ्यास 20' या नावाने ओळखला जाणारा हा सराव 14 दिवस म्हणजेच दोन आठवडे सुरु राहणार आहे.
• 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि सराव भारतीय आणि अमेरिकन लष्करातील जवान राजस्थानमधील या केंद्रावर करणार आहेत.
• यासाठीची सर्व तयारी भारतीय लष्कराने केली असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
• संयुक्त राष्ट्राच्या धोरणांनुसार दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भातील विशेष प्रशिक्षण या सैनिकांना देण्यात येणार आहे.
• भारतीय लष्कराच्या साऊथ कमांडने दिलेल्या माहितीनुसार भारत आणि अमेरिकेन लष्काराच्या संयुक्त युद्ध अभ्यासाचे हे 16 वे पर्व आहे.
• भारतात दाखल झालेल्या सर्व अमेरिकन सैनिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच त्यांना नियोजित ठिकाणी घेऊन घेण्यात आलं.
• यंदाचा युद्ध अभ्यास राजस्थानमध्ये होत असून यापूर्वीचा युद्धअभ्यास अमेरिकेतील सिएटल येथे पार पडला होता.
स्रोत : दै. लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahi
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
यावर्षीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुढील वर्षी
🗓 9 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारलाही करोनाच्या साथीचा फटका बसला आहे. 2019-20 चे शिवछत्रपती पुरस्कार यंदा दिले जाणार नाहीत, परंतु पुढील वर्षी ते दिले जातील, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सोमवारी दिली.
1969 पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
गेल्या काही वर्षांत 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनाचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली होती. गतवर्षी गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात 63 जणांना 2018-19 च्या पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु गेले वर्षभर करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदाचे पुरस्कार वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आले
राज्य शासनाकडून शिवजयंतीचा मुहूर्त बऱ्याचदा चुकवला जातो. 2014-15, 2015-16 आणि 2016-17 हे तीन वर्षांचे प्रलंबित पुरस्कार एकत्रित देण्यात आले. मात्र त्यानंतर 2017-18 आणि 2018-19च्या शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण करताना अनुक्रमे विनोद तावडे आणि केदार या क्रीडामंत्र्यांनी शिवजयंतीचा मुहूर्त साधला होता, परंतु या प्रथेत यंदा करोनामुळे खंड पडणार आहे.
करोनाच्या साथीमुळे वर्षभरात क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच यंदा शिवछत्रपती पुरस्काराचा कार्यक्रम होऊ शकणार नाही, परंतु पुढील वर्षी फेब्रुवारीत हे प्रतिष्ठेचे पुरस्कार निश्चितपणे दिले जातील.
स्रोत : दै. लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahi