vastavmarathi | Unsorted

Telegram-канал vastavmarathi - वास्तव (सत्य की आभास)©®

-

मराठी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरच काही..... Our chaneel invite link https://t.me/vastavmarathi Contact to Admin👉 @Shiv311 तक्रारी- @Tkrarsuchana_bot

Subscribe to a channel

वास्तव (सत्य की आभास)©®

पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपण होऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली असं समजावं...!🌿🌾🌷

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

नातं विश्वासाचं
✍️ विचार

ढीगभर नात्याची गरजच नसते माणसाला मनापासून एक माणूस जरी सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो....😊

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

🧡⛳अभिमानाचा दिन असणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कामगारांच्या कष्टाला सलाम करण्याचाही हा दिवस आहे. कामगार एकजुटीचा विजय असो🌏⛳🚩
🚩महाराष्ट्रदिन PK ग्राफिक्स

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

एकट्या सुईचा स्वाभाव टोचणारा असतो पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसर्यांना जोडणारा बनतो...

🦋🍁🦋🍁🦋🍁🦋

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

शेवटपर्यंत सोबत रहायला जमलं पाहिजे, जायचं तर सगळ्यांना आहे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

❝ ढिगभर पैसा असला म्हणून कोणी Royal होत नाही...
Royal साठी माणूस हा Real असावा लागतो...❞

माणुसकी 'InBuilt' असली पाहिजे..
जगदंब...🙏🏻🚩🚩

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

जबाबदा-या
अंगावर पडल्या की
आयुष्यातून
कंटाळा नावाचा
शब्द निघून जातो....

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

दगडात माणसाच्या मुर्ती घडविणं सोपं जात परंतु माणसाच्या मुर्तीत माणुसकी घडवणे थोडं अवघड जातं...❣️⛱️💫

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

चूक...
"चूक झाल्यावर सोडून तर सगळेच जात असतात...
"आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती अशी शोधा जे चूक झाल्यावर तुम्हाला समजून सांगेल अन् कायम साथ देईल"....!!
"आयुष्यामध्ये वापर करून घेणारे भरपूर भेटतील.अन् आयुष्याची दिशाभूल करणारे सुद्धा भरपूर भेटतील...
"पण चुका झाल्यानंतर समजून घेणारे अन् समजून सांगणारे फार खूप कमी असतात".....!!
"आयुष्यामध्ये योग्य वाट दाखवणारे फार कमी असतात"....!!
अन् आयुष्याची वाट लावणारे भरपूर असतात....
"जे निस्वार्थपणे कायम साथ देतात.अन् योग्य दिशा दाखवतात...
"अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवापाड जपावं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत"....!!

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

_*कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.*_

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!!🙏🏻🚩


जय सिताराम🚩जय हनुमान

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

इवलंसं रोपटं मी तू म्हणालास तर मरून जाईन ओंजळभर पाणी दे मला आयुष्यभर तुझ्या कामा येईन दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राणवायू देईन जगवलंस मला तर तुझ्या देवांसाठी फुलं देईन फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी फळं देईन तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला सावली देईन तुझ्या सानुल्यांना खेळावया माझ्या खांद्यावर झोका देईन तुझ्या आवडत्या पाखरांना मायेचा मी खोपा देईन कधी पडला आजारी तर तुझ्या औषधाला कामा येईन झालो बेईमान जरी मी शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन .... .. एक ईवलंसं रोपटं

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

शांत मन ....
जोडलेल्या हाताद्वारे ...
खूप काही बोलून जातं...!

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

!! येत्या काही दिवसात संपुर्ण महाराष्ट्रात ऊन्हाळ्याचा पारा वाढणार आहे, शक्यतो सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळी घरातून बाहेर पडू नका.जरूरी असल्यास,घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या कानात कापसाचा एक छोटासा बोळा ठेवा . यामुळे डावी नाकपुडी सुरू होईल .ही चंद्रनाडी असल्याने शरीर थंड होण्यास मदत होईल. ऊन्हाने होणार्या मायग्रेन, हार्टस्ट्रोक , पित्त ,हाय बी.पी.चक्कर येणे ह्या सारख्या विकारा पासून तुम्हीं सुरक्षित रहाल. हा उपाय नक्की करा. जान हैं तो , जहांन हैं . !!

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

नातं म्हटलं की त्यात तीन गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिली म्हणजे विश्वास, सहवास आणि समजूतदारपणा. जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर नात्याची इमारत उभी राहते. सहवासाचं कोंदण असेल तर नाते फुलते आणि समजूतदारपणा असेल तर संशय निर्माण होत नाही. समजूतदारपणा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण आपल्यापेक्षा समोरच्याच्या मनाचा जास्त विचार करतो. या मध्ये दोन शक्यता असतात. त्यातली पहिली अशी की आपला समंजस स्वभाव हा कोणालाही आपलासा वाटतो आणि दुसरी शक्यता अशी असते, काही गोष्टी या पटल्या जरी नाही तरी सोडून द्याव्या लागतात. या वर आपले व.पु. म्हणतात, " शेवटी ज्या माणसाजवळ जास्त understanding आहे, त्यालाच आपला अट्टाहास काही प्रमाणात सोडावा लागतो.." अहो, नातं महत्वाचं असेल, व्यक्ती महत्वाची असेल तर या गोष्टी ओघाने कराव्याच लागतात. आपल्याला नेहमी वाटते, सर्व माणसं सुखात असावीत, त्या साठी आपण प्रयत्न देखील करतो पण प्रत्येकाची सुखाची, आयुष्य जगण्याची व्याख्या ही वेगळीच असते ना!! ती जर आपल्या व्याख्येनुसार नसेल तर तिथे मात्र आपला अट्टाहास सोडणं भाग असतं..
विवाह हा असा संस्कार आहे, ज्यामध्ये फक्त मुलगा मुलगीच नाही तर दोन कुटुंबं एकत्र येतात. जशी हाताची पाच बोटे सारखी नसतात तसंच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. त्यामुळे रुसवे फुगवे, मतभेद हे होत असतातच. पण मन सांभाळताना जेव्हा स्त्री किंवा पुरुष हे कात्रीत सापडतात तेव्हा समजूतदारपणा कुठे दाखवावा हा प्रश्न पडतो. स्त्रीच्या बाबतीत विचार केला तर तिला दोन्ही घरातील माणसं जपावी लागतात. या वर देखील व.पुं.नी मांडलेला विचार खरच चिंतनीय आहे, " ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षांचं प्रेम हवं असतं, त्यांचं घर कायम वणव्यात बांधलेलं असतं. आयुष्यभर होरपळणं.." आपण म्हणतो, समजूतदारपणा हा स्वभावात असावा, पण तो इतकाही असू नये की मनाने दिलेला कौल देखील ऐकू येणार नाही. समंजस व्यक्ती या बऱ्याचदा शांत असतात. पण त्यांची शांतता ही समजून घ्यावी लागते. व.पुं.नी हे जे काही लिखाणाचे भांडार आपल्यासाठी खुले केले आहे त्यामध्ये समजूतदारपणा म्हणजे काय? तो नात्यात किती असावा याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
समजूतदारपणा सोबतच संसार कसा यशस्वी होतो या वर देखील व.पुं.नी अतिशय साजेसे विचार व्यक्त केले आहेत. दिवसभरात कितीही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या किंवा अपमानाचे प्रसंग आले तरी त्या गोष्टी त्याच दिवशी संपवून दुसरा दिवस हा नवी आशा घेऊन उगवतो हे या विचारावरुन पटते, " एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही.."
... मानसी देशपांडे

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

_वेगळेपणाने जगलेल्या आयुष्याचा स्ट्राईक रेट कधीही ज्यास्तच असतो !!_❣️❣️

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

ती मुक्त झाली......


       सूर्य डोईवर आला आणि तिला जाग आली. तिला आश्चर्य वाटले,'हे काय दिवस उजाडला तरीही तिला आज कोणी उठवलं नाही, कसला गोंधळ नाही, कसला कोणाचा राग नाही, मार नाही, कसली धावपळ नाही ,नक्की घडतंय तरी काय? तिला प्रश्न पडला.
    ती उठली, पाहिलं तर घरात कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं. तेवढ्यात, तिची नजर घराच्या बाहेर अंगणात पडली. "हा काय गोंधळ आहे, एवढी गर्दी माझ्या घराच्या अंगणात नक्की झाले तरी काय?"ती तशीच चालत बाहेर आली तिथे पाहिले दारात कोणाचं तरी शव होतं,पण नक्की कोणाचा असेल? ती जरा
भीत-भीतच समोर गेली समोर जाताच "आ....." मटकन खाली बसली समोर पडलेल्या स्वतःच्या देहाला पाहून तिला हुंदका फुटला, पण फक्त एकाच क्षणासाठी.....
      तिने एका कोपऱ्यात पाहिलं सासू डोळ्यात खोटे आसू आणून रडत होती. नवरा एका बाजूला रडायचं नाटक करत होता.अचानक तिला आठवलं कालच्या रात्री सासूने नवऱ्याला सांगून त्याच्या हातून तिला मार बसवला होता. तिने समोर पाहिले एका सौभाग्यवतीचा शृंगार तिच्यावर चढवला होता. त्यामुळे काल रात्रीचे पडलेले डाग झाकून गेले होते.पुढे जाऊन त्या देहाला हात लावला, शरीर थंडगार पडलं होतं.तिला मनोमन आनंद झाला. नवरा रडत होता, सासू रडत होती, शेजारी, नातेवाईक, सगळे रडत होते. पण, ती एकटीच हसत होती.कारण, ती आता मोकळी झाली होती.आता कसलीच बंधन नव्हती. कोणी मारणार नव्हतं. आता देहाबरोबरच मनाची सुद्धा सुटका झाली होती.त्या जाचातून मुक्तता झाली होती. ती हसत होती. नाचत होती. आनंद व्यक्त करत होती. स्वतःच्या मृत्यूचा आनंद नव्हे,..... स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद, गुलामीच्या बेड्यातून सुटल्याचा आनंद, ती मनोमन आभार मानत होती, त्या संपलेल्या श्वासांचे,ती धन्यवाद देत होती,त्या थंड पडलेल्या देहाला,ती पुढे निघून गेली.
      मोकळ्या आकाशात ती स्वतंत्र झाली. जबरदस्तीच्या नात्यातून आणि त्या गुलामीच्या जाचातून ती मुक्त झाली.


वैभवी कु. आ. सातपुते ✍
परभणी GKD ISAD ❤️

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

*_डिग्री म्हणजे कागदाचा एक तुकडा. पण तुमच्याकडे माणुसकी नसेल तर शिक्षणाचा काहीच उपयोग नाही..._*

🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

लहानपणी जगण्याला
सर्वस्व सुख देणारे क्षण
आज फक्त मोबाईलच्या
सोशल मीडियावर बंदिस्त दिसतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

मनावर असो वा डोक्यावर ओझं जास्त वाटतं असेल तर वेळीच भार कमी करता यायला हवं..

🍁🦋🍁🦋🍁🦋🍁

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

_राॅयल एन्ट्री त्याच्याच ह्रदयात करा जिथं तुमचा दर्जा आभाळा इतकाच उंच असेल.._

🌹☘️🌹☘️🌹☘️🌹

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

शब्दस्पर्श__✍️
================
नशिबात
नव्हतं
असं
म्हणायचं
आणि
सोडून
द्यायचं,
ह्या वाक्यावर बऱ्याच गोष्टी निघून जातात...
================

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

आशेच्या खिडक्या आपल्यासमोर नेहमी खुल्या असतात...आपणच त्याला आपल्या निराशेच्या दरवाजाने बंद करतो..चांगल्या बदल साठी आशावादी सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 🤝

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

*_माणसं ओळखायची असतील तर फक्त एवढेच बोलून बघा मी अडचणीत आहे..._*

🌹🦋🌹🦋🌹🦋🌹

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

जेव्हा "आरसा" आपल्या चेहऱ्यावरील "डाग" दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील "दोष" दाखवून दिले तर त्याची साथ सोडायची नसते तर, ते दोष सोडायचे असतात.

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

गुलाबाची शेज

इतका मान कधीच मिळाला नाही,
असं नेमकं आज काय घडलंय?
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
बोलावून बोलावून थकले होते,
आज तर भाऊ, वहिनी ,भाच्या सहित घर भरलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
आज कोणी चहासाठी उठवलं नाही.
जेवण बनवायला सांगितलं नाही.
अगदी बुट सुद्धा धुळखात पडले तरी कुणी रागवलं नाही.
आज तर सगळ्यांचंच वागणं मला खटकलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
ज्या गालांवर अश्रूंचे सागर ओघळले,
त्या गालावर आज चुंबनांचा पाऊस पडतोय.
आटोप आटोप म्हणणारे आज,
चुड्या पैठणीचा आग्रह धरताय.
माझ्या सौंदर्याचं सगळ्यांनाच का पडलयं..?
उठून बघते तर शरीर माझं थंडगार पडलंय.
जग माझ्यासाठी कधीच नव्हतं रडलं.
मला तर खूप आनंद ,असं कधीच नव्हतं घडलं.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
किती त्या जबाबदाऱ्या ,
अन् डोक्यावर नेहमी टांगती तलवार.
पाकळ्यांवर झोपले आज, तरी नाही कुणाचा वार.
काट्या विना गुलाबाची शेज आज तर अनोखं घडलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
हंबरडा फोडतांना आपले परके सगळेच दिसतायं.
तरीही पान्हा फुटत नाही आता बंधन नकोशी वाटतायं.
असं कसं आज मुक्त झाल्यासारखं वाटतंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.

- प्रतिभा पाटील... ( नाशिक )

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

" तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही..!


जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

निसर्गप्रेमी 💚💚
✍️"बुध्दाने सृष्टीतल्या प्रत्येक जीवावर प्रेम करण्याची आणि करुणेची शिकवण दिली.. त्यामुळे बुद्ध या जगातले सर्वात पहिले निसर्गप्रेमी होते..!"

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

मौसम.. 💚
✍️"फळं पिकण्याचा सुद्धा एक विशिष्ट मौसम असतो, त्या मौसममध्येच फळाचा रंग बदलतो आणि फळं पिकतात.. आयुष्यात सुद्धा प्रत्येक गोष्टीचा एक मौसम असतो त्या मौसममध्येच येणाऱ्या संधीच सोनं करता आल पाहिजे...!"
✍️

Читать полностью…

वास्तव (सत्य की आभास)©®

बाप

धाय मोकलून रडते बापाचे काळीज
मुलगी जेव्हा चढते बोहल्यावर
सनई चौघडे वाजतात वरातीत
नवरदेवाची अट पूर्ण केल्यावर

गोड धोडाच्या उठतात तेव्हा पंगती
बाप जीवनभर उन्हांत राबल्यावर
वस्त्रांचा होतो जेव्हा थाटात मानपान
बापाची कष्टाने टाच फाटल्यावर

हुंदक्यांनी गहिवरते अंतःकरण आईचे
दाने अक्षदांचे जेव्हा डोई पडल्यावर
केला का कधी विचार बापाच्या मनाचा
मुलगी दुसऱ्यांच्या हवाली केल्यावर

Читать полностью…
Subscribe to a channel