spardhavahini | Unsorted

Telegram-канал spardhavahini - स्पर्धावाहिनी

9922

Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation. --------------------------------------- © An official channel of www.spardhavahini.com

Subscribe to a channel

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌

'कॅच द रेन' मोहीमेस सुरुवात
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• 22 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने "जलशक्ती अभियान: कॅच द रेन मोहीम" सुरू केली.
• ही मोहीम 22 मार्च ते 30 नोव्हेंबर 2021 यादरम्यान देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राबविली जाणार आहे.

मोहिमेबद्दल
• “Catch the rain, where it falls, when it falls” या घोषवाक्यासह पावसाळा येण्यापूर्वी हवामान परिस्थिती आणि उप-हंगामांसाठी योग्य असे पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी उपयुक्त अशी रचना (Rain Water Harvesting Structures-RWHS) तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
• लोकसहभागातून जल संवर्धनाचे काम शेवटच्या स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी जन आंदोलन म्हणून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
• निवडणूक होऊ घातलेली राज्ये वगळता, प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये या दिवशी (22 मार्च) ग्राम सभा घेण्यात येतील आणि पाणी व पाणी संवर्धनाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येईल.
• यासाठी ग्राम सभांमध्ये जल शपथ देखील घेण्यात येईल.
• प्रत्येक जिल्हा, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींमध्ये रेन सेंटर सुरू करण्याची विनंती सरकारने राज्य सरकारांना केली आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌

ग्राम उजाला योजना
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• ग्रामीण भागात स्वस्त एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने 19 मार्च 2021 रोजी ग्राम उजाला योजना सुरू केली.
• केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेची सुरुवात केली.

काय आहे ही योजना?
• ही एक महत्वाकांक्षी योजना असून ज्याद्वारे ग्रामीण भागात जगातील सर्वात स्वस्त एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.
• अशा प्रकारची ही भारतातील पहिली योजना आहे. याद्वारे ग्रामीण भागात केवळ 10 रुपयांमध्ये एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत.
• एका कुटुंबाला जास्तीत जास्त पाच ब्लब देण्यात येणार आहेत.
• अशा प्रकारे ग्रामीण भागात जवळपास 600 दशलक्ष ब्लबचे वितरण करण्यात येणार आहे.
सरकारद्वारा संचालित 'एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लिमिटेड' ची सहायक कंपनी 'कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेड' (CBSL) द्वारा हे बल्ब देण्यात येणार आहेत.
• त्याचबरोबर या योजनेत ग्रामीण ग्राहकांकडून तप्तदीप ब्लब आणि कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट दिवे (CFL) बल्ब जमा करून घेण्याचाही प्रस्ताव आहे.
• असे बल्ब जमा केल्यानंतर, ग्राहकांना 7 वर्षाची वॉरंटीसह 7-वॅट आणि 12 वॅटचे एलईडी बल्ब मिळणार आहेत.

नियोजनाचा पहिला टप्पा
• पहिल्या टप्प्यात ही योजना बिहारच्या आरा या जिल्ह्यातून सुरू करण्यात आली आहे.
• या टप्प्यात आरा (बिहार), विजयवाडा (आंध्र प्रदेश), वाराणसी (उत्तर प्रदेश), नागपूर (महाराष्ट्र) आणि पश्चिम गुजरातमधे सुमारे 15 दशलक्ष एलईडी बल्बचे वितरण केले जाईल.

पार्श्वभूमी
• 2014 साली, एलईडी बल्बचे दर Unnat Jyoti by Affordable Lighting for All (Ujala) या योजनेद्वारे सुमारे 310 रुपयांवरून 70 रुपये प्रति ब्लब अशी कपात केली होती.

योजनेचे महत्त्व
• एका अंदाजानुसार, सर्व 300 दशलक्ष बल्ब भारतात बदलल्यास, दर वर्षी 40,743 दशलक्ष किलोवॅट ऊर्जेची बचत होईल.
• यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यास मदत मदत होणार आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌

दुसऱ्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स' चे आयोजन कर्नाटकमधे
🗓 24 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• या वर्षाच्या शेवटी कर्नाटकमधे दुसऱ्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स' चे आयोजिन करण्यात आले आहे.
• याबाबतची घोषणा क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केली.
• बेंगलोरच्या जैन विद्यापीठात आणि राज्यातील इतर ठिकाणी भारतीय विद्यापीठ असोसिएशनच्या सहकार्याने हे खेळ आयोजित केले जातील.
• खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही देशातील सर्वात मोठी विद्यापीठ स्तरावरील क्रीडास्पर्धा आहे
• ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील अशा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे हा या क्रीडास्पर्धेचा उद्देश आहे.
• यावर्षीच्या या स्पर्धेत मल्लखांब आणि योगासने हे क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.
• ही क्रीडास्पर्धा फेब्रुवारी 2020 मधे भुवनेश्वर (ओडिशा) येथे पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____🖌

अहमदाबादमधील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नामकरण ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’
🗓 24 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आले आहे.
• स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. 
• भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आले. 
• 2016 मध्ये या स्टेडियममध्ये 54000 प्रेक्षकांची क्षमता होती. गुजरात क्रिकेट असोसिएशनने जानेवारी 2018 मध्ये नवीन आणि अत्याधुनिक व पूर्णपणे अशा सुसज्ज स्टेडियमच्या उभारणीसाठी नवीन क्रिकेट स्टेडियमचा पायाभरणी केली.
• हे स्टेडियम स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधणार्‍या लार्सन अँड टर्बो (एल & टी) कंपनीने बांधले आहे.

स्टेडियमची ठळक वैशिष्ट्ये
• 63 एकर क्षेत्रात पसरलेले हे स्टेडियम 1 लाख 10 हजार लोक बसण्याची क्षमता असलेले जगातील सर्वात मोठे स्टेडियम ठरले आहे.
• यापूर्वी 90 हजार क्षमता असलेले मेलबर्न हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते.
• या स्टेडियममध्ये 6 लाल आणि 5 काळ्या मातीच्या एकूण 11 खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. मुख्य आणि सराव खेळपट्ट्यांसाठी दोन्ही मातीच्या खेळपट्या वापरणारे हे पहिले स्टेडियम आहे.
• येथे पाऊस पडल्यास, खेळपट्टी फक्त 30 मिनिटांत वाळविली जाऊ शकते.
• या ठिकाणी अत्याधुनिक एलईडी फ्लडलाइटचा वापर केल्याने वातावरण तापणार नाही आणि प्रेक्षकांना तसेच क्रिकेटपटूंनाही त्रास होणार नाही.
• या स्टेडियमची एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे 9 मीटर उंचीवर 360 डिग्री पोडियम कॉन्कोर्स मुळे प्रेक्षकांची हालचाल सुलभ होते, तसेच कोणत्याही स्टँडवरील प्रेक्षकांना एकसारखे दृश्य दिसते.

स्रोत : लोकसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

मानिका बत्राने दुसऱ्यांदा जिंकले टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद
🗓 22 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• स्टार पॅडलर मनिका बत्राने वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये रीथ रिक्षाला 4-2 ने पराभूत करून दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
• राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिकंलेल्या माणिकाने 2015 ला हैदराबादमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम विजेतेपद मिळविले होते.
• त्याचबरोबर 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धेत ती उपविजेता ठरली होती.
• ती पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) चे प्रतिनिधित्व करते.

मनिका बत्रा
• तिच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस मधे सिंगापूरचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
• मनिका बत्राने याच राष्ट्रकुल स्पर्धेत सिंगापूरच्या यू मेनग्यूला हरवून प्रथमच भारतासाठी टेबल टेनिस महिला एकेरीत स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

स्रोत : नवभारत टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

जोकोविचचा नवा विक्रम; मेदवेदेवचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही.
• 21 फेब्रुवारीला झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.
• वर्षातील पहिल्या ग्रॅड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवत ऑस्ट्रेलियन जोकोविचने करिअरमधील 18 व्या ग्रॅड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बरोबर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमी 20 ग्रॅड स्लॅम विजेतेपदाच्या जवळ तो पोहोचला आहे. वयाची 30 ओलांडल्यानंतर जोकोविचने मिळवलेले हे सहावे ग्रॅड स्लॅम विजेतेपद आहे. याबाबत त्याने नदालच्या विक्रमशी बरोबरी केली आहे.
• चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे.
• मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (2005) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.
• जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनल व फायनलची कामगिरी 17-0 अशी आहे. नदालला लाल मातीचा बादशाह म्हटले जाते, तर मेलबोर्न पार्कचा दिग्गज जोकोविच आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता मेदवेदेवने गेल्या मोसमात सलग 20 सामने जिंकले आहेत आणि 12 वेळा त्याने जोकोविचसह अव्वल 10 मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंचा पराभव केला आहे
• जोकोविच मे महिन्यात 34 वर्षांचा झाला आणि तो 15 वर्षांपासून आपले वर्चस्व कायम राखणाऱ्या फेडरर व नदाल यांच्या दर्जाचा खेळाडू आहे; तर 25 वर्षीय मेदवेदेव विश्व टेनिसच्या भविष्यातील पिढीचा प्रतिनिधी आहे.
• फेडरर, नदाल व जोकोविच यांनी एकूण गेल्या 15 पैकी 14 ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. डोमिनिक थीमने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकले होते.

स्रोत : लोकसत्ता,लोकमत,सकाळ.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार

🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• वोकहार्ड फाउंडेशनच्या वतीने नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी ‘सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. तर रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
• आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि अन्य क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
• पशु कल्याण क्षेत्रातील योगदानासाठी ओएनजीसी, बालकल्याणसाठी वेदांता लिमिटेड, करोना काळातील कार्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर, दिव्यांग घटकांसाठी हिरो मोटोकॉर्प, शैक्षणिक क्षेत्रासाठी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पर्यावरणासाठी अशोक लेलँड, आरोग्य क्षेत्रासाठी गेल(इंडिया), कौशल्य विकासासाठी लार्सन अँड टुर्बो, ट्रान्सजेंडर एम्पपॉवरमेंटसाठी एस्सार, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी आयटीसी, महिला सबलीकरणासाठी आरईसी अशा मान्यवर संस्थांना गौरवण्यात आले.
• वैयक्तिक विशेष योगदानाबद्दल डॉ. जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे आणि सुरज कुमार यांना तर उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कोटक महिंद्रा बँक यांना सन्मानित करण्यात आले.
• रतन टाटा यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला.
स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची सहावी बैठक संपन्न
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची सहावी बैठक 20 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली.
• या बैठकीला 26 मुख्यमंत्री, 3 नायब राज्यपाल आणि दोन प्रशासकीय अधिकारी यांच्यासह केंद्रीय मंत्री (परिषदेचे पदसिद्ध सदस्य)आणि विशेष आमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
• नीती आयोगाचे उपाध्यक्ष,सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कॅबिनेट सचिव आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव देखील या बैठकीत सहभागी झाले होते.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचे समन्वयन केले.

या परिषदेचा अजेंडा खालीलप्रमाणे :-
1) भारताला उत्पादनाचे महत्वाचे जागतिक केंद्र बनवणे.
2) कृषीक्षेत्राची पुनर्रचना (पुनर्विचार).
3) प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा.
4) मनुष्यबळ विकासाला गती देणे
5) सेवांची उपलब्धता तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यात सुधारणा करणे.
6) आरोग्य आणि पोषक आहार.

• या परिषदेत, भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. त्यादृष्टीने अनुपालनाचा भर कमी करणे, राज्य पातळीवर सुधारणा घडवणे, लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा, जिल्हास्तरीय स्पर्धात्मकतेच्या माध्यमातून निर्यातीला प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती, अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या. प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक भांडवली गुंतवणूक उभी करणे आणि राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन अंतर्गत प्रकल्प पूर्ण करण्याची आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीत राज्यांची प्रभावी भूमिका असण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
• जल उपलब्धता,शुध्द पाण्याचा पुरवठा आणि खात्रीशीर वीजपुरवठा, इंटरनेट जोडणी तसेच बँडविड्थ उपलब्धता, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा, हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी शाश्वत कृषी पद्धती, अद्यायावत उत्पादन व्यवस्था आणि संशोधनासाठीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ उपक्रमाअंतर्गत निर्यातीला चालना, भविष्यातील तंत्रज्ञाना आणि सर्वसमावेशक प्रशासकीय मॉडेल्स निर्माण करण्याविषयी चर्चा झाली.
• या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत, प्रत्येक राज्याच्या बलस्थानांवर भर देण्यात आला जेणेकरून सर्वांना एकमेकांच्या उत्तम पद्धतींचा अवलंब करून लाभ घेता येईल. सदस्यांनी कौशल्ये, पुनरकौशल्ये आणि कौशल्यात सुधारणा करणे, यासाठीच्या संस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले. सेवांची उपलब्धता तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यावर देखील यावेळी भर देण्यात आला त्यासाठी ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर चर्चा झाली. विविध मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील उत्तम पद्धती विषयी सादरीकरण दिले ज्यांचा उपयोग इतर राज्यातही करता येऊ शकेल.
• यावेळी झालेल्या सकस आणि दर्जेदार चर्चेचे तसेच सर्व सदस्यांनी दिलेल्या विधायक प्रस्ताव आणि सूचनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. या सर्व प्रस्ताव आणि सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकत्रित प्रयत्नांतून आपण सगळे जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
• या बैठकीमुळे, सरकारच्या प्रत्येक पातळीवर एकत्रित उर्जेने काम करण्याचा मार्ग खुला झाला आहे,त्यानुसार अजेंड्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि समन्वय निर्माण करण्यात आला आहे
• या बैठकीमुळे आर्थिक, सामाजिक आणि लोकसांख्यिक आघाडीवर कल्याणाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी निर्माण झाली आहे.

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

स्रोत :लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌

हैदराबादला '2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड' म्हणून मान्यता
🗓 20 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• द आर्बर डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) हैदराबादला ‘2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली आहे.
• शहरी वनांच्या संवर्धनासाठी शहराच्या बांधिलकी लक्षात घेता ही मान्यता देण्यात आली आहे.
• असा दर्जा मिळविणारे हैदराबाद हे देशातील एकमेव शहर आहे.
• या सूचीमध्ये समाविष्ठ सर्वाधिक शहरे अनुक्रमे यूएसए, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांची आहेत.

अन्न व कृषी संघटना (FAO)
स्थापना आणि उद्देश - संयुक्त राष्ट्रसंघाची ही सर्वात मोठी विशेष एजन्सी आहे, जी ग्रामीण लोकसंख्येचे पोषण आणि जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये स्थापन केली गेली.
मुख्यालय - रोम, इटली.
सभासद - 197

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

‘पर्सिव्हियरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग.
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
• 19 फेब्रवारी रोजी पहाटे 2.30 वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जीझीरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.
• मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं.
• नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवला होता. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.
• नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिले छायाचित्र पाठवले असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केले. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येईल.
• नासाची ही मोहीम अनेक अर्थांनी विशेष असली तरी हे यान ज्या ठिकाणी उतरलं आहे ती जागा सुद्धा तितकीच खास आहे. हे यान मंगळावर कुठे उतरवण्यात यावं यासंदर्भात तब्बल पाच वर्षे संशोधन सुरु होतं त्यानंतर हे यान उतरवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या जागेचं नाव जीझीरो क्रेटर असं आहे.

जीझीरो क्रेटर
• नासाच पर्सिव्हियरन्स रोव्हर ज्या ठिकाणी उतरलं आहे या जागेचं नाव जीझीरो क्रेटर असं आहे. हे यान मंगळावर कुठे उतरवण्यात यावं यासंदर्भात पाच वर्षे संशोधन सुरु होतं त्यानंतर हे यान उतरवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली.
• 70 कोटी डॉलर्स खर्च करुन पाठवण्यात आलेल्या या पर्सिव्हिअरन्स रोव्हरला जीझीरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात उतरवण्यामागे एक विशेष कारण आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी या ठिकाणी फार पूर्वी एका नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश होता अशी शक्यता व्यक्त केलीय.
• जगभरातील वैज्ञानिक आणि नासामधील वैज्ञानिकांनी मंगळावरील एकूण 60 ठिकाणांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर जीझीरो क्रेटर या जागेची निवड केली आहे. नासाचं पर्सिव्हिअरन्स रोव्हर नक्की कुठे उतरवायचं यासंदर्भात तब्बल पाच वर्षे अभ्यास करण्यात आला. प्रत्येक जागा ही काही ना काही कारणाने विशेष होती. मात्र या सर्वांमध्ये जीझीरो क्रेटरने बाजी मारली.
• जवळजवळ 350 कोटी वर्षांपूर्वी या प्रदेशामधून नदीचा प्रवाह वाहत होता असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. या ठिकाणी एक तळंही असल्याचं सांगण्यात येतं. या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या पुराव्यांवरुन आणि पृष्ठभागाच्या रचनेवरुन येथे काही शे कोटी वर्षांपूर्वी पाण्याचा प्रवाह होता असं सांगण्यात येत आहे.
• मंगळावर अनेक हजार वर्षांपासून ओला व सुका कालावधी अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. यापैकी ओल्या कालावधीमध्ये जीझीरो क्रेटरच्या परिसरात सूक्ष्मजीव रहायचे असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा असेल तर खरोखरच या ठिकाणी जीवसृष्टीचे पुरावे आढळतील असं सांगितलं जात आहे.
• वैज्ञानिक आता या ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटरची मदत घेणार आहे. हा प्रदेश कसा आणि कशापासून निर्माण झाला, त्यामध्ये जीवसृष्टीचे काही पुरावे आढळतात का या सर्वाची चाचपणी येथील दगड आणि मातीचे परिक्षण करुन केली जाणार आहे.
• जीझीरो क्रेटर हा 45 किमी व्यास असणारा मंगळावरील प्रदेश आहे. हा प्रदेश मंगळावरील इसिडिस प्लॅनिटिया या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे. मंगळाच्या विषुववृत्तीय प्रदेशापासून हा प्रदेश अगदी जवळ आहे. नासाच्या क्युरॉसिटी या यानाने ज्या गाली क्रेटरजवळ लॅण्डींग केलं आहे तेथून 3 हजार 700 किमी दूर पर्सिव्हिअरन्स रोव्हरची ही लॅण्डींग साईट आहे.
• जीझीरो क्रेटरमध्ये कोट्यावधी वर्षांपूर्वी एक मोठी उल्का मंगळाच्या पृष्ठभागावर आदळली होती. त्यामुळे जो मोठा खड्डा निर्माण झाला तोच हा जीझीरो क्रेटर.
• उल्का आदळण्याच्या या घटनेला इसिडिस इम्पॅक्ट असं म्हणतात ज्यामुळे 1200 किलोमीटर व्यास असणारा खड्डा निर्माण झाला. त्यानंतरही या भागात अनेक लहानमोठे उल्कापात होत राहिले.
• या सततच्या उल्कापातामुळे येथील खडकाची रचना पूर्णपणे बदलली. मात्र याच बदलांमुळे जीवसृष्टीला पोषक वातारवण निर्माण झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यातच या ठिकाणी फार पूर्वी नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश होता असंही सांगण्यात येतं. द मार्स रिकनसेन्स ऑर्बिटर असणाऱ्या सीआरआयएसएमने या ठिकाणी सापडलेले काही मातीचे नमुने हे पाण्याची अंश असेल तरच तयार होऊ शकतात अशा पद्धतीचे असल्याचं संशोधनानंतर म्हटलं होतं.

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘गो इलेक्ट्रिक’ मोहिमेचा केला प्रारंभ
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘गो इलेक्ट्रिक’ या मोहिमेचा प्रारंभ केला.
• ई मोबिलिटी इको सिस्टीमचा विकास दर्शवणाऱ्या गो इलेक्ट्रिक च्या बोध चिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
• विजेवर चालणारी वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.
• आयातीचे 8 लाख कोटी रुपयांचे बिल असलेल्या जीवाश्म इंधनासाठी इलेक्ट्रिक इंधन हा महत्वाचा पर्याय असल्याचे गडकरी यांनी या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ करताना सांगितले.
• पारंपरिक इंधनाशी तुलना करता इलेक्ट्रिक इंधन हे कमी खर्चिक, कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वदेशी आहे.
• गो इलेक्ट्रिक मोहीम, येत्या काही वर्षात देशाचे आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल.
• देशभरात जागृती निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांचा आत्मविश्वास वृद्धिगत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
• उर्जा मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी ब्युरोकडे या ई मोबिलिटी,सार्वजनिक चार्जिंग यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

स्रोत :PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

डॉ हर्ष वर्धन यांनी मिशन इंद्रधनुष 3.0 चा केला प्रारंभ
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज मिशन इंद्रधनुष 3.0 चा प्रारंभ केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आयएमआय 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि आयएमआय 3.0 साठी मार्गदर्शक तत्वे जारी केली तसेच अभियानाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जागरूकता साहित्य / आयईसी पॅकेजचे प्रकाशन केले.
• मिशन इंद्रधनुष अभियानाच्या दोन फेऱ्या 22 फेब्रुवारी आणि 22 मार्च 2021 पासून सुरू होतील आणि देशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल.
• कोविड 19 महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधनुष 3.0 मध्ये भर दिला जाणार आहे.
• आयएमआय 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस दिली जाईल. प्रत्येक फेरी प्रत्येकी 15 दिवसांसाठी असेल.
• स्थलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
• मिशन इंद्रधनुष अंतर्गत आतापर्यन्त 690 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आणि 3 कोटी 76 लाख 40 हजार मुले आणि 94 लाख 60 हजार गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

स्रोत :PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌

अजय मल्होत्रा यांची ​​मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड
🗓 19 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• माजी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अजय मल्होत्रा ​​संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
• या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत.
• आपल्या सेवा कालावधीत त्यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते रशियामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत. त्यांनी केनियामधील नेरोबी इंडियन हाय कमिशनमध्येही काम केले आहे.
• नोव्हेंबर 2013 मधे ते परराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
• केनिया आणि सेशल्ससारख्या देशांशी देशाचे संबंध दृढ करण्यासाठी अजय मल्होत्रा ​​यांनी 1979 1982 to या काळात नैरोबीच्या उच्च आयोगातही काम केले आहे.
• 1985 मध्ये त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मिशनमध्ये सचिव म्हणूनही काम पाहिले. येथे त्यांनी 1989 पर्यंत सेवा बजावली.
• ILO मध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
• संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार सल्लागार समिती ही परिषदेची “थिंक टँक” म्हणून काम करते.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC)
• संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ही संस्था संयुक्त राष्ट्राचे एक अंग म्हणून एक आंतर-सरकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.
स्थापना - 2006 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जागी ही परिषद स्थापन केली गेली.
उद्देश - विविध देशांमध्ये मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि उल्लंघन झाल्यास तोडगा काढणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.
मुख्यालय - जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
सदस्य - 47, सदस्य भौगोलिक आधारावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात केले आणि जास्तीत जास्त दोन टर्म असतात.
• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान पुन्हा यूएनएचआरसीचा सदस्य झाला असून आता तो 2023 पर्यंत सदस्य राहील तर 2021 पर्यंत भारत परिषदेचा सदस्य आहे.
• अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

स्रोत : द हिंदू, अमर उजाला
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌

यूएनसीडीएफ च्या कार्यकारी सचिव पदी भारतीय वंशाच्या प्रीती सिन्हा यांची नियुक्ती
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडने (यूएनसीडीएफ) भारतीय वंशाच्या गुंतवणूक आणि विकास क्षेत्रातील बँकर प्रीती सिन्हा यांना कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
• त्यांनी ज्युडिथ कार्ल यांची जागा घेतली, ज्यांनी युनायटेड नेशन्समधील 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली आहे.
• कार्यकारी सचिव हे यूएनसीडीएफमध्ये सर्वोच्च नेतृत्व पद आहे.
• सध्या सिन्हा, फायनान्स फॉर डेव्हलपमेंट एलसीसी या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत, ही संस्था जिन्हेवा मधील एक डेव्हलपमेंट फायनान्स संस्था आहे.
• यापूर्वी, त्यांनी नवी दिल्लीतील सामाजिक-आर्थिक विकासासाठी खासगी क्षेत्रातील थिंक टँक येस ग्लोबल इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक पद सांभाळले आहे.
• आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेतही त्यांनी वरिष्ठ संसाधन उभारणीची भूमिका बजावली आहे.

युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (यूएनसीडीएफ)
• जगभरातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 1966 मध्ये युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (यूएनसीडीएफ) ची स्थापना केली.
• या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
• ही संस्था अल्प विकसित देशांना (एलडीसी) छोटी कर्ज उपलब्ध करून देते.

स्रोत : नवभारत टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना 'गांधी शांतता पुरस्कार 2020'
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतीच गांधी शांतता पुरस्कारांची घोषणा केली.
• 2020 साठीच्या पुरस्कारासाठी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची तर 2019 च्या पुरस्कारासाठी ओमानचे दिवंगत सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

बंगबंधू शेख मुजीबुर रहमान
• बंगबंधू शेख मुजीबुर रहमान हे पहिले राष्ट्रपती होते आणि नंतर ते बांगलादेशचे पंतप्रधानही बनले.
त्यांना 'राष्ट्रपिता' किंवा 'मुजीब' म्हणतात.
• 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती.

गांधी शांतता पुरस्कार
• भारत सरकारने 1995 मध्ये महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
• या पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असते. तर मुख्य न्यायाधीश, लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता हे दोघे पदसिद्ध सदस्य असतात. तर इतर दोन सदस्य असतात.
• महात्मा गांधी यांच्या नावाने दिला जाणारा हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
• हा एक वार्षिक पुरस्कार असून व्यक्ती किंवा संस्थांना अहिंसा आणि इतर गांधीवादी आदर्शांद्वारे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात येतो.
• 1 कोटी रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌

21 मार्च : आंतरराष्ट्रीय वन दिन
🗓 21 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• 21 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.
• यंदाच्या या दिनाची थीम (विषय) 'Forest restoration: a path to recovery and well-being' अशी आहे.
• आंतरराष्ट्रीय वन दिन सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वविषयी जागरूकता पसरविण्यावर लक्ष केंद्रित करतो.
• आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त देशांना वृक्षारोपण मोहिमेशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन दिले जाते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी
• 28 नोव्हेंबर, 2012 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने 21 मार्चला आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून मान्यता दिली.
• 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.

21 मार्च रोजीच का?
• सूर्य 21 मार्च व 22 किंवा 23 सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो.
• त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

जास्मिन हॅरिसन ठरली अटलांटिक महासागर पार करणारी सर्वात कमी वयाची महिला
🗓 24 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• ब्रिटनमधील 21 वर्षाची एक शिक्षिका जास्मिन हॅरिसन ही एकट्याने बोट चालवत अटलांटिक महासागर पार करणारी सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे.
• उत्तर यॉर्कशायरमध्ये राहणारी जास्मिन ही अर्धवेळ जलतरण शिक्षिका आहे.
• जास्मिनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅनरी आयलँडच्या ला गोमेरा येथून प्रवासाला सुरुवात केली होती, अटलांटिक महासागरात असलेल्या अँटिगाला पोहोचण्यासाठी तिला 70 दिवस, 3 तास आणि 48 मिनिटे लागली. हे अंतर 4,828 किलोमीटर आहे.
• जास्मिनने या प्रवासादरम्यान 10 हजार पौंड देणगी म्हणून गोळा केले. ही रक्कम समुद्रातील मासेमारीविरूद्ध मोहीम राबविणार्‍या ब्लू मरीन फाउंडेशनला देण्यात आली आहे.
• आतापर्यंत एकट्याने बोट चालवत अटलांटिक ओलांडणारी सर्वात तरुण महिला अमेरिकेची 22 वर्षाची केटी स्पॉत्झ ही होती, तिने 2010 मधे हा प्रवास केला होता.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌

अमेरिका पुन्हा एकदा पॅरिस करारात सामील
🗓 22 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अमेरिका पुन्हा एकदा पॅरिस करारामध्ये अधिकृतपणे सामील झाला आहे.
• माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने गेल्या वर्षी या करारातुन अधिकृतपणे माघार घेतली होती.
• 20 जानेवारी रोजी जो बिडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतल्याच्या काही तासांनंतर पॅरिस करारात पुन्हा सामील होण्याच्या प्रक्रियेसंदर्भात कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती.
• बिडेन यंदा 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिनी हवामान बदल परिषद घेण्याची योजना आखत आहेत. या परिषदेत, बायडेन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे अमेरिकेचे लक्ष्य जाहीर करतील.

पॅरिस करारातील मुख्य तरतुदी
• जागतिक तापमानवाढ 2.0 अंश सेल्सियसपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि ती 1.5 अंश सेल्सियसपर्यंत ठेवण्याचा उद्देश.
• हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी उपाय योजना करणे.
• दर पाच वर्षांनी प्रत्येक देशाचं हरितगृह वायू उत्सर्जनाचं मोजमाप करणे, म्हणजे त्यांना कोणत्या उपाय योजना करायच्या आहेत, याचा अंदाज येऊ शकेल.
• पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांना मदत करावी.

स्रोत : बीबीसी मराठी, इंडियन एक्सप्रेस
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जपानच्या ओसाकाने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले!
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची करामत जपानच्या नाओमी ओसाकाने यावेळीही साधली. जपानच्या ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिचा सहज धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
• ओसाकाचे हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे दुसरे जेतेपद ठरले. ओसाकाने आठव्यांदा ग्रँडस्लॅम खेळताना चौथ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.
• जेतेपदाच्या लढतीत ओसाकाने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ब्रॅडी हिला डोके वर काढण्याची कोणतीच संधी दिली नाही. तिने हा सामना 6-4, 6-3 असा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
• सेरेना विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, ओन्स जबेऊर आणि साय सू-वेई या अव्वल खेळाडूंवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ओसाकाने ब्रॅडी हिलाही सहज पराभूत केले.
• कारकीर्दीच्या सुरुवातीलाच चार ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी ओसाका ही मोनिका सेलेसनंतरची (1991) दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. त्याचबरोबर चार ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या 15 जणींच्या मांदियाळीत ओसाकाने स्थान पटकावले.
• ओसाका हिने कारकीर्दीत चार ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली असून तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची दोन (2019, 2021) तसेच अमेरिकन स्पर्धेची दोन (2018, 2020) जेतेपदे मिळवली आहेत.
• मोनिका सेलेसने 30 वर्षांपूर्वी अशाप्रकारे आपली कारकीर्द सुरू केल्यानंतर अशी कामगिरी करणारी ओसाका पहिली महिला खेळाडू आहे.
• ओसाकाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. तिने 2018 मध्ये अमेरिकन ओपन व 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. 23 वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला, पण ती तीन वर्षांची असताना तिचे कुटुंबीय अमेरिकेमध्ये स्थायिक झाले.
• दरम्यान, 25 वर्षीय अमेरिकन खेळाडू ब्रॅडी आपली पहिली ग्रँडस्लॅम फायनल खेळत होती. ज्यावेळी जानेवारीमध्ये ती ऑस्ट्रेलियात आली त्यावेळी विमानात कुणी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तिला 15 दिवस कडक विलगीकरणात रहावे लागले.
• स्टेडियममध्ये जवळजवळ 7500 प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. केवळ दोन सक्रिय महिला खेळाडूंनी ओसाकापेक्षा अधिक ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्यात सेरेना (23) व व्हीनस विलियम्स (7) यांचा समावेश आहे. आता ओसाकापुढे पुढील लक्ष्य क्ले व हिरवळीवर आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे राहील. कारण फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये तिला तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही.

स्रोत : लोकसत्ता,लोकमत,सकाळ.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी 21 फेब्रुवारी साजरा केला जातो.
• 17 नोव्हेंबर 1999 ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.
• 2002 च्या ठरावात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने या दिवसाच्या घोषणेचे स्वागत केले.
• 21 फेब्रुवारी 1952 मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.
• नोव्हेंबर 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला.
• संयुक्त राष्ट्र महासभेने 16 मे 2009 रोजी वापरल्या जाणाऱ्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राज्य केले.
• ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम:
• 2019: International Year of Indigenous Languages.
• 2020: Annual theme: "Safeguarding linguistic diversity".
• 2021: Annual theme: "Fostering multilingualism for inclusion in education and society".

स्रोत : https://www.un.org/en/observances/mother-language-day.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेविषयी माहिती :-
• नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेत पंतप्रधान, सर्व राज्यांचे आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, स्थायी सदस्य आणि विशेष आमंत्रितांचा सहभाग असतो.
• राष्ट्रोय विकासासाठी प्राधान्याच्या विषयांवर निर्णय आणि सल्लामसलत करण्यासाठीचे हे एक प्रमुख व्यासपीठ आहे, ज्यात विकासाच्या सराव मुद्दयांवरील धोरण ठरवण्यात राज्यांचा सक्रीय सहभाग असतो.
• देशात सहकार्यात्मक संघराज्य व्यवस्थेचे जतन करणे नीती आयोगासाठी अनिवार्य असून त्यासाठी, राज्यांसोबत संरचनात्मक समर्थन देणारे उपक्रम आणि यंत्रणा निर्माण करणे, तसेच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्वाला अनुसरून, भक्कम राष्ट्राच्या उभारणीसाठी भक्कम राज्यांचे महत्व लक्षात घेऊन, त्यानुसार वाटचाल करणे अभिप्रेत आहे.
• नीती आयोगाची प्रशासकीय परिषद पहिली परिषदेच- 8 फेब्रुवारी 2015 झाली होती. आजवर या परिषदेच्या सहा बैठका झाल्या आहेत.
नीती आयोग रचना
 अध्यक्ष : श्री नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान
 उपाध्यक्ष : राजीव कुमार डॉ
 पूर्ण वेळ सदस्यः विवेक देबरॉय, व्ही. के. सारस्वत, श्री रमेश चंद
 पदसिद्ध सदस्यः केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधा मोहन सिंह
 विशेष निमंत्रकः नितीन गडकरी, स्मृती इराणी, थावर चंद गेहलोत
 मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री.अमिताभ कांत


स्रोत :PIB,NITI आयोगाची अधिकृत वेबसाईट.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले.
• करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
• कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी 2020 पासून या औषधावर काम सुरू केले होते.
• स्वामी रामदेव यांनी या घडामोडीबाबत सांगितले, की कोरोनिल हे सर्वानाच करोनाविरोधी उपायात प्रभावी असल्याचे दिसून येईल. निसर्गोपचार पद्धतीचा वापर यात केला असून ते सर्वाना परवडणारे औषध आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती सादर केली असून कोरोनिल गोळ्या या कोविड 19 विषाणूला प्रतिबंध करतात.
• या वेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पतंजलीच्या संशोधनामुळे देशाला नक्कीच फायदा होईल, असे सांगत बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे आभार मानले. ते वैज्ञानिक आधाराद्वारे पुन्हा लोकांसमोर आले आहेत, त्यामुळे औषधावरील लोकांचा विश्वास वाढेल, अशी खात्री गडकरी यांनी व्यक्त केली.
• करोनाच्या साथीपूर्वी आयुर्वेद संबंधीचा बाजाराची दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढ होत असे मात्र या काळात 50 ते 90 टक्क्यांनी वाढ झाली, असे सांगत हर्ष वर्धन यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास वाढत असल्याचे सांगितले.
• केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कोरोनिल औषध बाजारात आणण्यात आले. कोरोनिलला केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संघटनेच्या आयुष शाखेने औषधी उत्पादन म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनिल हे औषध आता 158 देशात निर्यात होऊ शकेल.
आधीचा वाद : पतंजली कंपनीने म्हटले आहे, की त्यांनी 23 जूनला कोरोनिल हे औषध जारी केले होते त्या वेळी करोनाची साथ जोरात होती. त्या वेळी आयुष मंत्रालयाने या औषधाला केवळ आजाराची तीव्रता कमी करणारे औषध म्हटले होते. तर आता, आयुष मंत्रालयाने या औषधाचा उल्लेख हा करोनावरील इलाज ऐवजी करोना प्रतिबंधक औषध असा करावा असे सांगितले असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.


स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______
🖌

पर्सिव्हिअरन्स मोहिमेत स्वाती मोहन यांचे नेतृत्व
🗓 21 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेची ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गीसारखी मोठी गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या अंतिम थरारक काळातील नेतृत्व एका भारतीय अमेरिकी महिलेने केले आहे. त्यांचे नाव स्वाती मोहन आहे.
• जेव्हा नासाचे मार्स रोव्हर पर्सिव्हिअरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा त्याचं नियंत्रण आणि लँडिंग प्रणाली हाताळणारी व्यक्ती ही एक भारतीय वंशाची वैज्ञानिक होती. स्वाती मोहन यांनी पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रण आणि लँडिंग सिस्टमचे नेतृत्व केले ज्यात विशेषतः कठीण टचडाउनचे नेव्हीगेशन त्यांनी केले होते.
• त्यांनीच मार्स 2020 मोहिमेतील या अंतिम क्षणांना यशाची किनार चढवली. मंगळाच्या वातावरणातून रोव्हर गाडी तेथील वातावरणातून पृष्ठभागावर उतरवतानाचा जो काळ असतो त्याला कुठल्याही मोहिमेतील थरारक काळ मानला जातो. या काळात स्वाती मोहन यांनी या रोव्हर गाडीला मार्गदर्शन, दिशादर्शन करून र्सवकष नियंत्रण यशस्वीपणे पार पाडले.
• नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅवडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) पर्सिव्हिअरन्स या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडींग केले. मंगळाच्या वातावरणातील लँडींग आधीची शेवटची सात मिनिटे ही रोव्हरसाठी फारच कठीण होती.
• संपूर्ण जगाने पर्सिव्हिअरन्स या रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागावर नाट्यमय आणि कठीण अवस्थेतून जाताना पाहिले. या दरम्यान स्वाती मोहन यांनी शांतता आणि चिकाटीने काम केले. त्यांनी जीएन अँड सी उपप्रणाली आणि या प्रकल्पातील इतर संघ यांच्याशी व्यवस्थितपणे संवाद आणि समन्वय साधला.
• स्वाती मोहन सुरुवातीपासूनच पर्सिव्हिअरन्स मार्स मिशनशी संबंधित आहेत आणि सात वर्षांपासून या प्रकल्पावर कार्यरत आहेत. त्यांनी नासाच्या कॅसिनी या शनी ग्रहासाठीच्या मिशनसाठी देखील काम केले आहे.
• मोहन यांनी सांगितले की, परसेव्हेरन्स ही गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरली असून अतिशय अवघड अशी कामगिरी यातून आम्ही पार पाडली आहे. मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंत्रण हे या मोहिमेत अवकाशयानाचे कान व डोळे असतात ते योग्य प्रकारे काम करीत असतील तरच रोव्हर गाडी यशस्वीपणे उतरू शकते.

स्वाती मोहन
• स्वाती मोहन या उत्तर व्हर्जिनियातून लहानाच्या मोठय़ा झाल्या. नंतर वॉशिंग्टन महानगरात आल्यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून यांत्रिकी व अवकाशगतिकी अभियांत्रिकीत पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी एरॉनॉटिक्स व अॅास्ट्रॉनॉटिक्स या शाखात मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएचडी केली आहे.
• नासामध्ये काम करीत असताना मोहन यांची पहिल्यांदा शनीवरील कॅसिनी मोहिमेसाठी निवड झाली त्यावेळी चंद्रावरील ग्रेल मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. मंगळ 2020 मोहिमेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता.
• 2013 पासून त्या अवकाश मोहिमांत काम करीत आहेत.
• वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा ‘स्टार ट्रेक’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विश्वाच्या वेगवेगळ्या भूभागांच्या सुंदर चित्रणांमुळे त्या अचंबित आणि आश्चर्यचकित झाल्या. त्यांना तेव्हाच कळले होते की आपल्याला हेच करायचे आहे आणि या विश्वातील नवीन आणि सुंदर ठिकाणे शोधायची आहेत.त्यातून त्यांना अवकाश मोहिमांत काम करण्यात रस वाटू लागला.
• स्वाती मोहन यांना प्रथम बालरोगतज्ञ व्हायचं होतं, परंतु त्यांचा पहिला भौतिकशास्त्राचा तास आणि त्यांच्या शिक्षिका यामुळे त्यांना अभियांत्रिकी हेच आपल्या अंतराळ संशोधनातील आवड जपण्याचे साधन असल्याचे समजले.

‘नासा’चे रोव्हर ‘परसेव्हेरन्स’
• सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेची ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गीसारखी गाडी मंगळावर उतरवण्यात यश आले आहे.
• आतापर्यंतची ही सर्वात प्रगत गाडी असून शुक्रवारी अतिशय उत्कंठावर्धक वातावरणात ती मंगळावर उतरली. मंगळावरील सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम ही गाडी करणार आहे.
• अतिशय प्रगत तंत्रज्ञान या गाडीत वापरण्यात आले असून ही मंगळ मोहीम 2020 गेल्या 30 जुलैला सुरू झाली होती.
• गेल्या वर्षी फ्लोरिडातील केप कॅनव्हरॉल येथून अवकाशयानासह ही गाडी पाठवण्यात आली होती. ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरली असून जेझेरो विवरात ती अलगद उतरली.
• पृथ्वीपासून 472 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून ही गाडी उतरली असून मंगळावरचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
• एका मोटारीच्या आकाराइतकी 1026 किलोची रोव्हर गाडी या मोहिमेत अनेक आठवडे तेथील पृष्ठभागावर चाचण्या करणार आहे. जेझेरो विवरात ती उतरली आहे.

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

• पृथ्वीवर अशाप्रकारच्या मातीचे नमुने मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ सापडतात. या ठिकाणी दगडांमध्ये राहणारे सूक्ष्मजीव आढळून आळे आहेत. त्यामुळे मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटर ही एकदम उत्तम जागा असल्याचे सांगितले जात आहे.
• नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
• मानवाला मंगळावर कसं पाठवता येईल यासंदर्भातील संशोधन पर्सिव्हिअरन्स मोहिमेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी काय करता येईल यासंदर्भातही संशोधन या मोहिमेमध्ये केलं जाणार आहे. पर्सिव्हिअरन्स रोव्हरवर मॉक्सील नावाचे एक यंत्र बसवण्यात आलं असून त्याच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्माण करता येईल का यासंदर्भातील चाचणी करण्यात येणार आहे.
• ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल.


स्रोत :लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______
🖌

20 फेब्रुवारीला नीती आयोगाची सहावी प्रशासकीय परिषद.
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• 20 फेब्रुवारीला नीती आयोगाची सहावी प्रशासकीय परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहतील.
• या बैठकीमध्ये कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादन, मनुष्यबळ विकास, तळागाळातील नागरिकांपर्यंत सेवा वितरण आणि आरोग्य व पोषण या विषयावर चर्चा करण्यात येईल.
• प्रशासकीय परिषद आंतर-क्षेत्र, आंतर-विभागीय आणि संघराज्यीय विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करते.
• यामध्ये पंतप्रधान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, इतर केंद्रशासित प्रदेशांचे विधिमंडळ आणि उपराज्यपाल यांचा समावेश आहे.
• या सहाव्या बैठकीत जम्मू-काश्मीर आणि लडाख पहिल्यांदाच केंद्रशासित प्रदेश म्हणून सहभागी होणार आहेत.
• यावेळी प्रशासकांच्या नेतृत्वाखालील इतर केंद्रशासित प्रदेशांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
• या बैठकीला प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य, केंद्रीय मंत्री, उपाध्यक्ष, नीती आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि भारत सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील.
• नीती आयोगाची प्रशासकीय परिषद पहिली परिषद 8 फेब्रुवारी 2015 झाली होती.
नीती आयोग
अध्यक्ष : श्री नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान
उपाध्यक्ष : राजीव कुमार डॉ
पूर्ण वेळ सदस्यः : विवेक देबरॉय, व्ही. के. सारस्वत, श्री रमेश चंद
पदसिद्ध सदस्य : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधा मोहन सिंह
विशेष निमंत्रक : नितीन गडकरी, स्मृती इराणी, थावर चंद गेहलोत
मुख्य कार्यकारी अधिकारी : श्री.अमिताभ कांत

स्रोत :PIB. https://www.niti.gov.in
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

डीआरडीओ ने विकसित केलेल्या रणगाडा भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणाली ‘हेलीना’ आणि ‘धृवास्त्र’ ची चाचणी यशस्वी
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• हेलीना (लष्करासाठीची आवृत्ती) आणि धृवास्त्र (हवाई आवृत्ती) क्षेपणास्त्र प्रणालींच्या यशस्वी चाचण्या आज वाळवंटी प्रदेशातल्या अत्याधुनिक हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म वरून करण्यात आल्या. संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना- डीआरडीओ ने या प्रणाली विकसित केल्या आहेत.
• या क्षेपणास्त्रांची किमान आणि कमाल टप्प्यावरची क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या पाच प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. ही क्षेपणास्त्रे आकाशात घिरट्या घालणाऱ्या लक्ष्यावर, तसेच विमानांमधून हलत्या आणि स्थिर लक्ष्यांवर नेम धरुन सोडण्यात आली. तर काही चाचण्या जुन्या, निरुपयोगी रणगाड्यांना लक्ष्य करुन करण्यात आल्या. तर एक चाचणी पुढे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हवेतच हलत असलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी होती.
• हेलीना आणि ध्रुवास्त्र ही तिसऱ्या जनरेशनची, वापरण्यापूर्वीच लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्याचा अचूक वेध घेणारी, रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली असून थेट मारा तसेच वरुन मारा केल्यावरही अचूक लक्ष्यभेद करण्याची त्यांची क्षमता आहे.
• सर्व ऋतूमध्ये, कोणत्याही हवामानात दिवसरात्र काम करण्यास सक्षम असलेली ही प्रणाली, पारंपारिक शस्त्रासांनी सज्ज असलेल्या तसेच स्फोटके असलेल्याही रणगाड्यांचा पराभव करू शकते.
• हे जगातली सर्वात अत्याधुनिक असे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज आहेत.

स्रोत :PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌

शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी आरबीआय कडून समिती गठीत
🗓 19 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

•रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्यासंबंधित अ‍ॅप्रोचशीट तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे.
• या आठ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एनएस विश्वनाथन हे असून समितीच्या सदस्यांमध्ये नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांचाही समावेश आहे.
• ही समिती विद्यमान नियामक प्रणालीचा आढावा घेईल आणि शहरी सहकारी बँका मजबूत करण्यासंबंधित सूचना देईल. तसेच त्यांच्या मजबूत स्थितीबद्दलच्या संभाव्यतेचे मूल्यांकनही करेल.
• समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागणार आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची केली पायाभरणी
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नुकतीच ओडिशातील औद्योगिक शहर, रुरकेला येथे जागतिक दर्जाच्या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली.
• हे देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम असेल.
• रुरकेला येथील 20,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या हॉकी स्टेडियमला स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.
• या स्टेडियमवर 2023 मधील पुरुष हॉकी विश्वचषक सामने खेळले जातील.
• रुरकेला येथील बिजू पटनायक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये 15 एकर जागेवर हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे.

महत्वाचे -
• अहमदाबादच्या मोटेरामध्ये बांधलेल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमची क्षमता 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त आहे.
• जगातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये एवढी प्रेक्षक क्षमता नाही.
• या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना 24 फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे.

बिरसा मुंडांबद्दल -
• बिरसा मुंडा यांचा जन्म सन 1875 मध्ये झाला. ते मुंडा जमातीचे होते.
• बिरसांचा असा विश्वास होता की त्यांना लोकांच्या हितासाठी आणि त्यांच्या दु: खावर विजय मिळविण्यासाठीच देवाने पाठविला आहे, म्हणून त्यांनी स्वत: ला देव मानले.
• त्यांना 'धरती अब्बा' किंवा 'जगत पिता' म्हणून संबोधले जाते.
•1899-1900 मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात झालेला मुंडा विद्रोह छोटा नागपूर (झारखंड) क्षेत्रातील महत्वाचा विद्रोह होता.
• या विद्रोहाला 'मुंडा उलागुलन' (बंड) असेही म्हणतात ज्याचा अर्थ 'महाविद्रोह' असा आहे.
• आदिवासींच्या चळवळींमधील सर्वात विस्तृत आणि संघटित बिरसा आंदोलन होते. सावकारांना व्याज आणि इंग्रजांना कर देऊ नका असे ते लोकांना सांगत होते.

स्रोत : द हिंदू, नवभारत टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…

स्पर्धावाहिनी

🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

फाफ डुप्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
• या महिन्याच्या सुरुवातीस फाफ डुप्लेसिसने पाकिस्तानमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला.
• 36 वर्षीय डुप्लेसीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 मध्ये एडलेड ओव्हल येथे कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने दुसर्‍या डावात नाबाद 110 धावा फटकावल्या होत्या.
• फॅफ डुप्लेसिसने आपला शाळेचा मित्र असलेल्या एबी डिव्हिलियर्सकडून कर्णधारपद स्वीकारले होते.
• दक्षिण आफ्रिकेचा तो एकमेव कर्णधार आहे, ज्याने 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याचबरोबर 2018 मधे आफ्रिकेत देखील त्यांना पराभूत केले होते. .
• त्याने एकूण 27 कसोटी सामन्यांचे नेतृत्त्व करताना 17 विजय मिळविले.
• डुप्लेसिस ने 69 टेस्ट मॅचच्या एकूण118 डावांमध्ये 40.02 च्या सरासरीने 4163 रन बनविले आहेत, ज्यामध्ये 10 शतक आणि 21 अर्धशतक सामील आहेत.
• कसोटी क्रिकेट मधे त्याचा सर्वाधिक स्कोर 199 रन आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini

Читать полностью…
Subscribe to a channel